|
अ.क्रि. पूयमय होणें ; पूयरक्तवत द्रव्यें गळत असणें ( क्षतें , फोड इ० कांतून ); शेंबूड गळणें ( नाक इ० तून ). पिकल्यानें किंवा कुजण्यानें मृदु , स्त्रवणारें , पचपचीत होणें ( लिंबू , फणस इ० ). [ ध्व . ] बरबर , बरां - क्रिवि . निचरे , वाहे , गळे , स्त्रवे अशा रीतीनें . ( क्रि० वाहणें ; चालणें ; शिंकरणें ; हगणें ). बरबरीत - वि . गलगलीत ; बिलबिलीत ; स्त्रवणारें ; मऊ ( पातळ शेण , चिखल , नासकें फळ ). बरबरलेलें ; शेंबूड गळणारें ( नाक ). लाळ गळणारें ( तोंड , क्षत ).
|