|
पु. फडशा ; फन्ना ; नि : शेषपणा . - क्रिवि . चट्ट पहा . पु. १ चुरचुर करणारा , वेदना करणारा भाग नायटा ; खाज सुटणारा पुरळ ; दुखापत ; क्षत ; खवंद . २ वण ; डाग ; क्षत ; चिन्ह . ( क्रि० पडणें ) ३ ( ल . ) तोटा ; दुर्दैवाचा आघात ; कोणत्याहि कृत्यांत , धंद्यांत आलेली , लागलेली तोहमत , ठेंच , खोट , नुकसान , तूट , घस , चाट . ( क्रि० येणें ; बसणें ). यंदा भाताचे व्यवहारांत पांचशें रुपये चट्टा बसला . [ हिं . म . चाटणें ] ०मट्टा पु. १ खाऊन नि : शेष करणें ; फडशा ; फन्ना ; ताव मारणें ; सप्पा करणें . त्या दोघांचा श्वापदांनीं केव्हांच चट्टामट्टा उडविला असता . - स्वप १९८ . २ ( ल . ) नाश ; नागवणूक . मला खालीं पाडून माझा चट्टामट्टा करण्याची तुझी इच्छा आहे . - के १० . ६ . ३० . ३ ( बायकी ) भातुकलीच्या खेळांत खेळ संपल्यावर मुली खाण्याचे सर्व पदार्थ खाऊन टाकतात तो . चट्टामट्टा बाळंभट्टा बाळंभट्टाची शेंडी उपटा . - मुलींचीं गाणीं . [ म . चट्टा + मट्टा ( मटमट आवाज ) ]
|