-
पु. १ खीळ ; मेख ; लोहशंकु ; लोखंडाची अणकुचीदार वस्तु . २ गाय , म्हैस यांच्या स्तनांतुन दूध बाहेर निघण्यास आंतील प्रतिबंध करणारा मळ , हा जनावर व्याल्यानंतर काढावा लागतो . ३ रचलेल्या दगडांचा ढीग , वरंडा ; एखादी शंक्वाकृति रचना . ४ जमिनींतुन नुक्ताच बाहेर येणारा अंकूर . ५ तीन अथवा चार गांवाच्या सीमा एकत्र मिलण्याचे ठिकाण . ६ छापण्याचा ठसा , ठाईप ७ ( माण ) गाडीच्या जोखडांतील भोंकांत ( बैलास दुसरीकडे खांदा वळवितां येऊं नये म्हणुन ) बसविण्याची खुंटी , दांडा , शिवळ . खिळयाचें प्रकार - स्क्रु , टेकस , कुर्हाडी , तारेचा . ( सं . कीलक ; प्रा . खीलओ . गु . खिळो ; बं . ओरि . खील , खिला ). म्ह० ( खिळ्यासाठीं नाल गेला , नालासाठीं घोडा गेला . घोड्यासाठी स्वार गेला . एवढा अनर्थ खिळ्यानें केल्या = क्षुल्लक चुकी . पासुन परंपरेनें मोठा अनर्थ गुदरतो . ०जोडणार - पु . टःअसे , टाइप जुळविणारा , कंपाझिटर . ०पट्टी - स्त्री . १ घराचें लोखंडी काम ' घर तर झालें खिळापट्टी व्हावयाची आहे .' २ कपाळावर लाविलेल्या तंबड्या गंधाच्या दोन ओळी व त्यांत सुपारी जाळुन तिचा किंवा कस्तुरीचा लाविलेला टिळा . त्यावरुन खिळेपट्टी करणें - लोकांच्या घरी जेवूने .' आज कोटें खिळेपट्टी झाली ?'
-
०माणी वि. लोकंडी खुंटी व तिच्या भोगती लोखंडी मायणी असभारेण ( जातें ). किळेपाणी पहा . खिळारें - खिळोरें पहा .
-
खिळेपट्टी करणें
-
दुसर्याच्या घरी जेवले असतां तांबड्या गंधाच्या दोन रेघा लावून मध्ये अक्षतेचा काळा ठिपका देत असत. असे गंध लावलेल्या मनुष्यास कोठे खिळेपट्टी केली म्हणून विचारीत. त्यावरून लोकांच्या घरी जेवणें
Site Search
Input language: