Dictionaries | References म माझें गेलें (जेवण) चुलींत Script: Devanagari Meaning Related Words माझें गेलें (जेवण) चुलींत मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्वतःबद्दल वरुन बेफिकीरी दाखविणें पण आपला स्वार्थ आधींच पूर्णपणें साधून ठेवणें. एक स्त्री स्वतःच्या जेवणाबद्दल नेहमीं बेफिकीरी दाखवीत असे व नवर्यानें जेवणाबद्दल विचारलें असतां ‘ माझें जेवण चुलींत, ’ किंवा ‘ माझें गेलें चुलींत ’ असें उत्तर देत असे. परंतु वास्तविक नवर्यास कसें तरी जेवण घालून स्वतःकरिता चांगले पदार्थ करुन चुलींत लपवून ठेवीत असे किंवा चांगला तूप वगैरे घातलेला पानगा चुलींत भाजत घालून ठेवीत असे व नवरा बाहेर गेल्यावर खात असे. एके दिवशीं नवर्यानें लपून बसून पाहिलें, तेव्हां तिची लबाडी उघडकीस आली. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP