Dictionaries | References
अं

अंधळ्यानें पांगळा वाहिला आणि पांगळ्यानें मार्ग दाखविला

   
Script: Devanagari

अंधळ्यानें पांगळा वाहिला आणि पांगळ्यानें मार्ग दाखविला     

एकदां एक अंधळा मनुष्य वाटेनें चालला होता ती वाट बिकट असल्यामुळें व त्याला दिसत नसल्यामुळें त्याला त्या वाटेनें पुढें जातां येईना. इतक्यांत त्याच वाटेनें जात असलेल्या एका पांगळ्या मनुष्यानें त्यास पाहिलें. पंगुत्वामुळें त्यास वाटेनें जाणें अशक्य होतें. तेव्हां पांगळ्या मनुष्यानें अंधळ्या मनुष्यास सांगितलें कीं ‘ मला जर तूं खांद्यावर वाहून नेशील तर मी तुला वाट दाखवीन. ’ ही गोष्ट अंधळ्यास पटून त्यानें पांगळ्यास आपल्या खांद्यावर घेतलें व पांगळ्या मनुष्यानें त्यास नीट वाट दाखवून दोघेहि त्या बिकट मार्गाच्या पलीकडे गेले. याप्रमाणें परस्परांनीं जर परस्परांस आपल्या गुणांचा किंवा शक्तीचा उपयोग करुन दिला तर परस्परांचा कार्यभाग सुलभतेनें होतो.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP