-
वि. १ ( १ ज्याच्या गंडस्थळावर संरक्षणसाठीं ढाल बांधली आहे अशा लढाईंतील हत्तीप्रमाणे शूर , धीटमोल . २ ज्यावर सैन्याचें मुख्य निशाण आहे अशा म्होरक्या हत्तीप्रमाणें धीट ). अमर्याद ; निर्लज्ज उद्धट ( पुरुषाप्रमाणें बागणार्या स्त्रीविषयीं अथवा तिच्या शिरजोर , धीट , उद्धट , स्त्री जातीला अयोग्य अशा वर्तनाविषयी योजतात ). २ बेछूट ; दांडगी ; ताळतंत्र सोडेलेली ( स्त्री . तिचीं कृत्यें ). ३ . ( बायकी ) उपव्द्यापी ; उलाढाली ; दंगखोर ( मुलें व त्यांच्या खोडया ). ४ अतिशय मोठी व स्थूल ( स्त्री ). ५ दंगेखोर ; शिरजोर ; बेकायदेशीर ( मनुष्य ). ६ ( सामा .) निष्कारण उठाठेवी करणारा ; फाजील . [ ढाल = निशाण + गज = हत्ती निशाणाचा हत्ती मोठा असतो यावरुन ]. ढालगजपण - १ . उलाढाल ; उठाठेव . तयासि द्रव्य पाहिजे म्हणौन । केलें असंभाव्य ढालगजपण। - स्वादिओ २ . २ . १७ . ढालगज भवानी - स्त्री . १ . साहसाचे , आचरटपणाचें , अमर्याद , अनुचित कृत्य करणारी स्त्री २ . उलाढाली , उपव्द्यापी स्त्री .
-
ढालगज भवानी
-
[ढालगज=निशाणाचा हत्ती. ज्या हत्तीवर सैन्याचें मुख्य निशाण लावलेले असते तो. हा हत्ती फार धीट व शूर असावा लागतो.- आपटे कोश]
-
मोठी शूर, धीट, उपद्व्यापी बाई. (वाईट अर्थी वापरतात.)
Site Search
Input language: