|
वि. १ शुध्द ; निर्मळ ; निष्कलंक ; चांगलें ; अस्सल ; स्वच्छ ; निर्भेळ . तें निजज्ञानही चोख । जाणता मीचि । - ज्ञा . ५ . ४३६ . ग्रंथारंभ पडला चोख । मुक्त मुमुक्षु इतर लोक । - एभा १११०४ . २ उत्तम ; उत्कृष्ट ; थोर ; श्रेष्ठ . अर्जुनाच भाग्य चोख । - मुवन ९ . ७८ . ३ प्रामाणिक . [ सं . चोक्ष = स्वच्छ , शुध्द , आनंददायक ; प्रा . चोक्ख ; तुल० हिं . चोखा ; गु . चोख , चोख्खुं ; का . चोक्क ] सामाशब्द - चोखट - वि . चांगला ; उत्तम ; शुध्द ; सुंदर ; चखोट . ऐसा महिमा धनवट । गंगा तैसी चोखट । - ज्ञा २ . २१३ . बहुतां जन्मांचा शेवट । नरदेह सांपडे अवचट । येथें वर्तावें चोखट । नीतिन्यायें । - दा ११ . ३ . १ . [ चोख ; का . चोक्कट ] म्ह० - ( व . ) चोखट चिरा दातीं कुरा = जी वरून झकपक करतें , परंतु जिचे दांत स्वच्छ नसतात , पिवळे असतात अशा स्त्रीस उद्देशून ही म्हण योजतात . चोखटा , चोखटी , चोखटें , चोखडा , चोखडी , चोखडें - वि . ( काव्य . ) चांगला ; शुध्द ; दृढ ; निष्काम ; निर्मळ ; चखोट . चंद्र चकोरा चोखटीं । वोळे अमृतधारीं आतुटी । - ऋ ५२ . तैसें श्रध्देचें दळवाडें । आंगें कीर चोखडें । परी प्राणियांच्या पडे । विभागीं जै । - ज्ञा १७ . ५५ . ऐसे निरवधि चोखडे । स्वामिभक्त । - ज्ञा १ . ११२ . [ चोखट ] चोखटाई - स्त्री . चांगुलपणा ; शुध्दता ; चोखटपणा ; कुशलता ; उत्कृष्टता ; सच्चेपणा ; प्रामाणिकपणा . [ चोखट ; तुल० हिं . चोखाई ; गु . चोख्खाई ] चोखटाईची भाजी - स्त्री . निर्लेप भाजी ; उष्टी , खरकटी न झालेली भाजी ; याच्यां उलट खरकटी . खरकटा पहा . चोखटीव - स्त्री . चांगुलपणा ; शुध्दपणा ; निर्मळता . चोखटिवा आपुलिया । पुढिला उगाणा घेयावया । तया दर्पणाचीचि परी धनंजया । केली आम्हां । - ज्ञा १५ . ५७९ . [ चोखट ] चोखटेल - न . करडई , तीळ , खुरासनी इ० कांचें तेल ; गोडें तेल ; याच्या उलट कडू तेल . [ चोखट ] न. स्त्री . शुध्दपणा ; निर्मळपणा ; पांढरेपणा ; शुभ्रपणा ; स्वच्छता . मग नचलतें कलंकेवीण । शशिबिंब जैसें परिपूर्ण । तैसें चोखी शृंगारपण । मनाचें जें । - ज्ञा १७ . २३० . [ सं . चोक्ष ; तुल० का . चोक्क ; तुल० गु . चोख = स्वच्छता ] पु. एक वनस्पतिविशेष .
|