Dictionaries | References

मोठयाच्या गांडींत शिरुं नये

   
Script: Devanagari

मोठयाच्या गांडींत शिरुं नये     

आपल्यापेक्षां फार मोठयाचा आश्रय करुं नये. लहान मनुष्यांनीं आपल्यापेक्षां फार वरचढ लोकांशीं स्नेह केल्यास परिणामीं तो घातक होतो. एकदां एक कोल्हा रानांत जात असतां त्यास एक उंट मरुन पडलेला आढळला
तेव्हां त्यानें दातांनीं त्याच्या पोटाच्या कातडयास चीर पाडून तो त्याचें मांस खाण्यास शिरला. पुढें ऊन तापल्यावरअ त्या उंटाचें कातडें कडक होऊन ती फट रुंद करतां येईनासी झाली व कोल्ह्यास बाहेर येतां येत नाहींसे झालें, तेव्हां तो येणार्‍या जाणार्‍या मनुष्यास विनवूं लागला कीं, माझें म्हणणें ऐकाल तर मी तुम्हांस एक शहापणाची गोष्ट सांगेन. एका वाटसरुनें त्यास काय पाहिजे म्हणून विचारल्यावर त्यानें त्यास प्रथम एक घागरभर पाणी आणून त्या उंटाच्या अंगावर ओतण्यास सांगितलें. तें ओतल्यावर तें कातडें नरम पडून त्यास त्या फटींतून बाहेर पडतां आलें. मग त्या वाटसरास शहाणपणाची गोष्ट म्हणून त्यानें सांगितलें कीं ‘ मोठयाच्या गांडीत शिरुं नये
शिरल्यास अडकून पडतों व बाहेर निघतां येत नाहीं ’.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP