Dictionaries | References

तळपणे

   
Script: Devanagari

तळपणे     

क्रि.  चकाकणे , चमकणे , झळकणे , तकतकणे , विराजणे , शोभणे .

तळपणे     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
verb  डोळे दिपतील असे चमकणे   Ex. मध्यान्हीचा सूर्य तळपत होता.

तळपणे     

अ.क्रि.  ( उन्हाच्या तापाने ) भाजणे ; पोळणे ; तळतळणे ; होरपळणे . [ तळप ]
अ.क्रि.  १ ( काव्य . ) चमकणे ; चकाकणे ; तकतकणे ; झळकणे . जे द्वेषाच्या आवर्ती दाटत । मत्सराचे वळसे पडत । माजि प्रमादादि तळपत । महामीन । - ज्ञा ७ . ७२ . शोभणे ; खुलणे । मकरकुंडले तळपती श्रवणी । - तुगा १ . २ फिरविले , परजले जाणे ( तलवार इ० शस्त्र ). ३ चलनवलन करणे ; हालणे . पै पणियाचिये भूमिके । पाणी तळपे कौतुके । ते लहरी म्हणती लौकिके । एर्‍हवी ते पाणी । - ज्ञा १३ . ६०९ . ४ ( एखाद्या वस्तूभोवती ) घिरट्या घालणे ; भोवंडत , तरंगत राहणे ; घोंटाळत , गुटमळत राहणे . मग हाती घेऊन असिलता । रुक्मिया तळपे रथाभोवता । - ह २४ . ६८ . ५ हपापणे . की मज खायासि गृध्र तळपावे । - मोउद्योग ९ . ३७ . [ तुल० का . तळपु = तेज , प्रकाश ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP