Dictionaries | References अ अलगुजें Script: Devanagari See also: अलगूज Meaning Related Words अलगुजें A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 A sort of pipe or flagelet. 2 The bands of tape or cloth connecting, over the horse's back, the two sides or quilted cases composing a खोगीर. अलगुजें Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 n A sort of pipe. अलगुजें मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 See : अलगूज अलगुजें महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 न. एक प्रकारचा पांवा . हें वाद्य बांबूचें किंवा धातूच्या नळीचें असतें . लांबी वीतभर व जाडी पायाच्या आंगठ्याएवढी असते . एक बाजू बंद असून तिला बारीक भोंक ठेवतात . दुसर्या बाजूस तिरकस खाप पाडून पायरी करतात व त्यांत गाबडी बसवून वाजविण्यासाठीं चीर ठेवितात . तोंडापासून चार बोटांवर वाटाण्याच्या आकाराचीं सहा भोंकें समान अंतरावर पाडतात . तोंडापासून तीन बोटांवर चौकोनी भोंक ठेवितात . तेथपर्यंत गाबडीचा तुकडा एकचतुर्थांश भोंक शिल्लक राहील इतका असतो . विरुध्द बाजूस पहिल्या व दुसर्या भोंकाच्या मध्यावर एक भोंक ठेवतात . शिंपी तोंडात धरुन फुंकले म्हणजे नळी वार्यानें भरते व हाताचीं बोटें भोंकांवर ठेवून इच्छित स्वर काढून हवें तें गीत वाजवितात . बांसरी , मुरली हींहि याच जातींतील वाद्यें आहेत .खोगीराच्या दोन्ही बाजूंना पाठीवर जोडणारे नवारीचे पट्टे . [ फा . अल्घुजह ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP