Dictionaries | References

झील

   
Script: Devanagari
See also:  झिलइ , झिलई , झिलाई , झिल्लई , झिल्ली , झिल्हई , झिल्हाई

झील     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
noun  लम्बा-चौड़ा जलाशय विशेषकर प्राकृतिक   Ex. वह झील में नहा रहा है ।
HYPONYMY:
साँभर क्षिप्र मानसरोवर ण्य राजसमन्द झील पंपासर डल झील अरुण मिशिगन जेनेवा झील
ONTOLOGY:
भौतिक स्थान (Physical Place)स्थान (Place)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
सरोवर सर लेक अखात ह्रद जल्ला
Wordnet:
asmসৰোবৰ
bdबिलोमा
benঝিলে
kanಸರೋವರ
kasجیٖل , سَر
malതടാകം
mniꯄꯥꯠ
nepताल
panਝੀਲ
sanह्रदः
tamஏரி
urdجھیل

झील     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
See : पूत

झील     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
. The same with री ओढणें or धरणें. झील चढणें g. of s. To advance in honor or dignity. झील चढविणें To shave clean. 2 To give one lustre; to make honorable.

झील     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  Brightness, lustre, gloss, polish. Shake or quaver,
झील उडणें-उतरणें-बिघडणें   To lose or decline in one's honour or reputation.
झील ओढणें, देणें   To support the second. The same with री ओढणें or धरणें.
झील चढणें   To advance in honour or dignity.
झील चढविणें   To shave clean.

झील     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  तमाशा इत्यादींत मुख्य गायकाने म्हटलेला भाग साथीदारांनी म्हणून सुरांचा अवरोह शेवटास नेण्याची जी साथ करायची असते ती   Ex. शाहीर पोवाडा गाऊ लागले आणि आम्ही मागे झील धरली.

झील     

 स्त्री. ( संगीत ). १ गाण्यांतील सफाई , ठाकठिकी . २ गाणार्‍या कंठाचा कंप ; गिटकडी . ३ ( वाद्य . ) संबळाच्या दोन टिमक्यांपैकीं लहान आकाराची खणखणीत आवाजाची टिमकी ( मोठया व ढब आवाजाच्या टिमकीस बंब म्हणतात ). ४ ( क . ) चौघडा . झील सुरू करा . ५ एक प्रकारचें चर्मवाद्य . हें कडया एवढया टिमकीच्या आकाराचें असून याला प्राय ; कडयाच्या मधून सभोंवार खाचा पाडून लोखंडी अगर पितळी गोल पत्र्या किंवा झांजा बसविलेल्या असतात . ६ ( तमाशांत ) गाण्यांतील पालुपद ; ( तमाशांतील ) पुढील गाणारांनीं म्हटलेल्या भागाचें मागील साथीदारांनीं पालुपद म्हणून सुरांचा आरोह शेवटास नेण्याची जी साथ करावयाची असते ती . ७ ( व . ) बैलाच्या गळयांतील घुंगरमाळ . [ सं . झिल्ली ; हिं . झील ; फा . झील ] ( वाप्र . )
वि.  हलकें . कां मेघाचें आंग झील । दिसे वारेनि जैसें जाईल । - ज्ञा १३ . २१३ . - क्रिवि . हळू ; मंदपणें . [ प्रा . दे . झिल्ली = लहरी , तरंग ? ]
 पु. १ मुलगा ; झिलगा . ( कों . गो . ) झीलो . तूं नंदाचो झीलो , माकां फडको दी । - भज ८ . - भवि ३५ . ५५ . २ एका झाडापासून केलेलें , उत्पन्न झालेलें दुसरें झाड . हा आंबा त्या आंब्याचा झील आहे . ३ ( ल . ) जवळजवळ नष्ट झालेल्या वंशांतील जिवंत मनुष्य , वंशाचा अंकुर . [ सं . झला = मुलगी ]
 न. ( प्रां . ) एका टोंकास जाळी लावलेली , झाडावरून आंबे इ० काढण्याची बांबूची आंकडी ; झेला . [ झेलणें ]
 स्त्री. ( गो . ) १ दाट झाडी . २ ( गो . ) ( विटीदांडूच्या खेळांतील ) एक सप्तक ; झकू .
 स्त्री. तकाकी ; चकाकी . जिल्हई पहा . झिलीची , झिल्हईची , झिल्लेची माती , झिल्हई , झिल्ली - स्त्री . भांडीं , हत्यारें साफ करण्याकरितां वापरतात ती पिवळसर तांबडी माती .
 स्त्री. रत्न इ०कांवरील तेज . [ अर . जिला ; म . जिल्हई ] ( वाप्र . ) एखाद्याची झील उडणें , एखाद्याची झील उतरणें , एखाद्याची झील बिघडणें - ( एखाद्याचें ) वैभव खालावत जाणें , नष्ट होणें ; कीर्तीचा , मानमरातबाचा नाश होणें . झील चढणेंस - ( कर्त्याची षष्ठी ). ( एखाद्याच्या ) वैभवाची , मोठेपणाची भरभराट होणें . झील चढविणें - १ अगदीं तकतकीत , साफ हजामत करणें , तासणें . २ ( एखाद्यास ) नांवारूपास आणणें ; प्रतिष्ठा मिळवून देणें ; मोठेपणाला चढविणें .
 पु. १ पाणथळ , दलदलीची जागा , जमिनीचा ओलावा दमसपणा ; आर्द्रता ; ओलसरा . एकेकडून पानें व शेरणीचीं बेटें व पाणियाची झील असे अडचणींत उतरलों . - भाब ५६ . २ झरा ; ओहोळ . [ सं . क्षीर . हिं . झील = सरोवर ] झीलाण - न . झिलाण पहा . [ झील ]
०ओढणें   धरणें देणें - १ ( दुसरा ) गातानां त्याच्या सुराची साथ करणें . २ ( ल .) ( एखाद्याचा ) अनुवाद करणें ; री ओढणें , धरणें . झीलकरी झील देणारा - पु . ( तमाशांतील ) मुख्य गाणार्‍याची झील ओढणारे , धरणारे , सुरकरी . [ झील + करणें ]

झील     

झील उडणें-उतरणें-बिघडणें
चकाकी नाहीशी होणें
निस्‍तेज होणें.
वैभव खालावत जाणें
कीर्ति, मानमरातब वगैरे नष्‍ट होणें
तजेला उतरणें.
झील ओढणें-धरणें-देणें
झील ओढीत जाणें
गातांना सुराची साथ करणें.
री ओढणें
अनुवाद करणें. ‘टाईम्‍स ऑफ इंडिया, पायोनिअर आदिकरून तुमचे लिहिणे आधारभूत धरू झील ओढीत गेले.’-विक्षिप्त ३.२०.

झील     

नेपाली (Nepali) WN | Nepali  Nepali
See : ताल

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP