|
पु. १ इमारतीचा भाग सहन करणारे , उथळ्यावर उभें कलेलें अगर जमिनींत पुरलेलें लाकुड ; स्थुणा ; सोट ; स्तंभ ; धीरा ; आधार . २ ( ल .) केळीचा खुंट . ३ ( ल .) घरांतील किंवा समाजाचा नेता ; कर्ता पुरुष ; आधारभुत गोष्ट . अवघ्या लोकंनी हिंमत टाकिली खांबबुडाला दौलतीचा । ' ऐपो १३४ . ( समासांत ) - घुसळ - मलखांब ४ ( ओतकाम ) समईचा मधला भाग . ५ ( बीडकाम ) चरकाच्या दोन्हीं बाजूचें धिरे . ( सं . स्तंभ ; प्रा . खंभ ; ( बीडकाम ) चरकाच्या दोन्हीं बाजुचें घिरे . ( सं . स्तंभ ; प्रा . खंभ ; का . कंबू ) ( वाप्र .) खांबाला डीक पाहणें - अशक्य गोष्टीची अपेक्षा करणें . उदा० कद्रु माणसापासुन द्रव्याची अपेक्षा करणे ; गारगोटीपासुन दुधाची इच्छा करणें . सामाशब्द - खांबोळी - स्त्री . मुलांचा एकखेळ . ह्यात सर्व मुलें एक एक खांब धरुन राहतात . व पुढें एकमेक आपपला खांबसोडुन दुसरा पकडतात , ह्यावेळ मध्येंच चोर झालेल्या गड्यानें दुसर्याला पकडले तर तो ( पकडला गेलेला गडी ) चोर होतो . खांबट - न . लहानसा खांब ; किरकोळ , भक्कम नव्हे असा खांब , वांसा . खांबणी , खांबला , खांबली , खांबुला , खांबा - स्त्रीपु . १ ( राजा .) घर इ० चे पोटमांडणीचे जे लहान खांब ते प्रत्येकी ; दुबेळकें ; कांभेरा , २ आखुड पुरलेला खुंट . ' खपरेल करावयास खांबण्या ... ओमण इतकें सामान लागतें .' - मराठी ३ रें पुस्तक पृ . ६२ . ( १८७३ ). ०सुत्र - न . खांबसुत्राचा खेळ ; कळसुत्री बाहुल्यांचा खेळ .' संसार म्हणजे खांबसुत्र । चौर्याशीं लक्ष पुतळ्या विचित्र । त्यांचा सुत्रधारी ईश्वर । त्याचिया इच्छे वर्तिजे । ' एरुस्व १२ . ३४ . ' खाभसुत्रीची बाहुली । तेणें पुरुषें नांचविली । ' - दा . ८ . १ . १०३ . वि. कायम ; स्थूल . ' रुजु होऊन खांब वसूलाची मुकासबाब व जकाती ' - बाबारो ३ . १७१ . ( फा . खाम अमदनी = ठोकळ वसूल ) ०सुत्रपुतळी स्त्री. कळसुत्री बाहुली चालविण्याचा खेळ व ती पुतळी . ०सुत्री वि. १ कळ्सुत्री बाहुल्यांचा खेळ करणारा . ' नातरी जैसा खांबसुत्री । अचेतन पुतळ्या नाचवी यंत्रीं । - तुगा ३८१३ . २ खांबसुत्राबद्दल .
|