Dictionaries | References

घागरमाळा

   
Script: Devanagari
See also:  घागरमाळ , घागुरमाळ , घागुरमाळा

घागरमाळा     

 स्त्री. १ ( हत्ती , बैल इ० प्राण्यांच्या गळयांत घालावयाची ) घुंगुरांची माळ ; गळघांटी . कीं ते कृष्णपक्षींची रजनी । चंद्रशोभा उदेली दशनी । घागरमाळांचे मणी । तारागणें कीं ॥ - कथा ४ . ९ . ४१ . शिवराम शिंग घेऊन येतो व मोतद्दारास घागरमाळा वाजवावयाची खुणेनें आज्ञा देतो . - बाळ २ . १५५ . २ ( सामा . ) मोठी घागर्‍यांची माळ . मखरीं लोंबती घागरमाळा । - अमृतसुदामचरित्र पृ . ३४ . [ घागरी + माळ ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP