Dictionaries | References

खुंटणे

   
Script: Devanagari
See also:  खुंटणें , खुटणें

खुंटणे     

क्रि.  अटकणे , अडून बसणे , हट्टास पेटणे ;
क्रि.  थबकणे , थांबणे , बंद पडणे , रोखला जाणे .

खुंटणे     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
verb  वाढ, गती थांबणे   Ex. ह्या रोगामुळे पिकाची वाढ खुंटते.

खुंटणे     

स.क्रि.  बोटांनी पिळवटुन अथवा नखांनी तोडुन काढणें . तोडणें ; खुडणें ( भाजी , द्विदल धान्याची शेंग , कणसे इ० ) ' कणसे खुटिजेति कृषीवळीं । ' - मुआदि ४९ . ११४ . ( सं . कुठ )
अ.क्रि.  १ गतींत रोध होणें ; गति कुठिंत होणे , बंद पडणें ; थांबविला , अडकविला , रोखला जाणें ; स्तम्भित होणें ,' थांबणे ; थबकणे .' किं क्षुधातृषादि आर्ति । खुंटलिया। ' - ज्ञा ३ . ५६ . २ ( ल .) कुंठित , निरुतर , गतिहीन , थक्क होणें ; दाबली जाणें ; धंडावणे ( उत्कंठा , आशा ). ३ वारंवर हटन , बसणें ; दुराग्रहपुर्वक किंवा निश्चयपुर्वक खिळणीस येणें ; खिळण घेणें ; हट्टास पेटणें ; समजुतीला दाद न देणें ; अडुन बसणें . ४ तुटणें ; ' दोर खुटला तो पछि होऊन गेला । ' ऐपो ९७ . ५ कमी येणें ; कमी होणे ; अपुरें पडणें दोन मण गुळांत दहा शेर खुंटला .' ( सं . कुठ = अडथळा करणें ; तुल० का . कंटु = लंगडणें .)

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP