Dictionaries | References

कांख

   
Script: Devanagari
See also:  काख

कांख     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
See : बगल

कांख     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
A tendril or clasper. v फुट.

कांख     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  The armpit; a tendril.
काखा वर करणें   Plead bankruptcy.
काखा वाजविणें   Exult or triumph.
काखेस मारणें   Take (one) under protection. Make off with.
काखेंत कळसा गांवांत वळसा   To go about in quest of a thing which, if you only look about, is very near you.

कांख     

 स्त्री. १ खांद्याखालील हात व बरगडी यांमधील खोलगट जागा ; बगल , खांक , ' कांखेसी मेरु घेऊनि देखा । कैसें नृत्य करील पिपीलिका । ' - रावि १ . २२ . म्ह० ' काखेंत कळसा , गांवास वळसा , ' कांखेत धाकटें महारवाडा शोधी .' २ तंतू ; ताणा ; पागोरा ( कारण हा देंठाच्या काखेंतून फुटतो म्हणुन ). ( क्रि०फुटणें ). ( सं . कक्षा ; प्रा . कक्ख . हिं कांख ; गु . बं . उ . काख ; सीगन कख ) काखा वर करणें - बगलेंत कांही नाहीं हें दाखविण्यासाठीं दोन्ही हात वर करणें ; दिवाळखोरी प्रसिद्ध करणें ; आपण खंक बनली असें सांगणें ; नंगा बनणें . काखा वाजविणें - आनंद प्रदर्शक चेष्टा करणें ; आनंदाचे भरांत दंड बगलेवर मारणें ; टिर्‍या पिटणें . काखेंतला काढून बाजारांत मांडणें - स्वकपोलकल्पित गोष्ट खरीच आहे म्हणुन भर चारचौवांपुढें मांडणें , सांगणें . काखेस मारणें - १ एखाद्याला आश्रय देणें , आपलासा म्हणणे . २ कांहीं पदार्थ घेऊन पळ काढणें , किंवा एखादी वस्तु उपटून पोबारा करणें .
०बि   भि ) लाई - बिली - स्त्री . काखेंत होणारी एक गाठ ; बगलाबिल्ली ; काखमांजरी पहा .
. (   भि ) लाई - बिली - स्त्री . काखेंत होणारी एक गाठ ; बगलाबिल्ली ; काखमांजरी पहा .
०भोंवरी  पु. घोड्याच्या पुढील दोन पायां पैकीं कोणत्याहि एका पायाच्या जांघेत असणारा केंसाचा भोंवरा ; हा अशुभकारक समजतात .
०मांजरी  स्त्री. , काखेंतील गळूं ; बगलेंतील पुटकुळी ; बाहु , बरगड्या , खांडे व काखा याठिकाणीं पित्तप्रकोपामुळें वेदानायुक्त व काळ्या फोडांनी व्यापलेली अशी होणारी एक गांठ . - योर २ . ४२५ . हिला लोणी लावून तें मांजराकडुण चाटविलें म्हणजे ही बरी होते अशी समजूत आहे .
०वाळ   ( कु .) चोळीला काखेंत लावण्याची पट्टी ; लाग .
०सावला वि.  ( वाटेनें जाणार्‍य़ा किंवा जावयास निघालेल्या प्रवाशाप्रमाणें काखेंत सावलें म्हणजे चिरगुट घेतलेला ) आळशी ; उदासीन ; ( चालु कामधंद्याविषयी ) काळजी , आस्था , किंवा संबंध न दाखविणारा .( निष्काळजी चाकर , मुलगा किंवा एखाद्या संस्थेंच्या सभासदाला हा शब्द निंदाव्यंजकतेनें लावतात .)

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP