Dictionaries | References

निवाड

   
Script: Devanagari
See also:  निवाडा

निवाड     

 पु. १ तडजोड ; निर्णय ; न्याय ; निकाल ; फैसला ; ठराव . २ निष्पत्ति . ( इं . ) जजमेंट . पिकासी निवाडू देखिजे । अधिकाधिक । - ज्ञा १० . ५५ . ३ भेद , भिन्नता . नाना घनीभूत सुवर्ण । जैसे निहाळतां साधारण । मग अळंकारी बरवेपण । निवाडु दावी । - ज्ञा १ . ४४ . [ निवडणे ] दोन जीवांचा निवाडा होणे - गरोदर स्त्री सुरळितपणे प्रसूत होऊन अपत्य व ती वेगळी होणे , बाळंत होणे .
०पोवाडा  पु. मुक्तता ; सुटका ( अडचण , संकट , त्रास इ० पासून - विशेषतः बाळंतपणांतून ). [ निवाडा द्वि . ] निवाडपत्र न . ( कायदा ) निकालपत्र ; ( इं . ) डिक्री .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP