Dictionaries | References
अं

अंधळ्या गायींत लंगडी गाय प्रधान

   
Script: Devanagari

अंधळ्या गायींत लंगडी गाय प्रधान     

जेथें सर्व अंधळ्या गायी आहेत तेथें एकहि डोळस गाय, मग ती लंगडी असो, तीच अधिक शाहणी ठरणार. कारण बाकीच्यांना कांहींच दिसत नसल्यामुळें त्यांजवळ पूर्ण अज्ञान असतें. तेव्हां व्यंग असूनहि अल्प ज्ञानी जरी एखादा मनुष्य असला तरी तो अडाणी लोकांत पंडितासारखा मानला जातो.
जेथे सर्व लोक पूर्णपणें अडाणी असतात तेथे अल्‍प ज्ञानीहि शहाणा ठरतो. पाठभेद-वासरांत लंगडी गाय शहाणी.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP