|
स्त्री. १ काळजी ; परवा ; भीड . येथे दिक कोठे आहे ! राज्य बुडते ही काळजी कोठे आहे . - ख १० . ५३४३ . २ अडथळा . शिंदे बहुत वाढले आहेत , काही दिक्क राहिली नाही ; तर शिंदे यांस जरब बसे असा मन्सबा योजिला आहे . - ख १० . ५३४४ . - वि . १ क्षीण ; बेजार ; दमलेला ; आजारी . हगवणीने दिक्क झाले आहेत . - ख १० . ५२७३ . २ त्रस्त ; विटलेला . अंतर्यामी नबाब बहुत दिक्क व विचारांत . - रा ५ . १६२ ३ खप्पा ; नाखूष . वयनीची मर्जी खर्चाची वोढ पडल्यामुळे दिक्क आहे . - ख ११ . ६००९ . ४ थक्क ; चकित . [ अर . दिक्क ] स्त्री. १ दिशा . २ मर्यादा . ३ दहा संखेचा वाचक शब्द . ( समासांत ) दिक्पाल ; दिग्भेद ; दिक्साधन . [ सं . ] ०अंत पु. १ ( दिगंत ) दृश्य क्षितिज . २ पृथ्वीचा शेवट ; तिचा सीमांतप्रदेश ; अंतिम टोंक . दिगंती जाणे सर्व पृथ्वीवर पसरणे ; चोहोंकडे फैलावणे ( कीर्ति , सुवास , इ० ). या राजाची कीर्ति दिगंती गेली . ०हरकत स्त्री. अडथळा . हे करुन दिले इनामती कोणी दिक हरकत करणे निसबत नाही . - रा ३ . ५०२ . ०अंतर न. ( दिगंतर ) लांबचा , परका देश - दिशा ; दूरदेश . दिगंतरावरुन माल आला . तप्तता ; ताप ; तलखी , जळजळ . ज्वराने आज भारी दाह होतो . दाह झाला म्हणजे मगजास किंवा मणक्याच्या रज्जूस विशेष चेतना होऊन हातपायांस अंतरी क्रिवि . पृथ्वीच्या अगदी शेवटाच्या सीमेपर्यंत ; दिगंती ( कीर्ति इओ पसरणे ) ( येथे अंतर हा शब्द अंत याअर्थी चुकीने योजिला आहे ). ०अंबर वि. ( दिगंबर ) १ दिशा हेच वस्त्र नेसलेला - म्हणजे नागवा ; नग्न . २ महादेव . ३ दत्तात्रेय . ४ परमहंस संन्यासी . ५ या नांवाचा जैन धर्मातील एक पंथ . ०अंश न. ( दिगंश ) सूर्य तारे किंवा इतर ग्रह हे क्षितिजाच्या ज्या बिंदूंत उगवतात किंवा मावळतात तो बिंदु आणि क्षितिजावरील पूर्व किंवा पश्चिम बिंदु यांमध्ये जो कंस होतो तो . ( इं . ) को - अ झिमथ . ०कंठ पु. ( दहा दिशांवरुन , दहा तोंडांचा ) रावण . ०गज पु. ( दिग्गज ) १ पृथ्वीच्या अष्ट दिशांस असणारा व तीस आपल्या डोक्यावर उचलून धरणारा एकएक हत्ती . ऐरावत , पुंडरीक वामन , कुमुद , अंजन , पुष्पदंत सार्वभौम , प्रतीक अशी त्यांची नांवे आहे . पृथ्वी डळमळील म्हणौनि " दिग्गज ठेविले दडपण । - स्वादि १३ . ४ . २५ . २ ( ल . ) सुंदर व धिप्पाड माणूस . ३ जाडा पंडित ; बडाविद्वान . ४ ( थट्टेने ) अवाढव्य , राक्षसी , दांडगा माणूस . ०चक्र न. सर्व जग ; अखिल विश्व . दिग्चक्री तेज न माये । ०दर्शन प्रदर्शन न . १ किंचित निर्देश ; सूचना ; दर्शन ; दिशा दाखविणे . २ स्वरुप , पद्धति इ० ची स्थूल कल्पना आणून देणे ; सामान्य माहिती . ०दाह पु. क्षितिजावरील तांबडेपणा , तांबडा प्रकाश . ०पाल पु. दिशेचा स्वामी . हे दहा दिशांचे दहा आहेत - इंद्र , अग्नि , यम , निऋति , वरुण , वायु , सोम , ईशान , अनंत व ब्रह्मा . ०बंधन न. १ ( जादु ) एक नजरबंदीचा प्रकार . दिशा भारण्याचा जादूगार करीत असलेला देखावा . २ ( तंत्रशास्त्र ) संध्या , जप इ० कर्मात कारावयाचा एक विधि . ०भ्रम भ्रमण पुन . पृथ्वीवर कोठेहि भटकणे ; दिशोदिसी फिरणे ; दिशाभूल . ०भ्रांत वि. हरवलेला ; दिशा चुकलेला ; अज्ञात प्रदेशांत फिरणारा ०मंडल न. दिशाचक्र . ०लव पु. दिगंश पहा . ०विजय पु. १ दशदिशा , सर्व जग जिंकणे ( सैन्यबलाने किंवा विद्येने ). २ ( उप . ) अशिष्ट , बेताल कृत्य ; वेडेपणाची आडदांडपणाची प्रवृत्ति ; आक्रसताळा ; दंगा ; बंड . त्या पोराने दिग्विजय मांडला . ०विजयी वि. पृथ्वी जिंकणारा ; जगज्जेता ; बल्याढ वीर . २ ( उप . ) व्यसनी ; बदफैली ; दुराचारी ; अर्वाच्य . ०व्यापी वि. सर्वव्यापी ; सर्वप्रसिद्ध ; जागतिक .
|