|
स्त्री. ( प्रां .) भोंक ; भगदाड ( भिंत , कुंपण यांतील ). ( सं . खात = भोंक ) स्त्री. ( कु . गो .) १ चिखल , पाणी जमीनीवर ओतलेली जागा . २ उकीरडा . ( खात ) स्त्री. १ गुमान , पर्वा ; विचार ; चिंता ( सामान्यत ; निषेधार्थी ). ' पैका गेल्याची त्यास खातर नाही .' २ खात्री ; विश्वास ; मरंवसा ; निशा .' हा मनुष्य विश्वासु अशी आमची खातर आहे .' ३ पसंती ; मर्जी ; मन , ' आमचें खातरेस वातेल तें करुं .' ४ विचार . ' स्वामींची खतर जरुर जाणुन ...' - रा . १ . १३२ . ५ आस्था . ' त्यातही श्रीमंतीचें सरकारांत या संस्थानची यास खातर अधिक .' - रा . ७ . ३७ . ६ सत्कार ; मान . ७ आश्वासन . ८ ( ल .) ( ना .) मनस्वी त्रास ; खोडमोड . ' सायकलीवरुन हिंडलों पण माझी चांगलीच खातर खाली .' - शा . करितां ; साठीं . माझयाखातर ' त्या खातरहितें मला कर्तव्यच आहे .' - तोवं २२ . ( अर . खातिर ) ( वाप्र .) ०वासी उंबरड्यांत राहणारा . ' तुका म्हणे खातडवासी । अमृतासी नोळखे । - तुगा ३४८५ . खातडांवचें -( गो .) सुफ्या जमीनीवर ती फुंगेपर्यंत पाणी ओतणें . ०करणें खात्री करणेम ;' पटविणें ; आश्वासन दणें . ०पटणें आडवणें , पसंत पडणें . ०खातरेस पसंत पडणें , समाशब्द - येणें पसंत पडणें , समाशब्द - ०खा खातीरहा - वि . १ स्नेहाचा , चांगलें इच्छिणारा ; हितेच्छु ( केवळ पत्रव्यवहारांत ). २ यशस्वी . ' कित्येक उमद उमंद मनुसुबे खातीरख्खाह होतील .' - रा . १ . ५३ . ३ समाधान .' बहुत खातरखा केली .' - रा . १० . २६५ . - क्रिवि . १ इच्छेप्रमाणें .' इंग्रजे पल्टणें पुण्यासमीप आली . त्याचें पारिपत्य खातर्खा न जालें ' - दिमरा १ . ४० . २ यथास्थित .' बदोबस्त ही खातरखा आमचें स्वामी करितील - रा १ . १३२ . ०जमा - स्त्रे . १ खात्री ; विश्वास ; निशा ; संशय ; आशंका , संदेहनिवृत्ति . ( क्रि० करणें ). ' एवंच दादासाहेब खतरजमेशी जात नाहींत .' - भाव ८४ . २ हिंमत ' एक वेळ लढाई खातरजमेची द्यावी .' - ख ११ . ६०८४ . ३ गुमान ; हिशेब ; पर्वा . - वि . स्वस्थ . ' तुम्हीं खातर जमा असणें .' - रा १५ . २१ . ( फा . खातिरजमअ ) ०जामीन दार - पु . खातरीदार पहा . ०तसल्ली स्त्री. समाधान . ' सर्वांची खातरतसल्ली होऊन जमाव जालच असेल .' - दिमरा १ . ३१ . ( अर . तसल्ली - समाधान ) ०दारी स्त्री. १ खात्री ; हमी ( माणुस , चिन्ह यांची ). २ विश्वास . निशा . ( फा . खातिरदारी ) ०दास्त स्त्री. खातरजमा , इच्छा .' त्यांची खातरदास्त पुरेल तेथें जावें .' - ख . ९ . ४९६५ . ०नशीन वि. श्रुत . - खरे ७ . ३५६६ . ( फा . खातिर्निशीन ) ०निशा स्त्री , मनाचें समाधान ; संदेहनिवृत्ति . ' अशी माझी खातर निशा झाली .' - बाळ २ . १६ . ( फा . खाति . र्निशांन )
|