Dictionaries | References

रिकामा

   
Script: Devanagari

रिकामा     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
. 6 Unemployed; wanting occupation, service, business, or work;--used of persons or animals: also unapplied to use or purpose, unengaged;--used of vehicles or things. 7 Not bearing or having; or not having accomplished the object purposed. Ex. मी तुला न्यायाला आलों तो घेतल्याशिवाय रि0 जाणार नाहीं; यजमा- नाकडे गडी पाठविला होता पण ते भेटले नाहींत तेव्हां गडी रि0 माघारां आला. रि0 बसणें To be out of employ; to sit idling. Ex. सहज रिकामे बैसाल घरीं ॥ संसार चाले कैशा परी ॥.

रिकामा     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  Unemployed; unsound; see रिकामका.

रिकामा     

वि.  आंत काही नसलेला , न भरलेला , पोकळ , रिता ;
वि.  कोरडा , तथ्यांश नसलेला , निरर्थक , निराधार , फुकट ;
वि.  निरुद्योगी , बेकार , रिकामटेकडा ;
वि.  कुचकामाचा , नसता , व्यर्थ ;
वि.  न गुंतलेला , मोकळा .

रिकामा     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
adjective  ज्यात काही नाही असा किंवा जो भरला गेला नाही असा   Ex. तिच्या कपाटाच्या रिकाम्या खणात आम्ही कपडे भरले.
MODIFIES NOUN:
ठिकाण
ONTOLOGY:
संबंधसूचक (Relational)विशेषण (Adjective)
SYNONYM:
रिक्त रिता मोकळा
Wordnet:
asmখালী
bdलांदां
benশূণ্য
gujખાલી
hinरिक्त
kanಖಾಲಿಯಿರುವ
kokरिकामी
malഒഴിഞ്ഞ
mniꯑꯍꯥꯡꯕ
nepरिक्त
oriଖାଲି
panਖਾਲੀ
sanरिक्त
telశూన్యమైన
urdخالی
adjective  वापरात नाही असा   Ex. आज माझी गणिताची तासिका रिकामी आहे.
MODIFIES NOUN:
अवस्था गोष्ट
ONTOLOGY:
अवस्थासूचक (Stative)विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)
SYNONYM:
वापरात नसलेला
Wordnet:
gujખાલી
kasخٲلی , مۄکُل , فرٛی
malഒഴിവുള്ള
mniꯍꯥꯡꯅ
sanरिक्त
tamகாலியான
telఖాళీయైన
See : पोकळ, मोकळा

रिकामा     

वि.  
ज्यांत कांही नाही असा ; पोकळ . ही घागर रिकामी आहे .
( ल . ) पोकळ ; निराधार ; तथ्यांश नसलेला ; कोरडा ; पुराव्याने , प्रमाणाने , उदाहरणाने ज्याची सत्यता , यथार्थता सिध्द करतां येत नाही असा ( वाद , विधान , हकीकत ). उदा० रिकामा डौल ; रिकामी स्तुति .
ज्या जागेवरील अधिकारी किंवा काम करणारा मनुष्य अद्यापि नेमण्यांत आलेला नाही किंवा रजेवर गेला आहे अशी ( जागा ); ह्या कचेरीत तीन कारकुनांच्या जागा रिकाम्या आहेत .
निरर्थक ; व्यर्थ ; निष्फळ ; निष्प्रयोजन ; खोटा ( दगदग , पायपिटी , चौकशी , बोलणे ). नको सांगु बडिवार रिकामा लक्षुमि नाना परी - प्रभाकर - लावणी - लक्ष्मीपार्वती संवाद ( नवनीत पृ . ४१५ . )
जरुर ती सामुग्री , हत्यारे इ० साधन ज्याचे जवळ नाही असा . माझी हत्यारे सारी घरी आहेत , मी रिकामा तुमच्या घरी येऊन काय करणार ?
ज्याला नोकरी , उद्योग - धंदा नाही असा ; बेकार ; निरुद्योगी ; कामावीण ; कधी रिकामा असूं नको । - अनंतफंदी लावणी ( नवनीत पृ . ४३७ . )
उपयोगांत नसलेली , कामांत न गुंतविलेली ( वस्तु , गाडी इ० ). तुमचा चाकू रिकामा झाला म्हणजे मला अंमळ द्या .
एकाकी ; उद्दिष्ट न साधलेला ; प्रयोजनशून्य ; फलशून्य . मी तुला पुढे घालून घेऊन जाणार , रिकामा परत जाणार नाही .
ज्यास कोणी मालक नाही असा ( देश , मुलूख इ० ). आर्यांना दंडकारण्याचा प्रदेश रिकामा सांपडला . [ सं . रिक्त , रिच = रिकामे करणे ] म्ह० रिकामा न्हावी कुडाला ( भिंतीला ) तुंबड्या लावी . ( वाप्र . ) बसणे - उद्योग नसणे ; बेकार असणे ; निरुद्योगी राहणे ; आळशीपणाने वेळ काढणे . सहज रिकामे बैसाल घरी । संसार चाले कैशापरी । सामाशब्द - रिकामचावडी - टेंकडी - स्त्री . निरुद्योगी माणसांचे चाळे , उपद्व्याप ; रिकामपणाच्या खोड्या .
०चोट   टवळा टेकडा वि . ( अशिष्ट ) निरुद्योगी ; आळशी ( मनुष्य ); उपयोगी न पडतां पडून राहिलेली ( वस्तु ). म्ह०
रिकामचोट आणि गांवास उपद्रव .
रिकाम टवळा आणि गांवचा होवळा . रिकामटी , रिकामणूक - स्त्री . सवड ; फुरसत ; रिकामा वेळ ; रिकामीक . पुराणी बैसतां नाही रिकामटी । खेळतो सोंगटी अहोरात्र । - तुगा ४२३४ . रिकामढंग , रिकामे ढंग - पुअव . रिकामपणचे चाळे , निष्फळ उपद्व्याप ; निष्प्रयोजन काम .
०पण   पणा न . पु . फुरसत ; सवड ; कामांत न गुंतल्यामुळे मिळणारी सावकाशी ; सुट्टी ; रजा ; विश्रांति .
०वाणा   णी वि . व्यर्थ ; फुकट ; आळसाने घालविलेले ; निष्फळ .
०वेळ  स्त्री. पुरसतीचा वेळ ; सवड . रिकामा ताठा पु . पोकळ गर्व ; पोकळ डौल ; मोठेपणाचा खोटा आव . म्ह० नाकी नाही काटा रिकामा ताठा . रिकामीक स्त्री . रिकामपण ; फुरसत ; सवड . रिकाम्या पोटी क्रिवि . अनशापोटी ; जेवण्यापूर्वी . रिकाम्यारानी णी क्रिवि . विनाकारण ; फळाची आशा किंवा संभव नसतां . तुमचे तिकडे कांही का होईना ? मला काय त्याची पंचाईत ? रिकाम्या रानी मी कशाला आपल्याला त्रास करुन घेऊ ? ( ज्यांत जनावरे नाहीत अश रानांत शिकारी जात नाहीत यावरुन वरील प्रयोग ). रिकाम्या हाताने क्रिवि . आणावयाची वस्तु न आणता ; रिक्त हस्ताने . रिकाम्या वि . ( गो . ) रिकामा . हांव रिक्यामी ना .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP