|
( नाविक ) उत्तर दिशा ; धुरु - दिशा . [ सं . उत्तर ] न. न. ( नृत्य ) पोटानें केलेले निरनिराळें अभिनय . नृत्यामध्यें उदराच्या चार प्रकारच्या अवस्था होतात - क्षाम ; खल्ल ; पूर्ण व सम . [ सं . ] पोट ; कोठा ; जठर . उकार उदर विशाल । - ज्ञा १ . १९ . पोटफुगी ; विकारानें फुगलेलें पोट ; पोटांतील एक रोग . उ० जलोदर ; वातोदर ; सर्पोदर , वगैरे . ( कृषि . ) ( पाण्याचें अजीर्ण ) कांदे , बटाटे इत्यादि भूमिगत पिकास पाणी फार झालें तर सूज येते व तो भाग कुजतो त्यास म्हणतात . - कृषि . १८४ . गर्भाशय ; कूस ; कुक्षि . अगा वसुदेवाचिये तपप्राप्तीं । श्रीकृष्ण देवकीउदरा येती । - एरुस्व १ . १० . धन्य धन्य ते कौसल्या सती । उदरासि आला त्रैलोक्यपति । - संवि १८ . ५ . [ सं . उदर ; सिं . जलंधरु ] - राची खांच - स्त्री . पोट . आपुली खांच उदराची . - संग्रामगीतें १३३ . ०रीं - ( एखादा ग्रह जन्मराशीस येणें ); यथेच्छ खाण्यापिण्यास , उपभोग घेण्यास मिळण्याजोगी दशा येणें ( निंदाबोधक ). उदरीं शनी , शनैश्वर - ( ज्यो . ) शनी जन्मराशीस येणें . म्हणजे चांगली दशा प्राप्त होणें ; ऐश्वर्य मिळणें . येणें - ( एखादा ग्रह जन्मराशीस येणें ); यथेच्छ खाण्यापिण्यास , उपभोग घेण्यास मिळण्याजोगी दशा येणें ( निंदाबोधक ). उदरीं शनी , शनैश्वर - ( ज्यो . ) शनी जन्मराशीस येणें . म्हणजे चांगली दशा प्राप्त होणें ; ऐश्वर्य मिळणें . ०तलधमनी स्त्री. ( शारीर . ) पोटाजवळची धमनी . ०तलपाद ( प्राणि . ) गोगलगाय इत्यादि पोटानें सरपटणारे प्राणी . [ इं . गॅस्टरोपोडा ; ग्री . गॅस्टर = पोट ; तुल० सं . जठर ]. ०दरी स्त्री. पोट ; पोटाची खांच . ०निर्वाह पूर्ति पोषण प्रवृत्ति वृत्ति - पुस्त्रीन . चरितार्थ ; उपजीविका ; पोषण ; उदरंभरण ; क्षुधाशांति . भिक्षा मागुनी क्षेत्राभीतरीं । उदरनिर्वाह करितसे ॥ - नव १३ . ६० . उदर प्रवृत्तिकारणें । मोळ्या आणून विकीतसे ॥ - संवि २१ . २४ . उपजीविकेचें , चरितार्थाचें साधन ; जीवन ; पोटापाण्याची सोय . पोट भरणें ; केवळ जगणें ; जीव जगविणें ; पोट चालविणें ( सामा . निंदाव्यंजक ). ०पिशाच्च पु. अतिशय खादाड ; अधाशी ; खाबू . उदरंभर , री वि . पोटभरु ; पोटार्थी ; खादाड . पीतांमरंद उदरंभर बंभराचें । - नल ३८ . गोसावी लोक ईश्वरप्राप्तीचे नुसतें सोंग आणतात , पण उदरंभर मात्र असतात . स्वार्थसाधु ; आपमतलबी . बरेच प्रोफेसर ... उदरंभरी लोक आहेत - टि २ . ५१४ . पोट भरण्याखेरीज कांहीं न करणारा ; स्वत : च्या निर्वाहाखेरीज अन्यत्र न पहाणारा ( देश - समाजसेवा इ० इतर कांहीं न करणार्यास म्हणतात ). ०भरण न. अन्न खाणें ; जेवणें ; भोजन . उदरनिर्वाह पहा . उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म ।
|