Dictionaries | References

अग अग म्हशी, मला कां नेशी

   
Script: Devanagari
See also:  अग अग म्हशी, मला कोठें नेशी

अग अग म्हशी, मला कां नेशी     

एक मनुष्य नेहमीं बायकोवर रागावून मी घराबाहेर निघून जाईन असा तीस धाक दाखवीत असे. एकदां वैतागानें तिनें त्यास एके दिवशीं खुशाल घराबाहेर निघून जाण्यास सांगितलें. तेव्हां तो बाहेर पडला, पण जाणार कोठें ? अखेरीस कंटाळून त्यानें घरीं जावयाचें मनांत आणलें. पण आतां आपण होऊन परत जाणें लाजिरवाणें बाटून त्यानें आपली म्हैस रानांतून परत घरीं जात असलेली पाहिली व तिची शेपटी धरून ‘ अग अग म्हशी, मला कां नेशी!’ असें म्हणत शेवटीं स्वारी घरीं परत गेली व मला म्हशीएं परत आणलें असें बायकोस सांगूं लागली. यावरून एखादी आपत्ति आपणच आपल्यावर ओढवून घेऊन मग तींत स्वतःची नामुष्की होंऊ लागली म्हणजे क्सला तरी काडीचा आधार घेऊन, भलत्याच गोष्टीचें निमित्त पुढें करावयाचें, अशी वेळ आली असतां म्हणतात.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP