Dictionaries | References

अलगूज

   
Script: Devanagari
See also:  अलगुजें

अलगूज     

ना.  पावा , बासरी , मुरली , वंशी , वेणू .

अलगूज     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  एक सुषिरवाद्य   Ex. अलगूज बांबू वा धातूच्या नळीचे असते.
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
अलगुजें
Wordnet:
benআলগোজা
gujઅલગોજા
hinअलगोजा
kokअलगोजा
malപുല്ലാം കുഴൻ
oriଅଲଗୋଜା ବଇଁଶୀ
panਅਲਗੋਜਾ
tamஅல்கோஜ்
telఅలగోజా
urdالغوزہ , ایک قسم کی دوہری بانسری
See : बासरी

अलगूज     

 न. 
एक प्रकारचा पांवा . हें वाद्य बांबूचें किंवा धातूच्या नळीचें असतें . लांबी वीतभर व जाडी पायाच्या आंगठ्याएवढी असते . एक बाजू बंद असून तिला बारीक भोंक ठेवतात . दुसर्‍या बाजूस तिरकस खाप पाडून पायरी करतात व त्यांत गाबडी बसवून वाजविण्यासाठीं चीर ठेवितात . तोंडापासून चार बोटांवर वाटाण्याच्या आकाराचीं सहा भोंकें समान अंतरावर पाडतात . तोंडापासून तीन बोटांवर चौकोनी भोंक ठेवितात . तेथपर्यंत गाबडीचा तुकडा एकचतुर्थांश भोंक शिल्लक राहील इतका असतो . विरुध्द बाजूस पहिल्या व दुसर्‍या भोंकाच्या मध्यावर एक भोंक ठेवतात . शिंपी तोंडात धरुन फुंकले म्हणजे नळी वार्‍यानें भरते व हाताचीं बोटें भोंकांवर ठेवून इच्छित स्वर काढून हवें तें गीत वाजवितात . बांसरी , मुरली हींहि याच जातींतील वाद्यें आहेत .
खोगीराच्या दोन्ही बाजूंना पाठीवर जोडणारे नवारीचे पट्टे . [ फा . अल्घुजह ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP