Dictionaries | References

विडा उचलणें

   
Script: Devanagari

विडा उचलणें     

पूर्वी एखादी महत्वाची कामगिरी कोणास सांगावयाची झाली म्हणजे राजा दराबारांत विडा मांडून तो कोणासहि उचलण्यास आव्हान देत असे व जो मनुष्य तो विडा उचलील त्यानें ती कामगिरी पतकरली असें समजण्यांत येत असे. यावरुन प्रतिज्ञा करणें
एखादी गोष्ट करण्याचें अंगावर घेणें. ‘ त्यांनीं ज्याच्या रक्तानें नाहाण्याबद्दल विडा उचललेला आहे ते कोण ? ’ -उषःकाल. ‘ विडा पैजेचा उचलूं नको. ’ -अफला. ‘ अमका म्हणतो आजपासून चहा सोडला, तमक्यानं विडासुद्धां खायचा नाहीं असाच विडा उचलला. ’ -एकच प्याला. ‘ कल्पनेच्या बाहेर नाश फजीति झाल्यावांचून राघोबाला पेशवाई देण्याचा विडा उचललेले इंग्रज, पेशव्यांच्या बरोबर तहकरण्यास तयार झाले नाहींत. ’ -V.S. २.१७८.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP