|
वि. ( स्वच्छ व अस्वच्छ यांतील औपचारिक भेद दर्शविणारा शब्द .) १ शिजविलेलें . पकविलेलें , किंवा शिजविल्या पकविल्या शिवाय , पाण्याशीं मिसळलेलें ( तांदुळ , भाकरी , पीठ , दुधाशीं किंवा एखाद्या फळांच्या रसाशीं मिसळलें तरी तें खरकटें होत नाहीं .) २ ज्याला असलें खरकटें अन्न लागलें आहे , चिकटलें आहे . अथवा ज्याचा स्पर्श झाला आहे असें ( हात , स्वयंपाकाची भांडीं , जागा , पदार्थ इ० ) खरकट्या अन्नास सोवळ्यानें शिवलें तर चालतें , ओवळ्यानें शिवल्यास तें विटाळतें . ( साधारणत ; बाह्माणांत असा जास्त परिपाठ ) सोवळ्याओवळ्याचा भेद न मानणार्या ब्राह्मणेतरांमध्येंहि शिजविलेल्या अन्नास खरकटेंच म्हणतात .
|