|
पु. १ प्राण ; जीवित . २ प्राण असणारा जिवंत प्राणी . सर्व जीवांस ईश्वर पोसतो . ३ लहान कीटक , प्राणी ( चिलट , घुंगरडें , पिसूं , किडा इ० ). या शेणांत जीव झाले आहेत . ४ तेज ; वीर्य ; जोम ; धमक ; पाणी ; शक्ति ; धैर्य ; कार्यक्षमता ; सत्त्व ; सार ( माणूस , घोडा , बैल इ० चें ); ५ यश ; नफा ; राम ; अर्थ ( कार्य , काम , उद्योग यांत ). या व्यवहारामध्यें जीव नाहीं , केला न केलेला सारखा . ६ बळकटी ; स्थैर्य ; मजबुती ; टिकाऊपणा ; भक्कमपणा ( पदार्थ , वस्त्र यांचा ). छत्रीचा जीव हलका म्हणून वार्यानें फाटली . ७ खरेपणा ; सत्यता ; विश्वसनीयता ; मिलाफ ; मेळ ( बातमी वगैरेचा ). या बामतीमध्यें , त्या ग्रंथांत जीव नाहीं . ८ सौंदर्य ; जोर ( लिहिण्याचा ). ९ मन ; प्रवृत्ति ; कल . एक जीव म्हणतो जावें एक म्हणतो न जावें . १० अंतरात्मा ; सचेतन आत्मा ; जीवात्मा ; पहा . त्याच्यासाठीं माझा जीव भारी तडफडतो . ११ देवगुरु बृहस्पति . त्याच्या आला परिसुनि यश निववायासि मन घरा जीव । [ सं . जीव ; प्रा . जीवो ; सिं . जीउ ; हिं . जी ] ( वाप्र . ) ०अधांत्रीं संकटांत पडणें ; भांबावून जाणें ; घाबरून जाणें . उडणें संकटांत पडणें ; भांबावून जाणें ; घाबरून जाणें . ०अर्धा मनुष्याला अतिशय त्रास देणें . सर्व शक्ति खर्च करणें ( श्रम , व्यर्थ शिकवण इ० ). करणें मनुष्याला अतिशय त्रास देणें . सर्व शक्ति खर्च करणें ( श्रम , व्यर्थ शिकवण इ० ). ०अर्धा भिणें ; त्रासलें जाणें ; गर्भगळित होणें ; श्रमणें ; दमणें ; अर्धमेलें होणें . होणें भिणें ; त्रासलें जाणें ; गर्भगळित होणें ; श्रमणें ; दमणें ; अर्धमेलें होणें . ०आटणें १ मरेमरे तों काम करणें . २ अतिशय थकून जाणें ( मेहनत , काळजी इ० नीं ) ०आडकणें टांगणें टांगला असणें - आवडत्या वस्तूच्या प्राप्तीसाठीं घाबरें होणें , काळजी लागणें . ०आंबणें ( क . ) त्रासून ; जाणें कंटाळणें . त्याची उस्तवारी ठेवतां ठेवतां माझा जीव आंबून गेला . ०उडणें १ प्रेम नाहींसें होणें ; विटणें . २ भीतिग्रस्त होणें . ०कयंगटीस ( क . ) १ मेटाकुटीस येणें . २ मुरगळून पडणें . येणें ( क . ) १ मेटाकुटीस येणें . २ मुरगळून पडणें . ०कालविणें गलबलणें ; अतिशय क्षोभ होणें ; घाबरणें ; गडबडणें . ०कीं करणें - अतिशय प्रेम करणें . प्राण करणें - अतिशय प्रेम करणें . ०कोंडाळणें ( ना . ) गुदमरणें . ०कोरडा , पडणें - घसा वाळणें ; थकणें ; अतिशय दमणें ; ( आजार , श्रम , भूक यांनीं ). होणें , पडणें - घसा वाळणें ; थकणें ; अतिशय दमणें ; ( आजार , श्रम , भूक यांनीं ). ०खरडन , सुकणें , रडणें - आकांत करणें ; आक्साबोक्सी रडणें . बोलणें , सुकणें , रडणें - आकांत करणें ; आक्साबोक्सी रडणें . ०खाणें घेणें जिवास खाणें - एखाद्याच्या जिवास त्रास देणें ; झुरविणें . ०खावून करणें - मनापासून काम करणें . काम करणें - मनापासून काम करणें . ०खालीं उत्कट इच्छा पूर्ण होणें . अतिशय घाबरणें . जों जों देखे देव कांखेंत बोळा । तों तों त्याचा होतसे जीव गोळा । - आसु २६ . पडणें उत्कट इच्छा पूर्ण होणें . अतिशय घाबरणें . जों जों देखे देव कांखेंत बोळा । तों तों त्याचा होतसे जीव गोळा । - आसु २६ . ०घेऊन जीव वांचविण्यासाठीं पळून जाणें . पळती जीव घेवूनिया । पळणें जीव वांचविण्यासाठीं पळून जाणें . पळती जीव घेवूनिया । ०जाळणें मारणें - निग्रह करणें ; दमन करणें ( कामेच्छा , पाप वासना ; मनोविकार यांचें ). ०टाकणें १ प्राण सोडणें २ निराश होणें ; चित्त स्वस्थ नसणें . ३ फार उत्कंठा लागणें ; अतिशय हट्ट , छंद घेणें . ४ ( पूर्वकालवाचक धातुसाधित याच्या पाठीमागें असेल तर . जसें - रडून - हंसून - खणून - जीव टाकणें )= रडणें ; हांसणें ; खणणें ( अतिशय जोरानें व प्रयत्नानें ). ०टाकून अतिशय त्वरेनें , घाईनें , एकदम पळणें ; भिऊन पोबारा करणें . पळणें अतिशय त्वरेनें , घाईनें , एकदम पळणें ; भिऊन पोबारा करणें . ०टांगणीस १ एखाद्या वस्तूवर प्रीति बसणें . २ चिंताग्रस्त होणें . लागणें १ एखाद्या वस्तूवर प्रीति बसणें . २ चिंताग्रस्त होणें . ०ठिकणीं अस्वस्थ असणें ; चैन न पडणें . नसणें अस्वस्थ असणें ; चैन न पडणें . ०डहळणें मळवणें - ( ना . ) मळमळणें . ०तुटणें १ अतिशय थकणें . २ तळमळ लागणें . एखाद्याचा ध्यास लागणें ; एखाद्याबद्दल अतिशय काळजी वाटणें . ०तोडणें दु : खानें सचिंत होणें . ०तोडून अतिशय मेहनतीनें करणें . ( काम , धंदा ) करणें अतिशय मेहनतीनें करणें . ( काम , धंदा ) ०थारीं स्वस्थपणा असणें . असणें स्वस्थपणा असणें . ०थारीं अस्वस्थ असणें ; चैन न पडणें . थोडा थोडा होणें - ( ग्लानि , देणें इत्यादि कारणानीं ) अतिशय चिंताग्रस्त होणें ; काळजी लागणें ; भीति वाटणें ; फार दु : ख होणें ; धैर्य खचणें . नसणें अस्वस्थ असणें ; चैन न पडणें . थोडा थोडा होणें - ( ग्लानि , देणें इत्यादि कारणानीं ) अतिशय चिंताग्रस्त होणें ; काळजी लागणें ; भीति वाटणें ; फार दु : ख होणें ; धैर्य खचणें . ०देणें १ आत्महत्त्या करणें . २ सगळें लक्ष घालणें ; लक्ष देऊन करणें ; पुष्कळ प्रयत्न करणें . ०धडघड काळजी , भीति वाटणें . करणें काळजी , भीति वाटणें . ०धरणें नवीन शक्ति मिळविणें ; रंगारूपास येणें ; बरें व्हावयास लागणें . जगणें , वाढीस लागणें , ( झाड वगैरे ) ०धरून १ धैर्य धरून ; उत्सुकतेनें ; उत्साहानें ( कृत्य करणें ). २ जिवंत राहून ; अस्तित्व ठेवून ( कसा तरी याला जोडून योजना ). ०धुकुडपुकुड ( ना . ) घाबरणें . करणें ( ना . ) घाबरणें . ०पछाडणें मोठया कळकळीनें , लाचारीनें नम्र होणें . ०पडणें एखाद्या गोष्टींत मनापासून शिरणें ; गोडी लागणें ; तत्पर होणें . ०पाखडणें १ अतिशय मेहनत करणें ; प्रयत्न करणें . २ जळफळणें ; तडफडणें . ०पोळणें १ दु : ख होणें . २ चट्टा बसणें ; धडा मिळणें . ०प्यारा जीवाविषयीं अतिप्रीति दाखविणें . म्ह० ज्याच्या त्याला जीव प्यारा . असणें जीवाविषयीं अतिप्रीति दाखविणें . म्ह० ज्याच्या त्याला जीव प्यारा . ०फुटणें अतिशय उत्सुक होणें . तुझे भेटीसाठीं निशिदिवस माझा जिव फुटे । - सारुह ६ . १५८ . ०बसणें ( एखाद्यावर ) मन बसणें ; प्रेम करणें ; शोक असणें . ०भांडयांत जीव स्वस्थ होणें . पडणें जीव स्वस्थ होणें . ०मट्टयास दमणें ; अगदीं थकून जाणें . येणें दमणें ; अगदीं थकून जाणें . ०मुठींत १ काळजीपूर्वक स्वत : चें संरक्षण करणें ( धोक्यामुळें ). २ स्वत : वर दाब ठेवणें ; आत्मसंयमन करणें . धरणें १ काळजीपूर्वक स्वत : चें संरक्षण करणें ( धोक्यामुळें ). २ स्वत : वर दाब ठेवणें ; आत्मसंयमन करणें . ०मोथा मोठा जीव करणें - १ जोराचा प्रयत्न करणें ; धैर्य धरणें . २ उदार होणें ( खर्च करण्यांत ) मन मोठें करणें . ०रखमेस ( कु . ) कंटाळा येणें ; त्रासणें . येणें ( कु . ) कंटाळा येणें ; त्रासणें . ०राखणें जीवाचें रक्षण करणें ; आळसानें काम करणें . ०लावण प्रेम करणें ; माया लावणें . ०वर वरता धरणें - अतिशय उत्सुक होणें ; उत्कंठा लागणें . ०वारा उदास भासणें ; भयाण वाटणें . पिणें उदास भासणें ; भयाण वाटणें . ०सुकणें अशक्त , व्याकुळ होणें . ०सुचिंत काळजींत असणें . नसणें काळजींत असणें . ०सोडणें १ मरणें . २ जीव धोक्यांत घालणें ; स्वत : च्या जीवाची आहुति देणें . ३ अतिशय इच्छा दर्शविणें . ४ आजारी माणसावरून कोंबडें ओवाळून टाकणें ( यानें आजा र्याचा रोग कोंबडयावर जाऊन तें मरतें अशी समजूत ). जिवा आंगळा - वि . एखाद्याच्या काम करण्याच्या शक्तीच्या बाहेर . जिवाचा कलिजा - वि . प्राणापेक्षांहि प्रिय . जिवाची गोष्ट , जिविंची गोष्ट - अन्त : करणांतील गोष्ट . येरू सांगे जीविंची गोष्टी । त्यांची आवडी लागली पोटीं । - भाराबाल २ . १७ . जिवाची ग्वाही , पाखी देणें - खात्रीपूर्वक सांगणें . जिवाचा घात करणें - १ आटोकाट प्रयत्न करणें ; जिवापाड मेहनत करणें . २ अतिशय छळणें ; गांजणें ( जीव जाईपर्यंत ). जिवाचा घोंट घेणें - जीवाचा घात करणें ; मरेपर्यंत छळणें . जिवाचा धडा करणें - साहसाचा प्रयत्न करण्यास तयार होणें . जिवाचा लोळ करणें - १ जीव बेदम करणें ; जिवाला त्रास देणें . २ ( ल . ) फार मेहनत घेणें . जिवाची कोयकाय करणें - ( कुत्र्यासारिखे भुंकावयास लावणें म्हणजे ) अतिशय जिवाचा सोबती - वि . आयुष्याचा सोबती ( नवराबायको , रोग ). जिवाची राळवण करणें - अतिशय काम करणें ( राळयाच्या काडीसारखे होणें ); त्रास घेणें . जिवाची हुल्लड करणें - मोठा नेटाचा प्रयत्न करणें . जीवा अगोचर , जिवा अगोचर - वि . शक्तीच्या बाहेर . जिवाचे चार - चार करणें - थेर करणें ; नाचणें ; चैन , विलास करणें . जिवाचें रान करणें - अतिशय कष्ट सोसणें . जिवाच्या गांठीं बांधणें - मनांत नीट ठसवून किंवा बिंबवून घेणें . तरी हा अर्थू जिवाचिया गांठी । कां न बांधावा । जिवांतजीव आहे तोंपर्यंत - मरण येईपर्यंत ; जन्मभर ; सदासर्वदा . माझ्या जिवांत जीव आहे तोंपर्यंत मी तुला सोडून चार दिवस देखील रहाणार नाहीं . जिवांत - जीव घालणें - १ उत्तेजन देणें ; सांत्वन करणें ; धैर्य पुन्हां येणें ; धीर येणें . जिवानिशीं - जिवासकट . जिवानिशीं जाणें - मरणें ( जुलुमानें , अकालीं ). म्ह० शेळी जाते जिवानिशीं आणि खाणार म्हणतो वातड . जिवापरता - १ सहन करण्याच्या बाहेर ( श्रम , आजार ). याला जिवापरतें दुखणें आलें आहे निभावेल तेव्हां खरा . २ प्राणापेक्षां प्रिय . जिवापलीकडे - जिवापेक्षां प्रिय . जिवापाड , जिवापाडें - क्रिवि . जिवाचें मोल देऊन , शक्तीबाहेर . जिवाभावाचा - पु . ( सोबती , चाकर , पदार्थ , गोष्ट , काम ) आपल्या स्वत : च्या संबंधीं , लाडका , आवडता , मूल्यवान वगैरे . जीवाभावाला , जीवाभावास - क्रिवि . स्वत : साठीं ; स्वत : ला ; विशेष जरूरीकरतां . हें पांचशें रुपये जीवाभावास ठेविले . जिवाभावानें , जीवेंभावें - क्रिवि . अन्तकरणापासून ; प्रीतीनें ; मनापासून ; उत्साहानें ; नेटानें . जिवाभ्यास , जिवाभ्यासानें - क्रिवि . आपलेपणाच्या भावानें ; अगदीं मनापासून . जिवाभ्यासानें जेव्हां श्रम करावा तेव्हांच फलप्राप्ति . जिवाला खाणें - तडफडणें ; झुरणें ; मनाला लागणें . जिवाला करवत लागणें - अतिशय चिंता लागणें . जिवाला कांहीं , तरी करून घेणें - आत्महत्या करणें ; जीव देणें . - ला खाणें - मनाला लागून राहणें ; झुरणें ; झिजणें . जिवावर - स्वत : च्या शक्तीवर , श्रमावर , बुध्दीवर ( जगणें , काम करणें ). जिवावर उठणें - दुसर्यावर अवलंबून आपला उदरनिर्वाह चालविणें . जिवावर उडया मारणें - दुसर्याच्या पैशावर , मदतीवर चैन बढाई मारणें . जिवावर उदार - जिवाची पर्वा न करणारा . म्ह० जिवावर उदार तो लाखांकीं झुंजार . जिवावरचा - जीव धोक्यांत घालणारा ; जीवघेणा . जिवावरचा , लाग , पाळी , गोष्ट , प्रसंग , खेळ , काम - लागलीच , तात्काळ येणारा धोका , संकट इ० ; जीव जाण्याचें भय असणारी गोष्ट . जिवावरचा ताप , ज्वर , रोग , दुखणें - प्राणघातक ताप , आजार इ० . जिवावरचें आधण उतरणें - कठिण प्रसंगांतून बचावणें , निभावणें . जिवावर द्वारका करणें - एखाद्याच्या आधारावर आश्रयावर चैन करणें ; महत्कृत्य करणें ; मोठा उपकार करणें . तुमच्या जिवावर एवढी द्वारका केलें घरदार दोमजली । - पला ८५ . जिवावर येणें , जिवावर बितणें , बेतणें , जिवाशीं गांठ पडणें - १ जीव धोक्यांत पडणें ; मोठें संकट ओढवणें . २ दुष्कर वाटणें . ३ चिडणें . जिवावर लाल - वि . दुसर्याच्या मदतीवर चैन करणारा . जिवाविशेष - क्रिवि . स्वत : च्या शक्तीच्या पलीकडे . जिवासांड - वि . जीवाला धोका येण्याइतका ( आजार , त्रास ). जिवाशीं , जिवीं धरणें , बांधणें - अतिशय प्रीति करणें ; बहुमोल वाटणें . काय इणें न धरावें अधनत्वें भूप - जन - वरा जीवीं । - मोवन १३ . १४ . जिवास जहानगिरी करणें , जिवास जहानगिरी होणें - जीवावर मोठें संकट येणें , आणणें ; संकटाचा प्रसंग ओढवणें . जिवास जीव देणें - प्रिय माणसासाठीं आपला जीव देणें . जिवास मुकणें - मरणें ; मृत्यु पावणें . जिवींचा - प्राणप्रिय ; जिवलग . जिवीं लागणें - १ आवडीचा असणें ; प्रिय वाटणें . २ मर्मभेद होणें ; जिवाला लागणें . जिवे धुस जाणें - धस्स होणें ; जीवांत धडकी भरणें . तुमते एतां देखिलें । तैंची माझां जीवें धुस गेलें । - शिशु १२५ . जिवें वाचणें - एखादें संकट टळून जिवंत राहणें ; जीव जाण्याचा प्रसंग असतां जीव न जातां बचावणें . आजी आम्हां येथें राखियलें देवें । नाहीं तरी जिवें न वांचतों । म्ह० १ ज्याच्या त्याला जीव प्यारा . २ जीवो जीवस्य जीवनम . सामाशब्द - ०कण पु. अल्प जीवदशा ; जीवांश . जीवकणु जयाचा उपमदें । - ज्ञा १८ . १२७२ . ०कळा स्त्री. जीवंत माणसाच्या तोंडावरचें तेज . याच्या उलट प्रेतकळा . ०कोश पु. ( काव्य . ) प्राणाचें , आत्म्याचें आवरण ; शरीर . तैसें हिरण्यागर्भाचें अंश । प्रसिध्द जीवकोश । ०खडा पु. ( कुण , आगरी ) अश्मा . - बदलापूर ४१ . ०घात न जीविताचा नाश ; वध . ०घातक घातकी - वि . १ प्राणाचा नाश करणारा . २ छळ करणारा , त्रासदायक . ०घेऊ घेणा घेण्या - वि . १ जीव जाईपर्यंत त्रास देणारा ; लोचट ( भिकारी ). २ भारी कठिण ( काम ). जंतु - पु . १ लहान किडा , प्राणी ; किडामुंगी इ० २ - अव . सर्प प्राणिमात्र . ०डा पु. क्षुद्र जीवजंतु ; जिवडा पहा . नाहीं भात वडा तया दहिंवडा कैंचा ग तों जीवडा । - आसु ५ . - पु . क्षुद्रजीव , प्राणी ( साप , किडा - मुंगी इ० ). ०डवाळ स्त्री. जीवाची उपाधि . हें अज्ञानकृत जीवडवाळ । - रंयोवा ८ . १४३ . ०त्व न. चैतन्य ; जीवदशा . जीवत्वदुर्गीं आडिला । - ज्ञा १७ . २ . ०दयासंघ पु. प्राणिमात्रावर दया दाखविणारी , प्राणिमात्राचा जीव वांचविण्याचा प्रयत्न करणारी मंडळी ; गोरक्षण वगैरे करणारी समिति . ०दशा स्त्री. १ आयुष्य ; अस्तित्व ; सचेतन स्थिति . जीवदशा तोंपर्यंत संसार . २ आत्मज्ञानावांचून जन्ममरणाच्या फेर्यांत असावें अशी अवस्था . ०दान न. १ जीविताचें देणें , देणगी ; प्राण न घेणें . २ दुसर्याच्या प्राणांचें संरक्षण . ( क्रि० करणें ; देणें ). या रोगास कांहीं औषध देऊन तुम्ही मला जीवदान द्याल तर पहा . एखाद्या संकटांतून वांचविणें . ०दार वि. १ सचेतन ; जिवंत . २ ( ल . ) धैर्यवान ; पाणीदार ; जोरदार ; शक्तिवान . ३ रसयुक्त ; रसाळ . ४ ( ल . ) फायदेशीर ( धंदा , उद्योग ). ०धन न. गुरेंढोरें , जंगम मालमिळकत . ०धर्म पु. अविद्या कामकर्मादिक . ०धोंडा पु. ( कों . ) अश्मा जीवखडा . ०पापी ( पापी आत्मा , बिघडलेला आत्मा ) स्वत : मध्यें किंवा दुसर्यांत दुष्ट विचार आढळल्यानंतरचा दु : खाचा उद्गार . ०प्राण पु. १ जीव आणि आत्मा ; प्राण ( जोर देण्यासाठीं वापरतात ). मी तुजसाठीं जीवप्राण देतों . २ आवडता माणूस ; लाडका ; जीव कीं प्राण असा माणूस , मित्र . ०भय न. जीव जाण्याचें भय . ०भाव पु. १ जिवाचा भाव ; इच्छा ; मनीषा . मागणें तें तुज मागों । जीवभाव तुज सांगों । - तुगा १५७८ . २ आत्मा ; स्वत : ( जोरदार अर्थी ). ३ जीवदशा . हरिला कंसाचा जीवभाव देवें । ०योनि स्त्री. १ सरपटणारे प्राणी ; क्षुद्र कीटक इ० चा वर्ग . २ जरायुज प्राणिवर्ग , योनि पहा . ०रखी स्त्री. ( कों . ) देवाचा नक्षीदार देव्हारा . ०रस पु. जीवन देणारा रस ; ( इं . ) प्रोटोप्लॅझम . ०लग वि. १ ( जीवास आश्रयभूत , आधारभूत ) आवडता ; प्राणप्रिय ( पति , ईश्वर ). माझिया जिवलगाविण । न करी मी मंगल ध्यान । २ आप्त ; मित्र . जीवलग जीव घेती । - दावि पृ . ६७८ . ०शक्ति स्त्री. प्राणशक्ति ; ( इं . ) व्हायटलफोर्स . ०शास्त्र न. लहान जीवासंबंधीं शास्त्र ; ( इं . ) बायॉलॉजी जीवस - वि . जीवट . जीवसृष्टि - स्त्री . सचेतन सृष्टि . स्वर - पु . ( संगीत ) वादी पहा . ०हत्या स्त्री. जीवजंतु यांचा नाश , वध , खून ; प्राणिहत्त्या ; हिंसा . जीवश्चकंठश्च - वि . अत्यंत घरोब्याचा ; अतिशय दृढ ( मित्र , मैत्री ). एकजीव जाणें , एकजीव येणें - मरणाच्या दारीं असणें ; शेवटची घटका येणें . एकजीव होऊन जाणें - एकत्र होणें ; सांधून जाणें ; एकरूप , एकच होणें .
|