|
न १ मन . २ निजगुज ; विश्वरुप . ३ आत्मस्वरुप ; स्वस्वरुप . पाहें पां वालभाचे नि व्याजें । तिया व्रजांगनांचीं निजें । - ज्ञा ९ . ४६५ . [ सं ] वि. स्वतःचे स्वकीय , आत्मीय ; आपले ; ( अत्यंत - शर ) - नस्त्री . स्वतःची कामे ( क्रि० सांगणे ; बोलणे ). म्ह ० निजेवाचून पुजा नाही = फुकट कोणी कोणाच्या उपयोगी पडत नाही . [ सं . ] स्त्री. झोंप . तदुक्तिस जन प्रभो जरि निजेमधे चावळे । - केका ७३ . [ सं . निद्रा ] निजगळ - वि . ( ना . ) झोंपाळू . निजतीक्रिया - स्त्री . प्रेत निजल्या स्थितीत पुरणे .- बदलापूर १७२ . निजणे - अक्रि . १ झोंप घेणे ; झोंपणे . टपकण निज . महारपोर रात्र शिळी करतील . ( लहान मुलाला लवकर निजविण्यासाठी म्हणतात . ) २ आडवे होणे ; कलणे ; लोळणे . ३ आजारी पडणे ; हांतरुणाला खिळणे . ४ ( ल . ) मरणे . ५ नाश पावणे ; बुडणे ; नाहींसा होणे . ( धंद्यातील भांडवल , धंदा , व्यापार इ० ). ६ भरभराटीस न येणे ( दैव ); मंद चालणे ( कामधंदा ); नाहींसा होणे ( हुकमत , अधिकार ); बेचिराख , उजाड होणे ( घर , गांव ). ७ संभोग करणे . निजलेला मेल्यासारखा - मृतवत निजलेला व मेलेला सारखाच . निजल्या जागी विकणे - कारवाईने आपले काम साधणे ; बोटावर नाचविणे . निजून उठणे , उठत असणे - ( पहांटेस , लवकर )- प्रातःकाळी झोंपेतून उठणे किंवा उठण्याची संवय असणे . सावकाश निजणे - शांतपणाने झोंप घेणे ; बेफिकीरपणे झोंपणे . निजविणे - सक्रि . झोंपविणे ; दुसर्याला झोंपू देणे आडवे पसरविणे ; निजावयास लावणे . निजसुरा - वि . अर्धवट झोंपलेला अर्धवट जागा ; असावध . जेणे देहात्मवादी निजसुरा । - यथादी १ . ३८२ . निजानीज - स्त्री . सामान्यपणे निजणे ; सर्वत्रांचे निजणे ; शांतता ; सामसूम . निजायाबसायाजोगी - वि . ( बायकी ) घरकाम करण्यास योग्य झालेली , वयांत आलेली ( स्त्री . ) निजाळू - वि . झोपाळूं ; फार , नेहमी झोंप घेणारा . निजेला - वि . निजलेला ; झोंपलेला ( माणूस ). निजल्यामधे पुछ्य ते लोळताहे । - राक १ . ३३ . त्यांतील एक कलहंस तटी निजेला । - र ९ . ०कार्य न. १ आपले स्वतःचे काम . २ ब्रह्मज्ञान , आत्मज्ञान मिळविणे . ०खूण स्त्री. विशिष्ट खूण , चिन्ह , लक्षण . ०गूज न. स्वतःचे , खाजगी - गुप्त काम , गोष्ट . ०जन स्वकीयजन अथवा भक्त . आप्त ; सोयरेधायरे . - ज्ञा १८ . १ . ०जनजित वि. भक्ताधीन . ( ईश्वर ) ०जनाखिलमंगल वि. भक्तांचे संपूर्ण कल्याण करणारा ; भक्तांचे मंगळ करणारा . जय जय देव निर्मळ । निजजनाखिल मंगल । जन्मजरा जलद जाल प्रभंजन । - ज्ञा १८ . १ . ०ठेवा पु. १ स्वतःची पुंजी , मुख्यत्वे स्वतःच्या पाप पुण्यास लावतात . २ ब्रह्मज्ञान . ऐसे म्हणाल तरी निजठेवा । सद्गुरुवीण नाही । - दा ५ . १ . १९ . ०ढाळ पु. स्वाभाविक गति . ०तेज न. स्वकीय तेज ; स्वस्वरुप . ०त्व न. निजरुप . ०धाम न. ( काव्य . ) स्वतःचे घर , निवासस्थान ; आत्मस्वरुप ; निजतेज . कृष्णदास जयराम । जे शांतक्षमेचे निजधाम । ०धामास - मरणे ; दिवंगत होणे . जाणे - मरणे ; दिवंगत होणे . ०निवाडा पु. आत्मस्वरुपाचा निश्चय . निजस्वरुप भाव . - एभा २ . ३१६ . ०बोध पु. आत्मज्ञान . जेथे भेटे निर्गुण निजबोध विष्णु स्वरुप . ०मूर्ति रुप वि . स्वस्वरुप ; स्वतःसिद्ध . ०रुप न. १ स्वतःचे खरे स्वरुप . निजरुप इला मी दाऊं कां । - सौभद्र अंक ५ . २ स्वस्वरुप ; चिन्मयकला ; शिवात्मा . ०लोट पु. ( काव्य . ) प्रत्यक्ष लाट , जलकल्लोळ . जो विवेक रत्नाचा किरिट । जो सद्गुण गंगेचा निजलोट । ०वर्म न. स्वतःचे ( गूढ ) दोष ; रहस्य ; गुप्त गोष्ट . ०वस्तु नस्त्री . ब्रह्म . ०वृत्ति स्त्री. स्वधर्म . तैसी निजवृत्ति जेथ सांडे । तेथ स्वतंत्रते वस्ती न घडे । आइका प्रजाहो हे फुडे । विरंचि म्हणे । - ज्ञा ३ . १११ . ०साधन न. १ आत्म्याचे ज्ञान मिळविणे . २ स्वतःचे हित पाहणे , स्वहिताकडे नजर देणे . ( क्रि० पाहणे ). ०सार पु. मुख्य उद्देश ; तात्पर्य . एर्हवी या लक्षणांचिया निजसारा । मी अपाडे कीर अपुरा । - ज्ञा ६ . १४० . ०सुकृत पु. आपली स्वतःची कृत्ये ( पूर्व जन्मांतील किंवा ह्या जन्मांतील ). ०सुख न. १ ब्रह्मसुख . २ स्वतःचे सुख . ०स्वरुप न. निजरुप पहा . ०ज्ञानी पु. आत्मज्ञानी . निजांगे क्रिवि . ( काव्य ) स्वतः ; जातीने . निजांगे वधोनि दशकंधर । - स्तोत्रमाला महिपति - पांडुरंगस्तोत्र . निजाचो वि . ( गो . ) स्वतःचा ; मूळचा ; नैसर्गिक . निजाची श्रीमंत वि . गर्भश्रीमंत . निजानंद , निजानंदभरित वि . स्वतःमध्ये आनंद पावणारा ( ब्रह्म ).
|