Dictionaries | References

रान

   
Script: Devanagari

रान     

verb  एसे एसे खालामनानै होनाय   Ex. पण्डिता फुजानि उनाव गाइखेर, दै, सिनि, घिउ आरो बेरे मोदैजों बानायनाय फ्रसादखौ रानो
CAUSATIVE:
रानहो
HYPERNYMY:
हो
ONTOLOGY:
()कर्मसूचक क्रिया (Verb of Action)क्रिया (Verb)
SYNONYM:
रानना-हो
Wordnet:
asmবিতৰণ কৰা
gujવાંટવું
hinबाँटना
kanಹಂಚು
kokवाटप
malവിതരണം ചെയ്യുക
marवाटणे
mniꯌꯦꯟꯕ
oriବାଣ୍ଟିବା
panਵੰਡਣਾ
sanअभिदा
tamபங்கீடு
telపంచు
urdتقسیم کرنا , بانٹنا
verb  बाहागोनि बादियै एसे मोननाय एबा होनाय   Ex. दिनै फरायसालियाव मेथाय रानगासिनो दं
ENTAILMENT:
मोन
HYPERNYMY:
दं
ONTOLOGY:
()कर्मसूचक क्रिया (Verb of Action)क्रिया (Verb)
SYNONYM:
बिलाय बिलायना हो बाहागो खालाम
Wordnet:
benবিতরণ করা
kasبٲگراوٕنۍ
malപങ്കുവയ്ക്കുക
oriବାଣ୍ଟିବା
panਵੰਡਣਾ
sanप्र दा
tamபங்கிடு
urdبنٹنا , تقسیم ہونا , بانٹ بٹواراہونا ,
verb  दै, सिदोमा बायदिफोरा गैयि जानाय एबा खमायनाय   Ex. बांद्राय गरमनि थाखाय फिसा फिसा फुख्रिफोरा रानगासिनो दं
HYPERNYMY:
सोलायनाय फै
ONTOLOGY:
अवस्थासूचक क्रिया (Verb of State)क्रिया (Verb)
Wordnet:
benশুকিয়ে যাওয়া
gujસુકાવું
hinसूखना
kanಬತ್ತು
kasہۄکُھن
nepसुक्‍नु
oriଶୁଖିବା
panਖੁਸ਼ਕ ਹੋਣਾ
sanशुष्
tamகாய்ந்துபோ
telఎండిపోవు
urdسوکھ جانا , خشک ہونا
verb  बबेबा मुवा बायदिफोरनि खायसे बाहागो खालामनाय   Ex. सिखावफोरा खावनाय मुवाफोरखौ रानदों
HYPERNYMY:
माव
ONTOLOGY:
()कर्मसूचक क्रिया (Verb of Action)क्रिया (Verb)
SYNONYM:
बोखाव बाहाग खालाम बाहागो खालाम
Wordnet:
asmভগোৱা
benভাগ করা
gujવહેંચી આપવું
hinबाँटना
kasبٲگراوُن
kokवांटप
malഭാഗിക്കുക
marविभागणे
mniꯌꯦꯟꯅꯕ
nepभाग गर्नु
oriବାଣ୍ଟିବା
panਵੰਡਣਾ
sanविभज्
tamபங்குபோடுதல்
telవిభజించు
urdبانٹنا , تقسیم کرنا , منقسم کرنا , حصہ لگانا
verb  सारगैयि जानाय   Ex. गोब्राब खामानि मावै मावै आंनि सोलेरा रानलांबाय
HYPERNYMY:
दं
ONTOLOGY:
होना क्रिया (Verb of Occur)क्रिया (Verb)
SYNONYM:
गोरान जा सारगैयि जा
Wordnet:
benনিঃশেষ হয়ে যাওয়া
gujચૂસાવું
kanನಿಸ್ಸಾರವಾಗು
kasکَمزور گَژُھن , کَمزوٗری یِنۍ
oriଶୁଖିଯିବା
panਚੁਸਨਾ
urdچسنا
See : रानलां, रानलां, खुर, खुर

रान     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
See : जाँघ

रान     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
noun  जंय शेकानशेक झाडां पेडां आनी वनस्पत आपशींच उगवल्या अशी सुवात   Ex. आदल्या तेपार रुशी-मुनी रानांनी रावताले
HYPONYMY:
पाचवेचार दाट रान उपरान खांडव दण्डक रान काळखी रान सुंदरबन शक्तीवन मृगया-वन बेलवन पिपळहाळी
MERO MEMBER COLLECTION:
वनस्पत
ONTOLOGY:
समूह (Group)संज्ञा (Noun)
SYNONYM:
जंगल वन अरण्य
Wordnet:
asmহাবি
bdहाग्रा
benবন
gujવન
hinजंगल
kanಕಾಡು
kasجَنٛگَل , وَن
malകാടു്
marरान
mniꯎꯃꯪ
nepवन
oriବଣ
panਜੰਗਲ
sanअरण्यम्
tamகாடு
telఅడవి
urdجنگل , صحرا , بیاباں , ویرانہ , سنسان , غیرآبادجگہ
noun  व्हड आनी दाट रानटी वाठारांत आशिल्लीं झाडां वा हेर वनस्पत   Ex. सैमाची काळजी करिनासतना मनीस रान कातरीत आसा
MERO MEMBER COLLECTION:
वनस्पत
ONTOLOGY:
समूह (Group)संज्ञा (Noun)
SYNONYM:
वन
Wordnet:
benজঙ্গল
kanಕಾಡು
panਜੰਗਲ
sanवनम्
tamகாடு
telఅడవి
urdجنگل , صحرا , بادیہ
noun  झाडां, वाली, बी दाट आशिल्ली सुवात   Ex. रानांत हरणां, बी जनावरां भोंवतात
ONTOLOGY:
भौतिक स्थान (Physical Place)स्थान (Place)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
वन
Wordnet:
asmকুঞ্জ
benকুঞ্জ
gujકુંજ
hinकुंज
malവള്ളിക്കുടില്
nepकुञ्ज
oriକୁଞ୍ଜ
panਕੁੰਜ
sanकुञ्जः
urdکنج

रान     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
and wander into absurdities; to digress, to ramble. रिकाम्या रानीं In the empty desert; i. e. in some unproductive place or business or sphere; idly, vainly, unprofitably, to no purpose--speaking or acting. Ex. आतां एथें काम नाहीं काज नाहीं रिकाम्या रानीं कशाला बसावें -रहावें -फिरावें &c. Note. रान enters freely into composition with the names of birds, beasts, and plants in the sense of Wild or undomesticated, uncultivated &c., as रानडुकर A wild hog; रानमांजर A wild cat; रानकेळ A wild Plantain; रानउडीद, रानतूर, रानपडवळ, रानमटकी, रानमसूर, रान- माठ, रानमूग &c. Of such compounds the most useful follow in order; but for others which the learner will hear he must remember and apply the general intimation here given.

रान     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  A wood; a waste. A weed. A grove. In comp. with the names of birds, beasts, &c. in the sense of Wild, as रानड्डकर A wild hog.
रान खवळणें   To be stirred up, to be violently excited.
रानांत पडणें   Become lonely or desolate.
रिकाम्या रानीं   In some unproductive place or business.
रानांत शिरणें   Digress, ramble.

रान     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  जिथे खूप मोठ्या प्रमाणावर वृक्ष, झाडे-झुडुपे इत्यादी आपोआप उगवलेली असतात असे ठिकाण   Ex. हे रान अनेक वन्य प्राण्यांनी भरलेले आहे
HYPONYMY:
सदाबहार जंगल घनदाट वन बिल्वन खांडववन दंडकारण्य छोटे जंगल सुंदरवन ताडवन अंधारवन तपोवन शक्तिवन पिंपळवन
MERO MEMBER COLLECTION:
वनस्पती
ONTOLOGY:
समूह (Group)संज्ञा (Noun)
SYNONYM:
वन जंगल अरण्य कानन विपिन कांतार अटवी
Wordnet:
asmহাবি
bdहाग्रा
benবন
gujવન
hinजंगल
kanಕಾಡು
kasجَنٛگَل , وَن
kokरान
malകാടു്
mniꯎꯃꯪ
nepवन
oriବଣ
panਜੰਗਲ
sanअरण्यम्
tamகாடு
telఅడవి
urdجنگل , صحرا , بیاباں , ویرانہ , سنسان , غیرآبادجگہ
See : शेत, ओसाड, जंगल

रान     

 न. १ जंगल ; वन ; विशेषतः जगलांतील खुजा , ठेंगण्या झाडाझुडपांचा समुदाय . २ तळवट ; माळ ; रुक्ष प्रदेश ; नापीक व निर्जन प्रदेश . ३ मनुष्यास उपभोग्य असा भाजी - पाला इ० कांहून भिन्न असें तण , गवत , उपद्रवी - निरुपयोगी वनस्पती इ० . भाजीचे वाफ्यांत कोठें कोठें रान रुजलें आहे तें उपटून टाक . ४ शेतांत उगवणारें गवत ; तन . ५ शेत . ६ झाडी ; राई ; बन ; वृक्षवाटिका . बंदर किनार्‍यास सारें नारळीचें रान . ७ देश ; प्रदेश ; भाग . मारवाडदेश म्हणजे उंटाचें रान . त्या रानचे मनुष्यास हें रान मानत नाहीं . ८ विदेश ; परका मुलुख . परस्परें या रानांतील उमराव व रजवाडे यांस पत्रें देऊन तुमची कुमक करवितों . - भाब १३ . ९ ( ल . ) फार मोठी वाढलेली हजामत . प्रदेश ह्या सामान्य अर्थी रान शब्दापूर्वी विशेषणात्मक शब्द जोडल्यानें त्याचा विशेष अर्थ होतो ; उदा० डोंगररान ; खडकरान ; धोंडेरान किंवा गोटेरान ; बनजररान गवतरान ; माळरान इ० तसेंच काळें रान , पांढरें रान , चिक्कणरान काळया - पांढर्‍या - चिक्कण मातीचा प्रदेश . नवें रान = पूर्वी जंगल किंवा माळ असून नुकतीच लागवडीस आणलेली जमीन [ सं . अरण्य ; प्रा . रण्ण ] म्ह० ( गो . ) रान झालें लागीं घरां जाली पैस = म्हातारपण प्राप्त होणें , मरण जवळ येणें या अर्थी . ( वाप्र . )
 न. ( जंबिया ) चड्डीच्या काढणीजवळील मांडीवरचा पुढील भाग ; बाँकमधील एक डाव . आपल्या हातांतील जंबियानें जोडीदाराच्या उजव्या मांडीवर चड्डीच्या काढणीजवळ मारणें . [ फा . ]
०उठणें   लोक खवळणें ; क्रुध्द होणें . म्युनिसिपल इमारतीवर संयुक्त निशाण लावण्याचा ठराव हुजूरपक्षानें फेटाळला त्यामुळें शहरांतील रान उठलें होतें . - के २२ . ७ . ३० .
०उठविणें   जागविणें - पारधींकरितां धडधड आवाज करून सावजांना जागें करणें . झाडींतून पारध , सावज बाहेर हुसकणें . रान उठविल्याशिवाय , जागविल्याशिवाय शिकार कशी सापडेल ?
०काढणें   १ जंगल - जमीन लागवडीस आणणें . २ झाडें झोडपून व ओरडून ओरडून शिकार उठवणें . ३ रानाचा , जंगलाचा शोध लावणें .
०खवळणें   १ एखाद्यावर खवळणें ; उठणें ( रान , श्वापदें ). २ अतिशय क्षुब्ध होणें , ( राग , भूक , लोभ , काम इ० कानीं ). लवकर जेवायला वाढा , आज इकडे रान फार खवळलें आहे .
०घेणें   १ रानांत पळून जाणें ( गुरांनीं ). २ ( ल . ) वेढंग मार्गाचा स्वीकार करणें ; बारगळणें . ३ रानांत शिरणें पहा .
०बदलणें   सोडणें पारखें होणें - ( ल . ) आपलें मन किंवा उद्देश बदलणें ; एखाद्यासंबंधीचा आपला विचार फिरविणें ; आपला पूर्वीचा मुद्दा सोडून देणें .
०भारणें   १ सर्व प्रदेशावर जादू पसरणें ; मंत्र टाकणें . तमाम गारोडी रान भारतो तसा प्रकार त्यानें केला . - भाब २४ . २ ( ल . ) यथास्थित पैसे चारणें .
०मानणें   त्या देशावी हवा इ० प्रकृतीस मानवणें , पसंत पडणें . कोंकणच्या माणसास हें रान मानवत नाहीं .
०हांकणें   ( शिकार उठविण्याकरितां ) झाडें झोडपणें व आरडाओरड करणें . रानांत , आडरानांत पडणें - एकटें सांपडणें ; उदास होणें . रानांत शिरणें - ( ल . ) ( संभाषणप्रसंगीं ) सरळ मार्ग सोडून अयोग्य गोष्टी सांगत बसणें ; विषयांतर करणें ; बहकणें . रानीं रिघणें - अरण्य सेविणें . ब्रह्मसुकाळु लाधला ते ही । जे रानीं रिगाले । - ऋ १६ . रिकाम्या रानीं - क्रिवि . बेफायदेशीर ; व्यर्थ ; निरर्थक ; फुकट ( बोलणें , चालणें ). आतां एथें काम नाहीं काज नाहीं . रिकाम्यारानीं कशाला बसावें , रहावें , फिरावें इ० . रान या शब्दापुढें पक्षी , पशु व वनस्पति यांचीं नांवें जोडून रानटी किंवा न माणसाळलेला , न लागवड केलेला या अर्थी बरेच समास होतात . जसें :- रानडुकर ; रानमसूर ; रानमाठ ; रानमूग इ० . तसेंच रानआंबा - केळी - कोंबडा - जेवण . या व यासारख्या दुसर्‍या अनेक सामासिक शब्दांत रान ह्याचा रानांत राहणारा किंवा होणारा असा अर्थ होतो ; कांहीं विशिष्ट सामाशब्द -
०आंबा  पु. वृक्षविशेष .
०आलें  न. रानांत होणारें आलें .
०आळू  न. तेरें अळूं . हें पर्जन्यकाळीं उगवतें ; याचा रंग पांढरा , हें फार थंड आहे . याची भाजी चांगली होते .
०कट वि.  खेडवळ ; गांवढळ ; रानावनांतील ( मनुष्य , पशु ). [ रान ]
०कंद  पु. एक कंद .
०करी  पु. रान्या ; गवत , लाकूडफांटा इ० आणण्याकरितां रानांत फिरणारा माणूस .
०काढया वि.  शिकार करण्यासाठीं रान काढण्याकरिता लावलेला ( मनुष्य ); पारध्याकरितां सावज कचाटयांत आणणारा .
०कांदळ  न. एक वन्य वृक्ष .
०कापशी  स्त्री. रानांतील कापशीचें झाड ; देवकापशी , देवपळहीहून भिन्न व पळहेंशीं जुळणारी . हिचें बीं लहान व वाटोळें असून देवकापशीचें मोठें व लांबट असतें .
०कापूस  पु. रानकापशीचा कापूस .
०कावळा  पु. कावळयाच्या जातींतील जंगली पक्षी .
०केळ   केळी - स्त्री . केळीची जंगली जात . हिच्या पानावर जेवतात . कांदा उकडून किंवा वाळवून त्याचें पीठ करून खातात ; कवदर व ही एकच . कवदर पहा .
०कोंबडा   कोंबडी कोंबडें - पुस्त्रीन . जंगली कोंबडा .
०खरडा  पु. जंगलखरडा पहा .
०गट वि.  १ खेडवळ ; गांवढळ . २ वन्य ; लागवडीशिवाय उगवणारा . [ रान ]
०गांजा   गांज्या - पु . एक औषधी मूळ ; सालवण . याचीं पानें बेलाप्रमाणें त्रिदळ असून यास निरनिराळया रंगाचीं फुलें येतात . याचें मूळ सर्व प्रकारचे तापावर गुणकारी आहे .
०गाय  स्त्री. तार्तरी देशांतील गाय ; वनगाय .
०गोवरी  स्त्री. जंगलांत सांपडणारें इतस्तत : पडलेलें शेण , शेणी . याच्या उलट शेण थापटून लावलेली गोवरी .
०घेवडा  पु. एक वेल .
०घोळ  स्त्री. घोळ नामक भाजीचा एक प्रकार . हिचें पान रंगानें तांबूस व चरबट असतें .
०चा  पु. भील किंवा कातकरी .
राजा  पु. भील किंवा कातकरी .
०चिमणी  स्त्री. १ चिमणीसारखा एक लहान पक्षी . २ जांभळीं व पांढरीं फुलें येणारें एक झाड .
०जाई  स्त्री. उंच वाढणारें वेलासारखें झुडुप .
०जेवण  न. वनभोजन ; रानांत किंवा झाडाखालीं केलेलें जेवण . रानट , रानकट , रानगट - वि . १ रानांत राहणारा ; रानटी ; अज्ञानी . होतां तापत्रयार्त त्वरित भववनीं रक्षितां रानटाचा । - केका १२२ . २ आडगांवीं राहणारा ; शहर , कचेरी , दरबार इ० ठिकाणीं न जाणारा ; अडाणी ( मनुष्य ). ३ जींतभात , गहूं इ० न येतां गवत फार उगवतें अशी जमीन .
०टाकळी  स्त्री. टाकळीची एक जात . रानटी , रानठी - वि . १ रानासंबंधीं ; आपोआप उगवणारा . २ गांवढळ ; खेडवळ ; रीतभात नसलेला . [ रान ]
०टोणगा  पु. जंगली टोणगा ; रेडा .
०टोळ  पु. टोळाची एक जात .
०डुकर   डुक्कर - पुन . भुइमूग , ऊंस , भात इ० पिकांचा फन्ना उडविणारें रानटी जनावर .
०तरवड  पु. तरवडाची एक जात .
०तीळ  पु. काळा तीळ पहा .
०तुळस  स्त्री. एक वनस्पति ; वैजयंती ; ही तुळशीसारखीच असते . पानें मात्र मोठीं असतात . हिला मंजिर्‍या येतात . बीं काळें , किंचित् ‍ तांबूस व खसखशीएवढें असून पाण्यांत घातलें असतां फुगतें . हें तुकुमराई ( सबजाचें बीं ) प्रमाणें असतें . यासहि तुकुमराई म्हणतात .
०तूर  स्त्री. एक लहान पिवळया फुलांचें झुडुप .
०तेरडा  पु. तेरडयाची एक जंगली जात .
०दांडगा वि.  आडदांड ; रानटी ; धिप्पाड ; राक्षसी काम करणारा .
०दांडगे   पुअव . सर्व तर्‍हेचीं शस्त्रें घेऊन शत्रूचा किंवा खेडयांतील लोकांचा समुदाय .
०र्निबू  न. राननिंबोणीचें फळ . निंबोणी , निंबूण - स्त्री . एक मोठें काटेरी झाड .
०निवडुंग   पुन . जंगली निवडुंग .
०पासरा  पु. दुकानदारीची झिंबड .
०पाळ वि.  नापीक ; भुकिस्त ; बरड ; माळवजा ( भातजमीन ).
०पिंपळ  पु. पारोसा पिंपळ ; एक झाड .
०बाजरी  स्त्री. गवतासारखी वनस्पति .
०भरी   क्रिवि . रानोमाळ . रानभरी झाले साधारण । - एभा २३ . ३१६ .
०भरीभरू वि.  १ भयभीत ; घाबरलेला ; पलायमान ; परागंदा ( पशु , मनुष्य ). महा वारण जे उन्मत्त । दैत्यें सोडिले तयावरते । तयास प्रल्हाद सिंह दिसत । मग ते होत रानभरी । २ ( ल . ) चैनीकरितां इतस्तत : भटकण्याच्या हेतूनें ज्यानें आपली बायकापोरें सोडलीं आहेत असा . [ रान + भरणें ]
०भरू   १ रस्ता चुकणें ; आडरस्त्यास जाणें . २ गोंधळणें ; घाबरणें ; घाबरें होणें .
होणें   १ रस्ता चुकणें ; आडरस्त्यास जाणें . २ गोंधळणें ; घाबरणें ; घाबरें होणें .
०भाजी  स्त्री. १ लागवडीशिवाय उगवणारी भाजी . २ वनांत होणारी खाद्य वनस्पति .
०मटकी  स्त्री. रानांत होणारी मटकी , मठ .
०मसूर  स्त्री. एक जंगली झाड ; हीं झाडें महाबळेश्वरकडे पुष्कळ होतात ; ह्यांचें बीं मसुरासारखें असतें .
०मांजर   पुन . जंगली मांजर ; मोठा व धाकटा असे याचे दोन भेद आहेत .
०माणूस  न. १ एक प्रकारचा वानर . २ ( ल . ) रानटी ; खेडवळ माणूस .
०मूग  पु. रानात होणार्‍या मुगाची जात .
०मोगरा  पु. अरुंद पानाची जाई .
०म्हैस  स्त्री. जंगली म्हैस .
०रावताण   रावताणी - नस्त्री . रावताण पहा .
०वट  स्त्री. मोठया रस्त्यापासून फुटलेली रानास जावयाची वाट पुढच्या आंब्याजवळ वाट उजवी फुटली आहे ती रानवट आहे . - वि . १ जंगली ; लागवड न केलेली व साफ न केलेली ( जमीन ). २ खेडवळ ; गांवढळ ; रानटी ( मनुष्य ). ३ वन्य आपोआप उगवणारा ( वृक्ष , वनस्पती ).
०वत  न. ( राजा . ) वन्य वृक्षाचें पान ; ज्यांचीं पानें सामान्यत : भोजनाकरितां , पुडयाकरितां उपयोगी पडत नाहींत अशा झाडाचें पान . [ रान + पत्र ]
०वन  न. ( व्यापक ) रान ; जंगली प्रदेश ; रानांत फिरणें , वन्य पदार्थींवर उपजीविका करणें किंवा निर्वाहाकरितां वन्य पदार्थ शोधणें . ( क्रि० करणें ; पाहणें ; फिरणें ; हिंडणें ). रानवन मला व्हावयाचें - किंवा मी करीत असतों . [ रान + वन ] रानवा - पु . लागवडीस न आणलेली पडीत जमीन ; जंगल ; रान . गांवाला रानवा असल्यावांचून तृणकाष्ठाची सोय होत नाहीं . रानवाट - स्त्री . जंगली व रानवट प्रदेशाकडे जाणारी वाट .
०वाळूक  न. ( थट्टेनें , ल . ) दगड .
०वाळूक   ( ल . ) दगड मारणें .
चारणें   ( ल . ) दगड मारणें .
०शकट्ट  पु. एका जातीचें श्वापद . रानशकट्ट आणी रीसें । - दा ३ . ७ . ९ .
०शेकट  पु. रानशेवगा पहा .
०शेण   शेणी गवरी - स्त्री . १ रानांत पडलेलें गाई - म्हशीचें वाळलेलें शेण , याच्या उलट वळशेण . २ जेव्हां एखाद्या मनुष्याचें ज्ञान , समज , सामर्थ्य किंवा संपत्ति यासंबंधीं पूर्णपणें निषेध दाखवाववाचा असतो तेव्हां उपमानाप्रमाणें योजलेल्या ( शेण , गोवर्‍या , माती , धूळ , दगड , धोंडा , राख इ० ) शब्दांपैकीं हा एक शब्द आहे . उदा० त्याला रानशेणीचें पीठ समजतें ? = त्याला काय समजतें ?
०शेर  पु. एक वनस्पति ; हुरा .
०शेवगा  पु. एक झाड . सामान्यत : रानेशर .
०सठवी   सटवी - स्त्री . सठवीचें रूप धारण करणार्‍या देवीचें किंवा दुर्गेचें नांव . उच्छिष्टचांडाळी रानसटवी जखणी । - ह १३ . ६८ .
०सावज  न. रानांतील जंगली पशु . कीं रानीचें रानसावज उन्मत्त । - नव २२ . १३१ .
०सिवार  न. शिवारांतील जंगल . गांवचें रानसिवार खोताची सत्ता आहे . - मसाप २ . ५९ .
०सोडवण  स्त्री. रान तोडून साफ केल्याबद्दलची जकात . - अस्पृ . ३८ .
०सोर   वर सोरु - पु . रानडुक्कर . रानसोवर बळकट । - कालिका २२ . १९ . [ रान सूकर - सूअर - वर ]
०हळद   हळदी - स्त्री . एक वनस्पति .
०हुरा  पु. सामान्यत : रानशेर . रानावळी - स्त्री . एक लहान फुलझाड . हिचा औषधांत उपयोग करतात . रानी , परज - स्त्री . सुरतपासून नवापूरपर्यंत राहणारे रानटी लोक . रानोमाळ - क्रिवि . १ रानांत आणि माळांत . २ तजावजा ; अव्यवस्थित ; अस्ताव्यस्त रीतीन ; पांगून . तैसे ब्राह्मण रानोमाळ । भयें करूनि पळतात । ३ ( ल . ) पसरल्यासारखें ; इकडे तिकडे अस्ताव्यस्त फेकल्यासारखें . वार्‍यानें पोथीचीं पत्रें रानोमाळ झालीं . [ रान + माळ ] रानोरान - क्रिवि . रानांतून आणि वनांतून ; दरीखोर्‍यांतून ; सर्व देशभर माझी गाय चुकली म्हणून मी रानोरान फिरलों [ रान द्वि . ] रान्या - वि . रानावनांतील ; खेडवळ ; गांवढळ ; रानकरी ; रानट . [ रान ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP