Dictionaries | References क कापुर Script: Devanagari Meaning Related Words कापुर महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. एक पांढर्या रंगाचे ज्वालाग्राही सुंगधी द्रव्य बर्याच झाडांपासुन व दालचिनी इ० द्रव्यापासुन कापुर बनवितात . हिंदुस्तानांत कापुरकेलीपासुनही कापुर निघतो . ' कापुरें तैं चाउग मालाथिलें । ' - शिशु ६२९ . ( तुल०द्रा . करुप्पु = दालचिनी . ( हा शब्दग्रीकांनी उअलला होता . काल्डवेला . ९३ . ९४ .); सं . कर्पुर ; प्रा . कप्पुर ; हिं . गु . कपुर ; ते कर्पुरामु ; मलाया कापुर ; खडू - अर . काफुर ; लॅ . कँफोरा ; इं . कँफर ) म्ह० चोळला कापुर नासतो = अति झालें म्हणजे बिघडतें .०आरती स्त्री. ( कर्ना .) कापुरारती . १ तबकांत कापुर पेटवून त्यानें देव , गुरु , ब्राह्मण यांस ओवाळण्याची क्रिया . २ ( बडोदा ) कापुर पेटविण्याचें पात्र ; हलकारती . - ऐरापुप्र . २ . २ .०कचरा कचरी - पुस्त्री . एक सुवासिक कंद . ( सं . कर्पुर + कर्चुर ; हिं . कपूरकचरी .)०करदळी स्त्री. जिच्या गर्भांतकापुर निघतो अशी कर्दळ , केळ .०केळ ळी - स्त्री . एक प्रकारची केळ ; कापुरकरदळी पहा . - शे . ३० . ४३ . ' वरौनि कापूरकेळीम ' । भ्रमरांची झांक ऊठिली । ' - शिशु ६०५ .०गौरी वि. कापरासारखी गौरी ; शुभ्र . ' कापुरगौरी चोखट । ' ऋ ८२ .०चिनी स्त्री. चिनी कापुर ; एक ओषधी वनस्पति द्रव्य . ( सं . चीनाक + कर्पुर )०पोवळें न. खोटें , कृत्रिम पोवळें ( हें लाखेचें करतात ).०भेंडीं स्त्री. एक झाड .०मोतीं न. खोटें कृत्रिम मोतीं ( हें पार्याचें बनवितात ).०वणी कापरवनी पहा .०विडा पु. कापुर घालुन केलेला पानाचा विडा . ' आरोहण तया झाली . कापुरविडे देती । ' - वसा ५३ .०वेल स्त्री. १ नागवेलीचा एक प्रकार . ' कापुर वेलीची चोखडी । उजळिली परीवडी । ' - ऋ ८४ . २ एक फुलवेल . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP