Dictionaries | References ख खाटकाला शेळी धार्जिण, कसायाला गाय धार्जिण Script: Devanagari Meaning Related Words खाटकाला शेळी धार्जिण, कसायाला गाय धार्जिण मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 खाटिक शेळीला मारतो पण ती त्याच्याजवळ अगदी गडबड न करतां नरमपणानें असते. तशीच गाय तिला मारणार्या कसायाजवळ गडबड करीत नाही. जबरदस्ताशी गांठ पडली म्हणजे सर्व नरम येतात. आपला शत्रु पुढे दिसला म्हणजे सर्व प्राणि घाबरून जातात व धैर्य टाकतात. विंचू पालीपुढे नांगी टाकतो अशीहि समजूत आहे. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP