Dictionaries | References आ आवांका Script: Devanagari Meaning Related Words आवांका महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 अवांका पहा .शक्ति ; सामर्थ्य ; आकारमान ; अवसान ; धैर्य ; उमेद . बहुतीं मांडिलें आवांके । वीरश्रीम्लान मुखें । म्हणती पातलों कौतुकें । महोत्साह पहावया । - मुआदि ४१ . ४८ . जयसिंगालाहि आपला आवांका काय आहे तें समजेल - सूर्यग्रहण ८४ .विचार ; सारासार विचार ; मर्यादा ; रीत . अहो जी आइका । तुमतें नाहीं कृपेचा आवांका । तरि येथें बीजे करोनी कां मातें चुकविलें । - ऋ ३२ . - एभा ३१ . ५५५ .अभिमान . मी एक चतुर बोलका । हाही नुठी त्या आवांका । बोल बोलूं नेणें फिका । बोलोनि नेटका अबोलणा । - एभा २८ . ४४९ .सार ; अभिप्राय ; गोळाबेरीज . तया अर्थजातां अशेषां । केला तात्पर्याचा आवांका । तो हा आठरावा देखा । कलशाध्यायो । - ज्ञा १८ . १४ . ४५ . एवं भारताचा आवांका । आणूनि श्लोका एका । - ज्ञा १८ . १६५९ .आटोका कबजा . तेथ एरादळांचा आवांका । कवणुकरी । - शिशु ९०७ . आवांका मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 आवांक्यापेक्षां उपक्र्रम व खाण्यापेक्षां मचमच कितीकाही लोक आपल्याला उरकता येणार नाही इतकी कामे अंगावर घेताततसेच काही लोक प्रत्यक्ष खाण्यापेक्षा अमुक हवे तमुक हवे, अमुक असे तमुक तसे वगैरे बडबड करतात त्यांस अनुलक्षून ही म्हण वापरतात. यावरून आपल्या कुवतीप्रमाणे काम अंगावर घ्यावे व कोणत्याहि बाबतीत वृथा बडबड करूं नये. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP