Dictionaries | References

मोडीव

   
Script: Devanagari

मोडीव     

वि.  
घडी करतां येण्याजोगा ; आटोपसर आकारांत ठेवतां येण्याजोगा ; ज्याचे अवयव सुटे करतां येतात आणि पुन्हां जोडता येतात असा ( पलंग , टेबल इ० वस्तु किंवा यंत्र ).
मोडतोड झाल्याकारणानें विकून टाकलें पाहिजे असें ; विक्री करुन मोडण्याजोगें ; विक्री करुन किंवा बदलून घेण्याजोगें ; मोडीला घालण्याजोगें ( सामान , दागिने , भांडी इ० )
फुटकीं तुटकीं भांडीं , दागिने , इ० आटवून किंवा पुन्हां सांधून नवीन केलेलीं ( भांडीं , दागिने इ० ); मोडलेल्या दागिन्याचें किंवा धातूच्या भांड्याचें केलेलें .
नादुरुस्त ; फुटका ; मोडका ( कोणताहि पदार्थ ); तुकडे तुकडे झालेलें . [ मोडणें ]
०अडकित्ता  पु. ज्याचें पातें आंतील बाजूनें व बाहेरील बाजूनें मोडतां किंवा वळवितां येतें असा सुपारी कातरण्याचा अडकित्ता .
०घडी  स्त्री. घड्या मोड लेली कापडाची गांठ किंवा गठ्ठा . मोडून घेणें क्रि . पाडाव करणें काबीज करणें . तयाचा देहदुर्ग हा थारा । मोडूनि घेतला तो वीरा । - ज्ञा १८ . १०५२ . मोडून , मोडोनि येणें क्रि . झाड लवण्याइतकें , मोडण्याइतकें बहारीचें झाडास पीक , फळ येणें . निंब निंबोळियां मोडोनि आला । तरी तो काउळियांसीचि सुकाळु जाहला । - ज्ञा ९ . ४३८ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP