|
स्त्री. भिक्षा ; दानधर्म . अभाव ; कमताई ; उणीव ; वैगुण्य . सर्व गोष्टीची भीक आहे . [ सं . भिक्षा ; प्रा . भिक्खा ] म्ह भिकेची हंडीं शिंक्यास चढत नाहीं . भीक नको पण कुत्रा आवर . ( वाप्र . ) भीक असून दरिद्र कां , भीक असून दारिद्र कां , भीक असून द्र्य कां - भिक्षेकर्याचा धंदा पतकरल्यावर मग अडचण कां सोसावी ? ०काढणें क्रि . अडचण सोसणें ; दारिद्र्य अनुभविणें . ०घालणें क्रि . ( ल . ) वचकून असणें . तो माझ्यावर आपला अंमल चालवूं पाहतो , पण मी कोठें त्याला भीक घालायाला बसलों आहे ! मोजणें ; मानणें ; जुमानणें . बायकांच्या धमकावणीला कां तुम्ही भीक घालणार ? मागीतलेली वस्तु देणें ; एखाद्याची विनति मान्य करणें ( हा प्रयोग नेहमीं नकारार्थी असतो ). मीं त्याला परोपरीनें विनविलें पण त्यानें माझ्या शब्दाला भीक घातली नाहीं . न घालणें - क्रि . अतिशय तुच्छ लेखणें . ०लागणें क्रि . फार मागणी असणें ; अतिशय चणचणीचा असणें . भिकेस मिळणें ; कमताई असणें . भिकेचा डोहळा - पु . दारिद्र्य आणणारी हलकट , नीच , भिकार खोड , कृत्य , इच्छा . ( क्रि० लागणें , आठवणें , होणें ) भिकेचे डोहळे होणें - क्रि . दारिद्र्यादि दुर्दशा येण्यापूर्वी तदनुरुप पूर्वीच्या संपन्न स्थितीस विरुद्ध अशा वासना होणें ( ज्या प्रकारची संतति व्हावयाची असते त्या प्रकारचे डोहाळे - वासना गर्भारपणीं बायकांना होतात यावरुन ). भिकवर लक्ष्य ठेवणें - भीक मागण्याचा प्रसंग येईल अशा रीतीनें वर्तन करणें . आळशी , उधळा इ० बनणें . भिकेवर श्राद्ध - न . भिक्षेवर केलेलें श्राद्ध ; भिकार , चुटपुटीत श्राद्ध . ( ल ) दिलेल्या , उसन्या घेतलेल्या , तुटपुंज्या सामग्रीवर भिकारपणानें चालविलेला धंदा , काम . ( क्रि० करणें , होणें ). सामाशब्द - ०दुःख न. भीक मागण्याची दुःखकारक स्थिति . ०पायली स्त्री. गांवकर्यांकडून महारास दिलें जाणारें धान्य . ०बरी स्त्री. भिक्षा ; धर्म . ( क्रि० मागणें ). [ भीक द्वि ] भीक बाळी भिक बाळी स्त्री . पुरुषांचा उजव्या कानांत घालावयाचा मोत्याचा दागिना . पूर्वी ही भिक्षा मागून मिळविलेल्या सोन्याची अथवा त्या पैशांचें सोनें घेऊन त्याची करीत . ०मागता माग्या - वि . भिक्षा मागणारा ; भिकारी . म्ह० भीक मागत्या दहा घरें . भिकणें - भिक्षा मागून मिळालेली एखादी वस्तु ; भिक्षा . ( क्रि० मागणें ). जोशी , भक्त , उपाध्याय इ० कांस दिलेलें बक्षीस , इनाम . धर्मादाय . धर्मादाय म्हणूस सरकाराकडून घेण्यांत येणारा कर . बलुतेंअलुतें ; बलुतेदार इ० स धान्य देणें . जकातीच्या उत्पन्नांतील पतकीस दिलेला हक्क . भिकारीपणा ; दारिद्र्य . ( क्रि० लागणें ).
|