Dictionaries | References

कडे

   
Script: Devanagari
See also:  कडेस , कडेसी

कडे     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Towards, in the direction of. 2 With; under the control of, or in the charge, trust, or management of. Ex. त्याजकडे शंभर शिपाई आहेत; ह्याजकडे लाख रूपयांची मामलत सांगि- तली आहे. 3 Of, under, in subjection to, in connection with. Ex. हा पागेकडे चाकर आहे. 4 To; nothing delivery. Ex. ज्याचें त्याजकडे दे. 5 To or unto; noting dueness or appertainment. Ex. सर- दारानी तरवार मारावी परंतु यश धन्याकडे. 6 With; in the hands of. Ex. त्याजकडे माझे रुपये आहेत.

कडे     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
prep   Towards, in the direction of; to.

कडे     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : जवळ, कंकण

कडे     

शअ . १ बाजूला ; दिशेला .' हातीं धरूनि तियेसी । कडे काढी व्योमकेशी । ' - गुच ३३ . ११० . ' यंदा तुमच्या कडे धारण कशी आहे ?' २ पाशीं ; जवळ ; तांब्यात ; हातांत ; हाताखालीं ; दिमतींत ; व्यवस्थेत .' त्याजकडे शंभर शिपाई आहेत .' ३ आंत ; खालीं ; संबंधी निसवत . ' हा पागेकडे चाकर आहे .' ४ हवालीं ; स्वाधीन ( करणें , देणें ). ' ज्याचें त्याकडे दे .' ५ पक्षाला ; वांट्याला . ' सरदारांनी तलवार मारावी , परंतु यश धन्याकडे ; ' कौरव पांडवांच्या युद्धांत श्रीकृष्ण पांडवांकडें गेला .' ६ हातांत ; पाशीं ; जवळ . ' त्याकडे माझे रुपये आहेत .' ७ ( ल .) पलीकडे ; पार . ' स्वामी तारका गुरुनाथा । संसारसागराकडे लावी । ' - गुच ४५ . १०६ . ८ जबाबदारी ; पत्कर . हें काम माझ्याकडे लागलें .' ९ ( कुण .) काळ , वेळ यांसंबंधी निरर्थकक अव्यय ; स ; ला . ' तूं उद्यांकडे मला भेट .' ( का . कडे ; म . कड )
क्रि.वि.  ( काव्य ) कडेवर ; कमरेवर . ' विवाहहोमालागीं श्रीहरी । वेगें चला बोहल्यावरी । कडे घ्यावी नोवरी । ' - एरुस्व १६ . १९ . ' रेड शिशु तयार घे कळवळोनि माता कडे ' - केका १२१ . ( सं . कटि )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP