Dictionaries | References क कावळा Script: Devanagari Meaning Related Words कावळा A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 To quit the company of men. Applied also correspondingly with "Get along with you--You go to Bath--Mind your own business." कावळा Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m crow.कावळ्याच्या शापानें गाई मरत नसतात Persons of worth are not hurt by the vile abuse of the wicked. कावळा मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. एकाक्ष , काऊ , काक , कौआ , बलिपुष्ट , वायस . कावळा मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun काळ्या रंगाचा, लांबट व बळकट चोचीचा, मासे, कीडे खाणारा, कावकाव असा कर्कश शब्द करणारा एक पक्षी Ex. कावळा आपले घरटे नेहमी उंच झाडावर बांधतो HYPONYMY:डोमकावळा ONTOLOGY:पक्षी (Birds) ➜ जन्तु (Fauna) ➜ सजीव (Animate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:काक काऊWordnet:asmকাউৰী bdदाउखा benকাক gujકાગડો hinकौआ kanಕಾಗೆ kasکاو kokकावळो malകാക്ക mniꯀꯋ꯭ꯥꯛ nepकाग oriକାଉ panਕਾਂ sanकाकः tamகாக்கா urdکوا , کاگ , زاغ noun तेल ठेवण्याचे चोच असलेले भांडे Ex. कावळ्यातून तेल ओघळत नाही. कावळा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. काळ्या रंगाचा , लांबट व बळकट खोंबीचा , मांस , किडे गोचीड वगैरे खाणारा , कावकाव असा कर्कश शब्द करणारा एक पक्षी ; काक . अगस्त्याच्या फुलांतील कावळ्याच्या आकाराची काडी . केळफुलांच्या दात्यांतील एक न शिजणारा निबर तंतु , हा काढुन मग दात्यांची भाजी करतात . कावळी नांवाच्या वेलीचें फळ . ( बैलगाडी ) गाडीवानाच्या चाबकाच्या टोकाला असलेला गोंडा . ( बे .) आमटी वाढण्याचें एक सारपात्र . ( कों .) नारळीच्या झाडाच्या शेंड्यावरीलल कोवळ्या पानांचा झुबका . - कृषि ७४८ . ( जरतार ) कावळ्याच्या चोंचीच्या आकाराचा एक चिमटा . ( सं . काक ; ते . काकि ; सिं . काउ ; हिं . काव्वा ; इं . क्रो ). ( वाप्र .)०शिवणे मृताच्या दहाव्या दिवशीं त्याच्या नावानें केलेल्या पिंडास कावळ्यानें स्पर्श करणें . स्त्री . अस्पर्श झाली असतां लहान मुलांच्या समजुतीकरितां हा शब्द वापरतात . ( कावळा शिवला म्हणजे पाप लागतें अशी समजूत ' मद्विकम तुच्छ नरा , शिवला हा जेविं काक डाग मला । ' - मोविन डाग मला । ' - मोवन १२ . ३७ . चें आयुष्य असणें - शंभर वर्षे म्हणजे दीर्घायुष्य असणें . - च्या शापानें गाई मरत नाहींत - क्षुद्र माणसानें थोरामोठ्यांना कितीहि दूषणें दिली तरी त्याचें कांहींहि नुकसान होत नाही . पांढरे कावळें जिकडे असतील तिकडे जाणें = देशत्याग करनें . ( पोटांत ) कावळे कोकलणें - ओरडणे - फार भूक लागणें . ( गो .) कावळे म्हातारे जावप = पुष्कळ काळ लोटणें . म्ह० कावळा सार्यांचा गू खाईल पण कावळ्याचा कोन खाईल = ओंगळपणा , नीचपणा , हलकटपणा याम्नी युक्त अशा माणसाबद्दल योजतात . कावळां मोत्यापोवळ्यांचा चारा काय उपयोगी ? = गाढवास गुळाची चव काय ? घरांत नाहीं शीत कावळ्यास आमंत्रण = अंगांत सामर्थ्य नसतां बडेजावीच्या गोष्टी बोलणें , जवळ पैसा नसतां भरमसाटपणे देणग्यांची वचनें देणें . कावळ्यानें गु . उष्टावप = कावळ्यानें गु उष्टावण्यापुर्वी म्हणजे अगदी सकाळी . कावळे बुक - न . पत्रे पावत्या . बिलें इ० चिकटून ठेवण्याकरिती शिवणीपासुन दोन बोटें रंदीच्या कागदाच्या पट्ट्या कापून शिवुन तयार केलेंलें चिकटबुक . - ळ्याचा डोळा - पु . ( राजा .) एक वनस्पतीचें फुल . ( ल .) फार पातळ ताक . - चें गोत - न . एखाद्याच्या घरीं कांहीं निमित्तानें जमलेला गोतावळा ; अनेक नात्यागोत्याच्या माणसांची गर्दी . झुंड वगैरे . कावळा मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पराचा कावळा एखादी लहानशी गोष्ट अतिशय फुगवून सांगणें. अगदी क्षुल्लक गोष्टीवरून एखादे मोठे अवडंबर माजविणें. अतिशयोक्ति. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP