|
पु. डोंगरपठार ; डोंगरसपाटी ; डोंगराच्या माथ्यावरील सपाट जमीन . तालुकियांत सडा आहे त्ये जागा बाहेरून माती आणून ... - वाडसमारो ६ . २४६ . सडे पठारी राहिलें स्वस्थ । - दावि ६२ . ३५ . वि. एकटा ; मोकळा ; वेगळा ; स्वतंत्र ; कांही एक मागें ब्याद नसलेला ; फटिंग ; रिकामा ; कामांत न गुंतलेला ; उप्योगांत नसलेला ; ओझे नसलेला ; भाडयानें व दिलेला ( गाडा , जनावर वगैरे ). आंत कानडा लोक फाकडा , शिपाई सडे तलवार - ऐघे १८३ . पु. नाडा ; रस्सी ; वळलेली सुताची दोरी ; सुतळी . मी वावडी तूं एक सडा नको मारूं आढा - सला २ . वावडीला जसा सडा मागें खेंचीत असतो ... - सासं २ . ४१८ . सडया - पु . ( कों ) पाणी काढण्याची दोरी . पु. १ शेणमाती , रंग वगैरेचा दाट वर्षाव . ( क्रि० घालणें ; टाकणें ; देणें ; शिंपणें ). घोसाळा कांकणाचा हाती । नारी सडे घालीताती । - शिशु ५९० . सदा सडे समार्जनें । घरी तुळशीची वृंदावनें । - कथा २ . ४ . १२२ . करुनि सडा संमार्जन गोपी कुंभ घेऊनि कुक्षी - घनश्यामाची भूपाळी . २ ( ल . ) पखरण ; विखरण ; उधळणी ( फुलें , फळें , रुपये नाणी वगैरेची - देवतेवर , माणसांच्या गर्दीत वगैरे ). जो ग्रंथ हाती घ्यावा त्याच्या पृष्टो पृष्ठो हा सडा सांपडेल - नि ७९२ . दिव्य सुमनांचा सडा तो विराजे चहूंकडा । - भारा बाल ११ . २९१ . होता सडा फुलांचा पडला । - विक १०० . ३ शेणसडा . सडासंमाजर्न , सडासारवण - न . केर काडणें , सडा टाकणें वगैरे ; झाडसारव ; झाडलोट ; सकाळचे शुद्धीचें काम . ०कारभार पु. मोकळा , सरळ , उघड व्यवहार ; बिन घोटाळ्याचा व्यवसाय ; धंदा ; धोपट मार्गी काम ; देवघेव , व्यवहार वगैरे . ०धस वि. पु. १ धसकनंदन ; धसकटराव ; एकदम पुढें घुसणारा , अविचारी , उतावीळ ( मनुष्य ). २ सडा फटिंग ; सडेसोट ; आगापिच्छा नसलेला ; मागें कोणताहि व्याप , धरबंद नसलेला ( मनुष्य ). ०फटिंग पु. बायकापोरें , लागाबांधा , इ० कांहीएक व्याप , पाश नसलेल्या मनुष्यास विनोदानें म्हणतात . ०फोक वि. सरळ व तरतरित ; सडपातळ व देखणा ; अंगासरसा व नीटस ( मनुष्य ). ०मफलीस वि. अविवाहित , एकटा व गरीबीतील मनुष्य ; काबाडकष्ट करून एकटा राहणारा . [ सडा + अर . मफलीस = गरीब ] ०साटा साटटा साठ सोट - वि . १ निःसंग , बायकापोरें नसलेला ; एकटा . २ फांद्या नसलेला ( वृक्ष ). सडी - स्त्री . १ एकटी . मोठे श्रीमंत बाईसाहेब सडी पाहिली । - ऐपो ११५ . सडी आयाती - स्त्री . निःसंगपणा ; संगराहित्य . ऐसा शरीरास संभोगाचिये राती । माजी धावतां सडीया आयती । तंव कर्मक्षयाची पाहाती । पाहांट जाली । - ज्ञा ७ . १३० . सडी फौज - स्त्री . तोफखाना , बुणगें वगैरे लटाबंर बरोबर नसलेली , लढाईच्या तयारीनें निघालेली फौज ; हलकी हत्यारें घेऊन जाणारी फौज . सडी बायको - स्त्री . मूल नसलेली स्त्री ; अंगावरील मूल नसलेली स्त्री . सडीसांड संडीसाट संडीसांट - स्त्री . १ मूल नसलेली स्त्री ; वांझ स्त्री . सडीसाट नयन किती वाट पहाति घनदाट अजुनि तरि हाट धरूनि शिघचढेल - राला ६७ . ५७ . २ एकटी स्त्री ; जिला कोणी नातेवाईक नाही अशी स्त्री . सडीसाक्ष सडीसाक्षी - स्त्री . मुखजबानीचा पुरावा . सडसाक्ष पहा . वाद्याकडे चालविल्यास सडीसाक्ष पडणार नाही . - वाडबाबा २ . ३६ . सडीस्वारी - सडेस्वारी - स्त्री . बरोबर लवाजमा न घेतां निघालेली स्वारी . केले सैन्य तयार सडीस्वारी संगे घेऊन । - ऐपो ४४५ . फौजेंत केली ताकीद सडेस्वारीला । - ऐपो २८३ . सडेलडधु सडेसांठ सडेसांट - वि . सडासोट ; फटिंग ; अविवाहित ; स्त्रीपुत्रादि परिवार नसलेला . सडेसोट - पु . सडासोट ; एकटा ; फटिंग . सडेसोटपणा - पु . बेमुर्वतखोरपणा ; रोखठोकपणा . सडेहूंपट सडेहुप्या - पु . १ ज्यांत मादी व पिले नसतात अशा वानरांच्या टोळीचा मुख्य , नायक . २ अविवाहित मंडळीतला ; ब्रह्मचारी .
|