Dictionaries | References अ अहेव Script: Devanagari Meaning Related Words अहेव A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 For अहेव & अहेवनवमी see अविधवा & अविधवानवमी. अहेव Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f An unwidowed woman. अहेव मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. अविधवा , अहिवा , सवाष्ण स्त्री , सुवासिनी , सौभाग्यवती . अहेव मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 See : सवाष्ण अहेव महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. अविधवा ; सौभाग्यवती - सुवासिनी स्त्री . भर्तारेंवीण अहेव । जाण पां तो सर्व विटंबू । - एभा १४ . २५७ . म्ह० अहेवचा मेला खेळायला गेला = नवरा असलेल्या बाईचा मुलगा मेला तर तो खेळायला गेल्यासारखाच असतो , कारण तिला दुसरा होण्याचा संभव असतो .सौभाग्य ; भाग्य . ब्रह्मविद्येचें अहेवकांकण आज फुटलें । - भाए ८५ . परंतु हे मम सुखसार्थकता हेंच मदीय अहेव । - टिक ४० . [ सं . अविधवा ; प्रा . अविहवा ]०तंतु पु. ( काव्य ) मंगळसूत्र ; सौभाग्यसूत्र . कृष्णमणी अहेवतंतु । कंठी धरिला न तुटतु । - एरुस्व ७ . ३६ .०दोरा पु. मंगळसूत्र .नेहमीं पाठीस लागलेली नोकरी , उद्योग - धंदा ; नेहमीं टिकणारा , कायमचा दर्जा , मान , पदवी .०नवमी अविधवानवमी पहा .०पण न. सभर्तृकत्व ; पति जीवंत असण्याची स्थिति ; सौभाग्य . वल्लभाचिया उजरिया । आपणया पति कुस्त्रिया । जोडोनि तोषिती जैसिया । अहेवपणें । - ज्ञा १६ . ३७७ . सौभाग्य नटोनि अहेवपण । ऐसी मिरवीत निघाली । - भवि ३ . २४७ . राखें मजला अहेवपणीं । प्राणेश्वरातें सोडी पितया । - गुच ७ . ३४ . अहेवपणें हळद कुंकुममण्डित मरावें हीच इच्छा सर्व स्त्रियांची . - भावबंधन ९३ .०मणि पु. मंगळसूत्र . कीं अजय झाले रणीं । अहेवमणी । - पला ४० . १०१ .०मरण न. सौभाग्यवतीं असतां , पति जिवंत असतां , सवाष्णपणीं आलेलें मरण . हें स्त्रिया फार प्रिय व मंगलकारक समजतात .०सवाष्ण स्त्री. सौभाग्यवती स्त्री . सुवासिनी .०सुयेव वि. पति जिवंत असतांना मरण येत असलेली ( स्त्री ). [ अहेव + असु + ई ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP