Dictionaries | References

बाणीर बॉट दोवोलॅल्या थीं आसा, व्हडँ खीं पावलां म्हण खबर ना

   
Script: Devanagari
See also:  बाणीर बोट दोवोलॅल्या थीं आसा, व्हडँ खीं पावलां म्हण खबर ना

बाणीर बॉट दोवोलॅल्या थीं आसा, व्हडँ खीं पावलां म्हण खबर ना     

( गो.) गृहस्थ होडीच्या कडेवर बोट ठेवून बसला आहे पण होडें किती दूर गेलें त्याचा पत्ताच नाहीं त्याला. एक गृहस्थ होडींत बसला असतांना त्याची अंगठी पाण्यांत पडली. गृहस्थ होता दीड शहाणा. त्यानें जेथून अंगठी खालीं पडली तिथें होडीच्या कांठावर बोट ठेऊन दिलें. होडी चालूच होती. ती जेव्हां पैलतीराला लागली तेव्हां तो कोळ्याला म्हणाला, ‘ अरे माझी अंगठी तेवढी काढून दे. मी जिथें बोट ठेवलें आहे तिथेंच नेमकी ती खालीं गेली आहे. ’ कोळी हंसून म्हणाला, ‘ भल्या माणसा, तुझी अंगठी कशी मिळेल आता ? अंगठीची जागा राहिली एकीकडे आणि होडी आली किनार्‍याला. ’

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP