Dictionaries | References

सखू पाठ घांसली तर घासूं पण खंडीचा तोटा कसा सोसूं

   
Script: Devanagari

सखू पाठ घांसली तर घासूं पण खंडीचा तोटा कसा सोसूं     

घरचें खाऊन दुसर्‍याची उठाठेव करणें
लष्करच्या भाकरी भाजणें. -[ एक होता शेतकरी. त्याची एक लग्न झालेली मुलगी होती. जांवई व मुलगी दिवाळसणास आलेली होती
परत जाते वेळीं त्यांना पोंचविण्यास सासरा कांहीं अंतरपर्यत गेला
वाटेंत त्यास एक शेत लागलें, तेव्हां जांवई सासर्‍यास म्हणतोः काय राव, ह्या शेतांत किती धान्य पिकेल. सासर्‍यानें उत्तर दिलें: तीन खंडी. त्यावर जांवई म्हणालाः दोन खंडी. कोणीहि आपला दुराग्रह सोडीना. होतां होतां दोघे वर्दळीस आले. जांवयानें सासर्‍यास उताणे पाडून तो त्याच्या छातीवर बसला आणि जमिनीला त्याची पाठ घासूं लागला. कोणाचा पक्ष घेऊन भांडण मिटवावें हें मुलीला समजेना. शेवटीं ती बापास म्हणाली, " बाबा ! जाऊं द्या, माघार घ्या." तेव्हां तो म्हणाला, " सखू, पाठ घांसली तर घासूं, पण खंडीचा तोटा कसा सोसूं ?"

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP