|
वि. सात ही संख्या . [ सं . ] वि. लिखित ; निश्चित . हा अहदनामा सप्ता जाहला आहे . - पे ६१ . [ अर . सबत् = स्थैर्य ] सप्तसूद - वि . शाबित झालेलें . [ अर . सबूत = कायमपणा , स्थैर्य ] ०ऋषि पुअव . १ प्रत्येक मन्वंतरांतील सात ब्रह्मर्षि . यांच्या नांवांबद्दल एकवाक्यता नाही . सध्याच्या मन्वतरांतील सप्तर्षि - कश्यप , अत्रि , भरद्धाज , विश्वामित्र , गौतम , जमदग्नि व वसिष्ठ अशी नांवें आढळतात . सप्तर्षि अथवा ऋक्ष नक्षत्रांतील हे सात तारे आहेत . कश्यपादि प्रसिद्ध । सप्तऋषी । - ज्ञा १० . ९२ . २ ( सांकेतिक ) सातारा शहर . पानगांवचा राजा सप्तऋषीस येत आहे . - रा ८ . १८३ . सप्तऋषि गिरीवरी माझी प्रतिष्ठा - सप्र ५ . १३ . ०क न. १ सातांचा समुदाय . २ - वि . सातवा . ०कंचुक वि. ( पंचमहाभूतें अहंकार व महत्तत्त्व हीं ) सात आवरणें , वेष्टणें असलेला . त्यामध्यें सप्तकंचुक पिंड । - दा १६ . ७ . १५ . सप्तकंचुक ब्रह्मांड । - दा १५ . ८ . २९ . ०कर पु. अग्नि . ०करनेत्र पु. शिव ; अग्निनेत्र . ०करणें नअव . ( ज्यो . ) बव , बालव , कौलव , तैतिल , गर , वणिज व विष्टि . ही सात करणें . ०कुलाचल पुअव . सात मोठे पर्वत . महेन्द्र , मलय , सह्य , शक्तिमान , गंधमादन , विंध्य , परियात्र ०कोण पु. सात कोण असणारी सरळ रेषानी मर्यादित आकृति . ०क्या वि. सात , सात दिवसांची अगर वर्षाची मर्यादा धरून तप करणारा . नव नाडी , बावन आड , तेथे एक सप्तक्या ब्राह्मण तप करित आहे - काहणी . विष्णूची . ०खणी पु. स्त्री . सात खणांचा महाल . तया मार्गे सप्तखणी । शोभे कनक बालार्कवर्णी । - कथा १ . ६ . १५६ . ०गणी गाणी - स्त्री . दुंडापैसा ; ढबू पैसा . ०गोदावरी न. गोदावरी ज्या प्रदेशांत सप्तधा होऊन समुद्रास मिळते तो प्रदेश . तीर न. गोदावरी ज्या प्रदेशांत सप्तधा होऊन समुद्रास मिळते तो प्रदेश . ०ग्रही स्त्री. सात ग्रहांची एका राशींत युति . ०चिरंजीव पुअव . अश्वत्थामा , बलि , व्यास , हनुमान , बिभीषण , कृप व परशुराम हे सात पुरुष मरणातीत आहेत अशी समजूत आहे . ०चैतन्य न. मुख्य , शाश्वत अथवा ब्रह्मचैतन्य व इतर सहा मायिक चैतन्यें तीं - ईश , जीव , प्रमाण प्रमातृ , प्रमेय , फल . ०जिह्व पु. अग्नि . ०ति वि. ७० ही संख्या . ०दश वि. १७ ही संख्या . ०द्वीप पुअव . पृथ्वीचे सात मोठाले विभाग . जंबु , कुश , प्लक्ष , शाल्मली , क्रौंच , शाक व पुष्कर . नव खंडें सप्तद्वीपें । छपन्न देशींच्या रायांचीं स्वरूपें । - ह २८ . ६४ . ०द्वीपवती द्वीपद्वीपा - स्त्री . पृथ्वी . आले सप्त ही सागर । सहित सप्तद्वीपवती । - भूपळी विष्णूची . ०धा क्रिवि . सात प्रकारचा , सात ठिकाणीं , सात प्रकारांनीं . ०धातु पुअव . शरीरांतील सात रस , रस , रक्त , मांस , मेद , अस्थि , मज्जा व शुक्र . अन्यत्र - वसा , रुधिर , मांस , भेद , मज्जा , अस्थि व स्नायु . अन्यत्र - अस्थि , नाडी , मज्जा , मांस , त्वचा , रक्त व नख आणि केश मिळून . मग सप्त धातूंच्या सागरीं । तहानेला घोंट भरी । - ज्ञा ६ . २३५ . या सप्तधातूंचे मल अथवा उपधातु . रस - कफ ; रक्त - पित्त ; मांस - नाक , कान , डोळे यांचा स्त्राव ; मेद - घाम ; अस्थि - केश व नखें ; मज्जा - स्निग्धता ; शुक्र - ओज . २ सोनें , रुपें तांबें , शिसें , कथिल , नाग , तीक्ष व कांसें . अन्यत्र - सोनें , रुपें , तांबें , शिसें , जस्त , पितळ , लोखंड . ०धान्यें नअव . शोण . सिंधु , हिरण्यवाह , कोक , घर्घर , लोहित व शतद्रु . यांपैकीं दोहोंबद्दल ब्रह्मपुत्र व शिवनद धरतात . ०पदार्थ पुअव . न्यायशास्त्रांतील सात पदार्थ - द्रव्य , गुण , कर्म , सामान्य , विशेष , समवाय व अभाव . ०पदी पदीक्रमण - स्त्रीन . विवाहविधीमध्यें लाजाहोमानंतर वधूवरांनीं समागमें सात पावलें जाण्याचा विधि . विवाह होम झाला संपूर्ण । सप्तपदी पाणीग्रहण । - एरुस्व १६ . २६ . ०पर्ण पु. एक वृक्ष . - न . एक खाद्य - द्राक्षें , डाळिंब , खजूर यांचा रस व साखर , मध व तूप व इतर मसाला घालून केलेलें . - वि . सात पानांचें ( झाड ). ०पर्वत पुअव . सप्त कुलाचल , पहा . ०पाताल न. अव . अतल , वितल , सुतल , तलातल , महातल , रसातल , व पाताल . अतळ वितळ , सुतळ महातल आणि तळातळ । रसातळ आणि पाताळ । सातवें तें । - कथा ६ . ४ . ७९ . सप्तपाताळी घालणें , सप्तपाताळी पडणें , सप्तपाताळी जाणें - पुन्हां केव्हांही डोकें वर काढतां येऊं नये अशी अवस्था होणें . ०पुर्या स्त्रीअव . अयोध्या , मथुरा , माया ( हरिद्वार ), काशी , कांची , अवंतिका ( उज्जयिनी ), व द्वारावती - एभा १८ . १५० . सप्तपुर्या तीर्थें अगाधें । जेथें वसती ब्रह्मवृंदें । - ह . ३३ . १०१ . ०पुंजा स्त्रीअव . विवाहविधीमध्ये सप्तपदीसाठी घातलेल्या तांदूळाच्या सात राशी . सप्तपुंजा भोवती बाळें । - वसा ५१ . ०प्रकृति धाप्रकृति विधाप्रकृति - स्त्रीअव . प्रकृति पहा . १ सात स्वभावधर्म . २ राज्याचे मुख्य सात आधार - राजा , मंत्रि , नगर , भूमि , कोश , सेना , मित्र . ०भूमिका स्त्रीअव . १ ज्ञानी जीवाच्या सात भूमिका - शुभेच्छा , विचारणा , तनुमानसा , सत्त्वापत्ति , असंसक्ति , पदार्थभाविनी व सुर्यवगाहिनी . २ भक्ति , ज्ञान , वैराग्य व सलोकता , समीपता , सरुपता व सायुज्यता . सप्तभूमिका परब्रह्मी - सप्र . ७ . ४२ . ०भूषणें नअव . पुरुषाची सात भूषणें . पुरुषांलागी सप्त भूषणें। तिन्ही वस्त्रें कनकवणें । द्वादशांगी अलंकार लेणें । स्त्रियांस देणें तैसेंचि । - ह ३४ . ६२ . ०म वि. सातवा . ०मातृका स्त्रीअव . ब्राह्मी , माहेश्वरी , कौमारी , वैष्णवी , वाराही , इंद्राणी व चामुंडा . ०मी वि. १ पंधरा तिथींपैकीं सातवी तिथि . २ सातवी विभक्ति . ०मृत्तिका स्त्रीअव . गज , अश्व , रथ , चतुष्पथ , गोष्ठ , वल्मीक व हाट अथवा संगम या सात ठिकाणची विधीकरितां लागणारी माती . ०रंग पुअव . तांबडा , नारिंगी , पिंवळा , हिरवा , निळा , पारवा , जांभळा हे सूर्यकिरणाच्या पृथक्करणानें किंवा इन्द्रधनुष्यांत दिसणारे रंग . ०रात्र न. सात रात्रींचा काल . ०राशिक न. त्रैराशिकाप्रमाणें सात राशींचें गणित . सप्तर्षि - पुअव . सप्तऋषि पहा . ०वारा पु. ( नाविक ) सप्तऋषींकडून वाहणारा वारा . ०लोक पुअव . भूलोक ( पृथ्वी ); भुवर्लोक ( पृथ्वी व सूर्य यांमधील ), स्वर्लोक ( सूर्य व ध्रुव यांमधील इंद्रादि देवतांचा ), महर्लोक ( सूर्य व नक्षत्रांचा ), तपोलोक ( तपस्वी लोकांचा ), जनलोक ( ब्रह्मदेवाच्या मानसपुत्रांचा ) व सत्यलोक ( ब्रह्मदेवाचा ). ०विध , विध व्यसनें - नअव . जारण , मारण , विध्वंसन , स्तंभन , मोहन , वशीकरण व उच्चाटण . हें सप्तलक्षण । - विपू १ . ५३ . सप्तवेसनीं जयाचें मन । तो एक मूर्ख । - दा २ . १ . १६ . लक्षण , विध व्यसनें - नअव . जारण , मारण , विध्वंसन , स्तंभन , मोहन , वशीकरण व उच्चाटण . हें सप्तलक्षण । - विपू १ . ५३ . सप्तवेसनीं जयाचें मन । तो एक मूर्ख । - दा २ . १ . १६ . ०शती स्त्री. १ मार्कंडेय पुराणांतील सातशें श्लोकांची देवीची स्तुति ; चंडीपाठ . २ सातशें श्लोकांचा ग्रंथ ; भगवद्गीता . कीं गीता हे सप्तशती । मंत्रप्रतिपाद्य भगवती । - ज्ञा १८ . १६६६ . ३ हालाची गाथासप्तशती . ०शैल सप्ताद्रि - पुअव . सप्तकुलाचल पहा . ०समुद्र सागर - पुअव . क्षार , इक्षुरस , सुरा , घृत , क्षीर , दधि व शुध्दोदक समुद्र . इयेवरी सप्तसागर । मध्यें मेरू महा थोर । - दा ४ . १० . १४ . ०सूर पुअव . षड्ज , ऋषभ , गांधार , मध्यम , पंचम , धैवत व निषाद हे संगीतांतील सात सूर . ०स्कंध पुअव . वायुमंडलाचे सात भाग . आवह अथवा अवाह ( भूमिपासून मेघंडलापर्यंत ), प्रबह अथवा प्रवाह ( मेघमंडलापासून सूर्यमंडलापर्यंत ), उद्वह ( तिसर्या मंडलांतील ), सह ( चंद्रमंडालापासून नक्षत्रमंडलापर्यंत ), विवह अथवा वैवह ( नक्षत्रमंडलापर्यंत ), षठापरा ( शनिमंडलापासून सप्तर्षिपर्यंत ), परिवाह ( सप्तर्षिपासून ध्रुवापर्यंत ). ०स्वर पुअव . सप्तसूर पहा . ०स्वर्ग पुअव . सप्तलोक पहा . ०हरीतकी स्त्री. अव . हरडयाच्या सात जाती . विजया , रोहिणी , पूतना , अमृता , चेतकी , अभया व जीवंती ; अन्यत्र - अभया , चेतकी , पथ्या , पूतना , हरीतकी , जया व हैमावती . ०क्षार पुअव . ( सात औषधी क्षार ) तिल , अपामार्ग , करंज , पलाश , अर्क , यव , चिंचा . यांबद्दल पाठमेदहि आढळतात , अष्टक्षार पहा . सप्ताद्रि - पुअव . सप्तकुलाचल पहा . सप्तावस्था - स्त्रीअव . अज्ञान , आवरण , विक्षेप , परोक्षज्ञान , अपरोक्षज्ञान , शोकभंग व निरंकुशा तृप्ति . सप्ताश्व - पु . ज्याचे रथास सात घोडे आहेत असा ; सूर्य . सप्तास्त्र - पु . सप्तकोन . - वि . सप्तकोनी . सप्ताह - पु . १ सात दिवसांचा काल ; आठवडा . २ सप्ताह पारायण - न . सात दिवसांत एखाद्या ग्रंथाचें वाचन . सप्तोपचार - पुअव . वैद्यक शास्त्रांतील सात निरनिराळे उपचाराचे प्रकार . पाचन , रेचन , क्लेदन ( स्वेदन ), शमन , मोहन , स्तम्भन , वर्ध्दन .
|