Dictionaries | References

कमळ

   
Script: Devanagari
See also:  कमल

कमळ     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
See : साळीक, साळीक

कमळ     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
A lotus. 2 Lotus-form vessel or stand. 3 Applied descriptively to केळफूल.

कमळ     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  A lotus. A lotus form vessel or stand.

कमळ     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  तळ्यात,सरोवरात होणारे एका पाणवनस्पतीचे फूल   Ex. सरोवरात कमळ फुलले होते.
HOLO COMPONENT OBJECT:
कमळ
HOLO MEMBER COLLECTION:
पद्माकर
HYPONYMY:
पांढरे कमळ लाल कमळ अष्टदल
ONTOLOGY:
प्राकृतिक वस्तु (Natural Object)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
कमल पुष्प कमल सरोज पंकज पद्म अरविंद कुमुद पुष्कर राजीव अंबुज अंबोज नीरज वारिज उत्पल सरोरुह सरसिज इंदीवर कल्हार नलीन नलिन कमलिनी सरोजिनी नलिनी पुंडरीक
Wordnet:
asmপদুম
benপদ্ম
gujકમળ
hinकमल
kanಕಮಲ
kasپمپوش
malപങ്കജം
mniꯊꯝꯕꯥꯜ
oriପଦ୍ମ
sanकमलम्
tamதாமரை
telకమలము
urdکنول , گل نیلوفر
noun  सरोवराच्या चिखलात वाढणारी एक पाण वेल   Ex. तळ्यात कमळाला खूप फुले आली होती
HYPONYMY:
नीलकमळ कुमुद
MERO COMPONENT OBJECT:
कमळ
ONTOLOGY:
जलीय वनस्पति (Aquatic Plant)वनस्पति (Flora)सजीव (Animate)संज्ञा (Noun)
Wordnet:
asmপদুম
bdफामि
benপদ্ম
gujકમળ
hinकमल
kasپَمپوش , کَمل ,
kokसाळीक
malതാമര
nepकमल
oriପଦ୍ମ
panਕਮਲ
sanकमलम्
tamதாமரை
telతామరపువ్వు
urdکنول , گل نیلوفر , کنار

कमळ     

 न. १ तळ्यांत सरोवरांत उप्तन्न होणारें फुल . याचे कांदे असुन त्यास लांबट देठ येतो व देठास फुल येतें ; पान वटोळे असतें . कमळाच्या तांबडें , पांढरें , गुलाबी , निळें अशा रंगपरत्वें जाती असून तांबड्या कमळास कोकनद किंवा निळ्या कमळास इंदीवर म्हणतात . शिवाय कल्हार , कुमुद , कमलाक्ष , पोयसर , अशा जाती आहेत . पोयसर कमळास चपटें फळ येतें . त्यांत पांच सहा बिया असतात . त्यांस कमलाक्ष किंवा कमळ काकडी म्हणतात . कमलाक्षाच्या काशीकडे लाह्मा करतात . कमळाच्या देंठास भिसे म्हणतात . कमलाच्या सर्व बेलास कमलिनी म्हणतात . शरीरावयवांचें सौंदर्य दाखविण्याकरितां त्या त्या अवयववाचक नामांच्यापुढें कमल शब्द घालून समासांत योजितात . जसें ; मुखकमल , नेत्रकमल , चरणकमल , इ० २ पुजेचें देव ठेवावयाचें कमळाच्या आकाराचें एक पात्र ; देवाचें आसन , बैठक . ३ गर्भ . ' कमळ लागलें फिरुं पोटामध्यें करीं कांति झळझळा । ' - पला १०० . ४ केळफुल ' जैसें केळीचें कमळ । तैसें हऋदयीं अष्टदळ । ' एभा १४ . ४६५ . ( सं .) ०कला - ळी - स्त्री . कम - लाची कांति , सौदर्यं ( ल .) तेज ; सौदर्यं ; शोभा ; कांति . ( चेहर्‍याची इ० )
 स्त्री. १ कमळाचें झाड . २ कमल ; कमलपुष्प . ' किं रविकिरणीं कमळणी विकासति । दाता देखतां याचक हर्षती । '; ' मुक्तता होऊं पाहे , कमळिणीपासूनि भ्रमरा । ' - होला १६ . ( सं .)
०काकडी    १ कमळांतील बी . २ एक वनस्पति . कमलाक्ष पहा . - शे . ९ . २३७ .
०वरचा  पु. १ कमलाच्या पानावरील पाण्याचा थेंब . २ ( ल .) कमलाच्या पानावर पाण्याचा थेंब पडला असतां त्याच्या गुळगुळीतपणामुळें तो वाटोळा होऊन गडगडत पडुन जातो यावरून आयुष्य , संपत्ति , वैभव , ऐश्वर्य वगैरेची क्षणभंगुरता व अनिश्चितता दाखविण्याची काव्यांतील उपमा . ३ मन , हेतु , वचन यांचें चंचलत्व , असत्यता , बेभरवंसा दाखविण्यासहि योजतात . पाण्यावरचा बुडबुडा पहा .
०गट्ट  पु. कमळाचें बी ज्यांत असतें तो गाभा ( कमळ + गट्टा = गोळा कांदा )
बिंदू  पु. १ कमलाच्या पानावरील पाण्याचा थेंब . २ ( ल .) कमलाच्या पानावर पाण्याचा थेंब पडला असतां त्याच्या गुळगुळीतपणामुळें तो वाटोळा होऊन गडगडत पडुन जातो यावरून आयुष्य , संपत्ति , वैभव , ऐश्वर्य वगैरेची क्षणभंगुरता व अनिश्चितता दाखविण्याची काव्यांतील उपमा . ३ मन , हेतु , वचन यांचें चंचलत्व , असत्यता , बेभरवंसा दाखविण्यासहि योजतात . पाण्यावरचा बुडबुडा पहा .
०जन्मा  पु. कमलामध्यें जन्मलेला ; कमलोद्भव ब्रह्मा . ' तंव म्हणे तो कमळजन्मा । भुतांप्रति । ' - ज्ञा . ३८७ . ( सं . कमल + जन्म )
०जा  स्त्री. कमलांतुन उप्तन्न झालेली ; लक्ष्मी ; रमा . ( सं .)
०नयन वि.  कमलासारखें सुंदर डोळें असलेला ; कमलाक्ष . - पु . विष्णु ; लक्ष्मीपति . ' कमळनयना कमळापती । थोर अपकीर्ती तुज तेव्हां ॥ ' - एरुस्व ४ . १७ .
०नाल  न. कमळाचा देठ . ( सं .)
०पिडी  स्त्री. ( नृत्य ) कमळाच्या आकारांत नर्तकांनी उभें राहून नृत्य करणें .
०बीज   न , कमळांचें बीं , अठरा उपधान्यांत यांची गणना होते . याचें माळेचें मणी करतात . कमलबी औषधी आहे . कमलाक्ष पहा .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP