Dictionaries | References

निरसणे

   
Script: Devanagari

निरसणे     

क्रि.  काढून टाकणे , दूर करणे , परिहार करणे .

निरसणे     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : निवारणे

निरसणे     

स.क्रि.  १ फेंकून देणे ; दूर ; बाजूला सारणे ; वर्जणे ; काढून टाकणे ; घालविणे ; नाश करणे ; टाकून देणे . निज बोधे संसारदुःख । निरसूनि दिधले निजमुख । - एभा १० . ३४७ . जेणे नामसंकीर्तन करुनिया । निरसली सकळ प्रपंच माया । २ मिथ्या ठरविणे ; समजणे . तैसे विचारितां निरसले । ते प्रपंचु सहजे सांडवले । मग तत्वता तत्त्व उरले । ज्ञानियासी । - ज्ञा २ . १३१ . तुका म्हणे आस निरवली । - तुगा ५३ . - अक्रि . संपणे ; जाणे ; दूर होणे ; गळणे ; कायमचे नष्ट होणे . जैसी रात्र निरसतां उठती जन । - रावि ७ . ८४ . प्राप्त होतां आत्मज्ञान । भ्रांतितम निरसून जाय स्वये । [ सं . निर + अस = फेकून देणे ] निरसन - न . १ परिहार ; निरसण्याचा व्यापार . संकटनिरसन . २ नाकारणे ; अस्वीकार ; टाकणे ; फेंकणे . [ सं . ] निरसनी - स्त्री . निरिच्छा ; वीट ; तिटकारा . निरशी अर्थ २ पहा . नेदीच तो निरसनी धरिली मुकुंदे । - अकक २ , कृष्णकौतुक ५० . [ नि + रस ] निरसित , निरस - वि . फेंकलेले ; दूर केलेले ; नाकारलेले .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP