|
स्त्री. गंधक , सोरा व कोळसा यांचे विवक्षित प्रमाणांत केलेले मिश्रण ; बारुत - द . हे ज्वालाग्राही असून स्फोटकहि आहे . दारु बंदुकी , फटाकडा , सुरुंग इ० कांत ठासतात . हिच्या स्फोटकपणाचा शोध इ . स . १३१३ मध्ये लागला . [ फा . दारु ] स्त्री. १ मद्य ; एक प्रकारचे मादक पेय . २ औषध . [ फा . दारु ] ( वाप्र . ) न. लांकूड ; काष्ठ . जळी तुंबिका दारु तैसा तरंगे । - मुरायुद्ध ३४ . [ सं . तुल . तरु , द्रु ; झें . दौरु ; ग्री . दोरु ; गॉ . त्रिउ ; इं . ट्री ; लिथु . देर्वा ] ०ठासणे रगडून , गटागट , ढसढस दारु पिणे . ०चिनी स्त्री. दालचिनी . ०चा - पु . दारु हातांत घेऊन लोकांच्या अंगावर पेटवून फेकण्याकरितां बाळगलेला , केलेला गोळा . डल्ला - पु . दारु हातांत घेऊन लोकांच्या अंगावर पेटवून फेकण्याकरितां बाळगलेला , केलेला गोळा . ०पिकविणे पिण्याची दारु तयार करणे . ०यंत्र दारुकायंत्र - न . लांकडी बाहुली . जैसे चेष्टे सूत्राधीन । दारुयंत्र । - ज्ञा १ . ८१ . ०रुप वि. लांकडाचा ; लांकडासारखा . म्हणे स्तंभी दारुरुप । दारुमध्ये चित्स्वरुप । - वामन - नृहरिदर्पण ९७ . ०चा - पु . ( ना . ) एक शस्त्रविशेष . याला एक मोठी व पोकळ मूठ असून तीत दारु भरलेली असते . पुढे तरवारीसारखे तीक्ष्ण पाते असते . मुठीतील दारु पेटविल्याने पाते सारखे हालते व आसपासचे लोक कापले जातात . - नागपूर म्युझियम . सामाशब्द - ०चे - न . कडक , निर्भेळ , गाळलेली दारु . सामाशब्द - ०दळद स्त्री. एक औषधी काष्ठविशेष . ही वेल हिमालय , अफगाणिस्तान यांत होते . तसेच आसाम आणि पूर्वबंगालपासून तेनासरीमच्या प्रदेशांतहि ह्या वेली आढळतात . हिचे लांकूड हळदीप्रमाणे पिंवळ्या रंगाचे असते . त्यापासून रसांजन नांवाचे औषध तयार करितात . - वगु ४ . १९ . दारुहळदीच्या मुळ्यांपासून पिवळा रंग काढतात . - ज्ञाको ( द ) ७६ . [ दारु + हळद ; सं . दारुहरिद्रा ; दारुहालदी ] फूल - न . कडक , निर्भेळ , गाळलेली दारु . सामाशब्द - बाण - पु . ( ना . ) एक शस्त्रविशेष . याला एक मोठी व पोकळ मूठ असून तीत दारु भरलेली असते . पुढे तरवारीसारखे तीक्ष्ण पाते असते . मुठीतील दारु पेटविल्याने पाते सारखे हालते व आसपासचे लोक कापले जातात . - नागपूर म्युझियम . सामाशब्द - ०काम न. १ आतषबाजी ; अग्निक्रीडा . २ आतशबाजीची सामग्री ; दारु आंत घाऊन बनविलेले नळे , चंद्रज्योई , बाण इ० वस्तु . [ दारु + काम ] ०कलाली स्त्री. १ दारु गाळणे . २ दारु गाळण्याबद्दलचा कर . आबकारी अर्थ १ , २ पहा . [ दारु + कलाली ] ०खाना पु. दारुचा पिठा ; गुत्ता . [ दारु + फा . खाना ] दारुड्या वि . दारुबाज ; अतिशय दारु पिणारा . [ दारु ] ०खाना पु. १ दारुचे कोठार . २ दारु करण्याचा कारखाना . ३ दारुकाम ; आतशबाजी . दारुखाना सुटला रात्री नऊ वाजतांनी । - गापो ७४ . [ दारु + फा . खाना = घर ] ०फुलसरा पु. फुलचेरी ( पांडेचेरी ) येथील फिरंग्याकडील मद्य ; शराब ; गाळलेली दारु . फिरंगी गोरे व किरस्ताव जदीद ... यांस दारुफुल्सरा नेहमी पाहिजे ... - वाडसमा २ . ३०० . ०गोळा पु. युद्धात उपयोगी पडणारे दारु , तोफेचे गोळे इ० सामान . ०बाज खोर - वि . खूप दारु पिणारा ; मद्यपी ; दारुड्या . [ दारु + बाज , खोर प्रत्यय ]
|