|
पु. १ चोरणारा , चोरी करणारा , दुसर्याची वस्तु त्याला नकळत , जबरदस्तीनें लुबाडणारा माणूस . चोर भांडारी करावा । घसरतांच सांभाळावा । - दा १९ . ९ . ९ . २ ( एखाद्यापासून कांहीं गोष्ट , वस्तु इ० ) छपवून , लपवून ठेवणारा ; ( एखादी गोष्ट स्वत : पाशींच ) दाबून ठेवणारा , दडपून टाकणारा . ३ केंळफुलांतील फणीच्या दात्यांतील कठिण व पसरट माथ्याची काडी , दांडा . यास कावळा असेंहि म्हणतात . हा भाजीच्या उपयोगी नसती म्हणून फेंकून देतात . ४ ( समासांत ) प्रछन्न ; गुप्त ; लपविलेला ; छपविलेला ; राखून ठेवलेला ; खाजगी ; आड ; बाजूचा ; कोंपर्याचा इ० अर्थी . उ० चोर - अडसर - अरगळ - कडी - खीळ - गांठ - छिद्र इ० . असे अनेक सामासिक शब्द बनले आहेत . ५ ( गंजिफा , पत्ते , इ० खेळांतील परिभाषा ) एक पान ; प्रत्येक रंगांतील हुकुमाच्या खेरीज इतर पान , पत्ता . त्याच्या हातांत एकच बाकी राहिलेला पत्ता हुकुम नसावा तो चोर असावा . ६ ( स्वत : स ) मागें राखणारा ; चोरून ठेवणारा ; अंग काढतें घेणारा , चुकविणारा ; चुकार याअर्थी पुढें चोर शब्द लावून अनेक सामासिक शब्द होतात . उदा० कमलचोर = लिहितांना कांहीं गोष्टी राखून ठेवणारा , दाबून ठेवणारा , वगळणारा , चोरून ठेवणारा ; सांगितल्याबरहुकूम न लिहिणारा . खांदचोर = १ दुसर्याबरोबर काम करतांना जो आपला खांदा काढता घेतो तो ( मनुष्य , पशु इ० ); कामचुकार . २ ( ल . ) निकडीच्या वेळीं मदत , द्रव्य देण्याचें कर्तव्य न करणारा ; तोंडघशीं पाडणारा . चाकरीचोर = लबाडीनें चाकरींत , सेवेंत कुचराई , अंगचोरपणा करणारा . पाठचोर = सहज रीतीनें , सहजासहजीं पाठीवर बसूं देणारा ( बैल ). पायचोर = १ एखाद्या करारांतून , कामांतून गुप्तपणें , गपचिप काढतें घेणारा , अंग काढून घेणारा . २ चोरटेपणानें , हळूच , आवाज होऊं न देतां पाऊल टाकणारा ; चाहूल न देणारा . ३ चालण्यांत , पळण्यांत कुचराई करणारा ( मनुष्य , घोडा ). बळचोर = बळ राखून , जेवढें खर्चावें तेवढें न खर्चून काम करणारा ; चुकार ; मन : पूर्वक शक्य तितकें शक्तिसामर्थ्य खर्च न करणारा . मतलबचोर = आपला हेतु , बेत गुप्त ठेवणारा ; मतलबाचा थांग लागूं न देणारा . मसलतचोर = १ स्वत : ची योजना , मसलत गुप्त ठेवणारा . २ दुसर्याची मसलत फोडणारा , काढून घेणारा . विद्याचोर = १ शिकावयाच्या विद्येचा , शास्त्राचा कांहीं भाग विद्यार्थ्यांपासून चोरून ठेवणारा ; पुरी विद्या न देणारा ( शिक्षक ). २ विद्या चोरणारा ; चोरून शास्त्रीय ज्ञान , गुह्य संपादन करणारा ; नकळत विद्या मिळविणारा ( शिष्य ) इ० . अंगचोर , कामचोर इ० आणखी अनेक सामासिक शब्द आहेत . वरील शब्द कामचोरू , खांदचोरू , अंगचोरू असेहि योजण्याचा प्रघात आहे . [ सं . ] ( वाप्र . ) चोरांची दावण देणें - चोरांची दावण बांधून त्यांचीं डोकीं सडकणें , चाबकानें बडवणें . म्ह० १ चोराच्या मनांत चांदणें = चोराला चांदण्याचें भय वाटतें , कारण त्यांत त्याची चोरी उघडकीस येण्याची भीति असते . चोराचें मन नेहमीं त्यास खात असतें . अपराध्याला नसती शंका येत असते . वाढति सदगुण तों तों प्रेम करिति लोक पांडवावरि ते । चोरासि चांदणेसें तापचि देतें सुयोधना अरितें । - मोमंभा १० . २ चोरावर मोर = एका चोराला लुबाडणारा दुसरा सवाई चोर ; एक वरचढ एक ; शेरास सवाशेर . तो आतां चोरावर मोर होण्याच्या विचारांत गढून गेला होता . - स्वप २१३ . सामाशब्द - ०अंक अंख आंख - पु . १ कापडाच्या गांठीवर , कापडावर , विक्रीच्या वस्तूवर घातलेला , खरी किंमत दाखविणारा , अत्यंत बारीक आंकडा . हा आंकडा दुकानदाराच्या स्वत : च्या उपयोगाकरितां असतो . हा गिर्हाइकास कळवावयाचा नसतो . गिर्हाइकाकरितां किंमतीचा दुसरा मोठा पण खोटा आंकडा दिलेला असतो . २ हस्तलिखित पुस्तकच्या पानावर घातलेला अनुक्रमाचा बारीक आंकडा . ३ ( सामा . ) गुप्त आंकडा . [ चोर = गुप्त , खासगी + अंक = आंकडा ] ओंटी - स्त्री . दिसण्यांत लहान पण फार दूध देणारी ( गाईची , म्हशीची ) ओटी , कांस . ०ओंटी सक्रि . स्त्रीच्या प्रथम गर्भारपणाच्या तिसर्या किंवा चवथ्या महिन्यांत खासगी रीतीनें ( गरोदर स्त्रीस शिंक्याखालीं बसवून ) ओटी भरणें . तीन महिनेपर्यंत स्त्री गर्भार आहे हें निश्चित कळूं शकत नाहीं यावरून या समारंभास चोरओटी म्हणतात . ओटीभरण पहा . [ चोर = गुप्त + ओटी ] भरणें सक्रि . स्त्रीच्या प्रथम गर्भारपणाच्या तिसर्या किंवा चवथ्या महिन्यांत खासगी रीतीनें ( गरोदर स्त्रीस शिंक्याखालीं बसवून ) ओटी भरणें . तीन महिनेपर्यंत स्त्री गर्भार आहे हें निश्चित कळूं शकत नाहीं यावरून या समारंभास चोरओटी म्हणतात . ओटीभरण पहा . [ चोर = गुप्त + ओटी ] ०ओंवा पु. एक प्रकारचा ओंवा . ०कांटा पु. १ तापाची बारीक कसर ; थंडीचा बारीक कांटा ; चोरटा ताप . ( क्रि० येणें ; लागणें ; भरणें ; वाटणें ) २ खोटा तराजू . [ चोर + कांटा = शहारे , तराजू ] ०काठी स्त्री. ( शिकार ) जनावर माणसाळण्याची एक युक्ति . चारपांच मनुष्यें समोरून पन्नास फुटांवरून घोंगडी पांघरून एकदम ओरडत पळत येऊन जनावराच्या पायांजवळ व तोंडाजवळ येऊन पडतात , लोळतात . व तोंड उघडून त्यास गोंजरतात . या क्रियेस चोरकाठी म्हणतात . - चिमा १५ . ०काम न. १ कितीहि केलें तरी दुसर्याच्या डोळयांत न भरणारें काम . २ पार पडल्यावर ज्याचे फारच थोडे अवशेष शिल्लक राहतात असें काम . ०कोनाडा पु. कोनाडयांत असलेला , सहज न कळणारा दुसरा गुप्त कोनाडा . [ चोर = गुप्त + कोनाडा ] ०क्रांत क्रांति - स्त्री . चोरांची पुंडाई ; चोरांनीं केलेली लुटालूट , नासधूस , धुळधाण . [ चोर + क्रांति = पुंडाई , बंड ] ०खडी वि. कोंदणांत बसविलेलें . लेईला अलंकार भूषणें परवडी । दिव्य रत्नें चोरखडी खेवणें तयां । - निगा १२४ . ०खण पु. १ ( पेटींतील , कपाटांतील ) गुप्त कप्पा , खण , पूड . २ घरांतील बिनमहत्त्वाची , बारीक खोली , भाग . [ चोर = गुप्त + खण ] ०खाई स्त्री. मुशाफरावर हल्ला करून लुटण्याच्या सोयीची , खबदाडीची , दर्याखोर्यांतील अडचणीची जागा ; अरुंद खिंड . [ चोर + खाई = खोलगट जागा ] ०खिंड स्त्री. चोरांनीं प्रवाशांना लुटण्याच्या सोयीची दोन डोंगरांतील अरुंद वाट . चोरखाई पहा . ०खिडकी स्त्री. १ एकांतात बसावयाची लहान खिडकी . २ ( ल . ) ( लेखांतील , भाषणांतील ) पकड , सोडवण , छिद्र ; ( लेखांतून , भाषणांतून ) निसटावयासाठीं केलेली संदिग्ध वाक्यरचना , पळवाट . ३ प्रसंगविशेषीं निसटून ; पळून जाण्यासाठीं केलेली लहान व गुप्त खिडकी . ०खिसा पु. आंगरख्याचा , कोटाचा गुप्त खिसा . ०गल्ली स्त्री. ( चोरांना लपण्याच्या सोयीची ) आडगल्ली , बोळ . ०गस्त स्त्री. रात्रीं दुसर्याला कळूं न देतां पोलीस लोक मुकाटयानें जी फेरी घालतात ती ; गुप्तपणें घातलेला रस्त्यावरील फिरता पहारा ; मुकी गस्त ; वाद्याशिवाय गुपचुप घातलेली गस्त . याच्या उलट राजगस्त . [ चोर + गस्त = पहार्याची फेरी ] ०गस्तीनें क्रिवि . लपूनछपून ; कोणास समजूंन देतां ; गुप्तपणें . ( क्रि० वागणें ; येणें ; जाणें ; फिरणें ). याच्या उलट उघडमराठी . ०गांठ स्त्री. गुप्त गांठ ; दिसून न येणारी गांठ . ०घडी स्त्री. अपुरी घडी ; लहान घडी ; गिर्हाईक कापड विकत घेतांना त्याची लांबी घडयांवरून , सळांवरून ठरवितात . म्हणून त्यांना फसविण्यासाठीं व्यापारी एका घडीच्या पोटांत दुसरी लहान अपुरी घडी घालतो ती . ०घर न. गुप्त खोली , कप्पा , खण , खाना . ०घाई स्त्री. १ चोर आले असतां उडणारी धांदल , घाई . २ ( ल . ) अतिशय धांदल ; धांवपळ . ०चाऊल चाहूल - स्त्री . गुप्तपणें ऐकून , पाहून लागलेली एखाद्या माणसाच्या , जनावराच्या अस्तित्वाची , हालचालीची चाहूल , कानोसा . [ चोर = गुप्तपणें + चाहूल = कानोसा , हालचालीचा आवाज ] ०चिरटा चिलटा चिल्लट - पु . चोर वगैरे . हल्लीं चोराचिलटांचा इथें फार त्रास आहे . - भा ५२ . वेळप्रसंग पडल्यास चोराचिरटयांपासून संरक्षण करण्याला उपयोगी पडतील असे शिपाई प्यादे ... ... वगैरे प्रकारचे लोक त्यांजपाशीं फारच थोडे होते . - विंध्याचल १११ . [ चोर + चिलट ; किंवा चोर द्वि . ] ०चुंबा पु. १ गुप्तपणें दिलेला बोळा , दट्टया . २ ( ल . ) लांच . ( क्रि० पडणें ; देणें ). [ चोर + चुंबा = कापडाचा , चिंध्यांचा बोळा , दट्टया ] ०जासूद पु. गुप्त हेर , चार ; टेहळया ; ( इं . ) डिटेक्टिव्ह . - राव्यको १ . १७ . ०ताजवा पु. खोटी तराजू ; चोरकांटा . ०ताप पु. हातास न लागणारा परंतु शरीरांत असणारा बारीक ताप ; हाडी . ज्वर ; तापाचीं सतत असलेलीं बारीक लक्षणें ; चोरटा ताप . [ चोर + ताप ] ०थरा पु. ( महानु . ) खोटें नाणें . चोरमोळा पहा . टाकु पडिला चोरथरा ब्रह्मविद्येचा । - भाए ६३५ ऐसा प्रपंच टांक चोरथरा । मूढीं सुखभोगाचिया मोहरा । - ज्ञाप्र ५८० . ०दरवाजा दार - पुन . गुप्त , खाजगी दार ; मागचें दार . ०धाड धांडा - स्त्रीपु . चोरांनीं केलेला आकस्मिक घाला , हल्ला ; दरवडा ; डांका . ०नजर स्त्री. १ ( दुसर्याला ) नकळत पाहणें ; डोकावून पाहणें , गुप्तपणें टेहळणी करण्याकरितां टाकलेली नजर ; चोरून पाहणें ; चोरटी दृष्टि . घरांतील बायका चोरनजरेनें जावयाकडे पाहतात . - मोर २४ . २ चोरासारखी मुद्रा , चर्या , दृष्टि . [ चोर + नजर = दृष्टि ] ०पडदा पु. १ आंतील गुप्त पडदा . २ शरीराच्या आंतील पडदा ; अंतस्त्वचा ०पण न. ( बायकी ) मुलींच्या खेळांत येणारी चोर होण्याची पाळी . ज्या मुलीवर डाव असतो , ती जर डाव न देतां जाऊं लागली तर इतर मुली तिला आपलें चोरपण दुसरीस देऊन जाण्यास सांगतात , [ चोर + पण ] ०पाइकी स्त्री. चोरून हल्ला करणें . - पया ६६ . - शर . [ चोर + पाइकी ] ०पाऊल पाय - न . पु . आवाज न करतां टाकलेलें पाऊल ; पावलांचा शब्द न करतां चालणें ; चोरटें चालणें ; चोर चाहूल . ०पावलांनीं क्रिवि . मुकाटयानें ; शब्द न करतां . चला चोरपावलांनींच पुरुषोत्तमरावांच्या वाडयांत . - इंप ३१ . ०पाणी न. दुखणेकर्यास , नुकतेंच दुखण्यांतून उठलेल्यास - खोलींत स्नान घालण्याकरितां तयार केलेलें औषधियुक्त तापविलेलें पाणी . ०पान्हा पु. १ धार काढतेवेळीं गाय किंवा म्हैस मुद्दाम कांसेचा संकोच करून दुधाचा कांहीं अंश वासरासाठीं राखून ठेवते तो . २ असें राखून ठेवलेलें दूध बळजरीनें काढतात तें ; गाईनें , म्हशीनें नाखुषीनें दिलेलें थोडें दूध . ३ ( ल . ) लघवी केल्यानंतर पुन्हां थोडथोडी होणारी लघवी ; न कळत लघवीस होणें ; लघवीस थोडें थोडें होणें ; तेज सांडूनि जाय नयना । भिमाना वाढवी । - एभा २२ . ५२८ . [ चोर + पान्हा ] ०पाळत पाळती - स्त्री . आपण दृष्टीस न पडतां दुसर्याची , दुसर्याच्या घरची , बातमी युक्तीनें काढण्याचा प्रकार ; गुप्त रीतीनें ठेवलेली पाळत ; पाळत , पाळती पहा [ चोर + पाळत = नजर ] ०पेठ स्त्री. ज्यांत खोटीं वजनें वापरतात व चोरटा धंदा चालतो असा बाजाराचा गांव , पेठ ; चोरबाजार . ०पोर न. ( समुच्चायार्थी ) चोर ; उचल्या ; भामटा इ० लहानसहान चोर्या करणारीं चोरटीं पोरें ; उचल्ये इ० . ०बातमीस स्त्री. हेराकडून समजलेली गुप्त बातमी ; चोरपाळतीनें कळलेली बातमी . - शिदि २६९ . ०भयस न. चोरांपासून उत्पन्न होणारी भीति . ०भूक स्त्री. १ थोडी शिल्लक राहिलेली , पूर्णपणें न शमलेली भूक . २ थोडेसें खाऊन शांत होणारी भूक ; किंचित भूक . ( क्रि० लागणें ; येणें ; सुटणें ; वाटणें ). ०महाल पु. १ गुप्त जागा , खोली . २ रखेल्या ठेवलेली जागा ; दासीमहाल . ०मळया मुळया - क्रिवि . लपून छपून ; गुप्तपणें ; पाळत ठेवून ; गुपचूप ; गुप्तपणें ( टेहळणें ). ( क्रि० पाहणें ). ०मूठ स्त्री. पकडलेल्या जनावरास तीन दिवस एका जागेवर पडूं देतात , त्यास चोरमूठ म्हणतात . - चिमा ९ . ०मोळा पु. चोरांचा शिक्का ; खोटें नाणें ; चोरथरा पहा . हा चोरमोळा असिका । प्रपंचांचा ठसा लटका । जो प्रवृत्ति पडिला लोकां । अज्ञानांचा । - ज्ञाप्र ५४९ . अवघेचि जालें चोरमोळे । नरदेहावांचौनिया । - भाए २४७ . [ चोर + मोळा ; का . मोळे = खिळा ; म . मोळा = रीत ] ०रान न. चोर , लुटारू इ० कानीं युक्त असें रान . [ चोर + रान ] ०लक्षण न. चोरटेपणाचा स्वभाव दाखविणारी मुद्रा , नजर , चेहर्याचें वळण , चालण्याची धाटी इ० ; ( पाहिलेला मनुष्य ) चोर आहे असें दर्शविणारें लक्षण ; चोरटेपणाची छाप . [ चोर = चोरी करणारा + लक्षण = चिन्ह ] ०वड वंड चोरावडा वंडा चोरवण चोरवाण चोरवें - स्त्रीपुन . चोरांनीं केलेला उत्पात , धुमाकूळ , अनर्थ , नासाडी , लुटालूट ; चोर फार माजल्यामुळें उत्पन्न झालेली दुर्दशा . ( क्रि० सुटणें ; मातणें ; होणें ; माजणें ; उठणें ; मोडणें ; दाबणें ; दबणें ). [ चोर + वड - ण प्रत्यय ] ०वाट स्त्री. गुप्त वाट , मार्ग . किल्ल्यांतून व वाडयांतून बाहेर पडावयास चोरवाटा असत . - कोरकि ३९१ . ०वाडा पु. १ चोरांचा अड्डा ; चोरांची वस्ती . २ ज्या घरांतील सर्वच माणसें चोराप्रमाणें वागतात तें घर . ०विद्या स्त्री. १ गूढ , अज्ञात शास्त्र , कला . २ फारच थोडया लोकांस माहीत असणारी व क्वचितच शिकविली जाणारी विद्या . गुप्त विद्या ; ३ जारणमारणाची , जडीबुटीची विद्या . [ चोर + विद्या ] ०वेळ वेळा - स्त्री . १ दिवसाच्या किंवा रात्रीच्या तीस घटकांचे प्रत्येकीं तीनपूर्णांक तीन चतुर्थांश घटकेचे असे आठ भाग कल्पिले आहेत त्यास अमृतवेळ , काळवेळ , शुभवेळ इ० नांवें आहेत , त्या आठांपैकीं एका वेळेस चोरवेळ किंवा चंचल वेळ असें म्हणतात . वेळ पहा . २ ज्या वेळीं चोरांची विशेष भीति असते ती वेळ . ०शिवण स्त्री. चोरवाडा ; चोरांचा अड्डा ; चोरांचें वसतिस्थान . [ चोर + हट्टी = हाट , बाजार ] ०हरकारा पु. गुप्त दूत . - राव्यको १ . १८ . [ चोर + हरकारा = निरोप देणारा दूत , हलकारा ] चोरापोरी , मोरी , चोरींपोरीं - क्रिवि . चोरांनीं आणि चोरटया उनाड पोरांनीं ; चोर , भामटे इ० कां कडून ( चोरून नेलेला इ० ). गुळाची ढेप चोरापोरीं गेली . [ चोर + पोर ] चोरामोरा - क्रिवि . चोरटया मुद्रेनें ; चोरटेपणानें ; चोरूनमारून . असा चोरामोरा किती दिवस वहिवाटणार . - सूर्यग्र १२९ .
|