|
न. कांडर जातीचा साप . याचें शरीत चकचकीत असतें म्हणून यास हें नांव देतात ; रंग बांडा , विषारी , पावसाळयांत विशेष आढळणीरी अशीं सापाची एक जात . - बदलापूर ३४४ . स्त्री. १ चुडी ; उजेडासाठीं पेटविलेली नारळीच्या झापांच्या पातींची , सणकाडयांची , गवताची जुडी . तीं ( झाडें ) कांहीं आणून डोमिंगोनें एक चूड बनविली . - पाव्ह ३२ . २ ( भात पेरणीच्या वेळीं हातांत धरून लावण्याचा ) भाताच्या रोपांचा झुबका . [ जुडी , जूड ; तुल० का . सुडु , सुडि = गवताची पेंढी ; दे . चुडुली ] स्त्री. गवत वगैरे . ' वेठबेगार व चूड वोंडा वगैरे कारसाज पाहिजे .' - बाबारो ३ . २७५ ; - समारो ६ . १५२ . चुडावोंडा पहा . पु. मुकुट ; तुरा . [ सं . चूडा ] ०उचलणें धरणें लावणें - सक्रि . ( ल . ) एखाद्यावर खोटा आरोप , बालंट उभारणें . ०फिरविणें सक्रि . ( ल . ) प्रजेची दुर्दशा होईल अशा तर्हेनें देश , गांव इ० लुटणें , जाळणें , पोळणें .
|