Dictionaries | References

कोल्‍हा काकडीस राजी

   
Script: Devanagari

कोल्‍हा काकडीस राजी     

क्षुद्र माणूस क्षुद्र मोबदल्‍याने संतुष्‍ट होतो. एकदां एक कोल्‍हा एका मळ्यात गेला. तेथे त्‍याने द्राक्षे वगैरे अनेक फळे पाहिली पण ती सर्व मांडवावर उंच असल्‍यामुळे त्‍याच्या आटोक्‍यात नव्हती
तेव्हां त्‍याची त्‍यास आशा सोडून द्यावी लागली. अखेरीस एका वेलावर एक काकडी होती व ती जड असल्‍यामुळे जमीनीवर आडवी पडली होती. तेव्हां आपणास तेवढीच पुरे म्‍हणून मनात आनंद पावून त्‍याने तीवर आपली भूक भागविली. जेव्हां आपणामध्ये मोठा पराक्रम करून मोठा लाभ करून घेण्याची शक्ति नसते तेव्हां आपल्‍या आटोक्‍यात जेवढे असेल तेवढ्यावरच संतोष मानून राहाणें चांगले.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP