|
न. ( गो . ) दिवाणखाना ; दालन . - सहयाद्री ३१४ . [ पोर्तु . इं . सलून ] [ पुस्त्री . एक झाड ; सारफळ . [ सं . शाल ; प्रा . साल ] न. १ वर्ष ; संवत्सर . ईश्वर त्याजला बहुसाल करो - रा ३ . ३३५ . २ वर्षासन ; वार्षिक वेतन , पगार . [ फा . साल् ] स्त्री. १ त्वचा ; वरचें जाड आवरण ( झाड , फळ , इ० चें ). २ घांसल्यानें , चोळवटल्यानें निघालेलें कातडें ( माणूस , जनावर याचें ); - न . १ बारीक त्वचा ; फोल ; तूस ; टरफल ( धान्य , दाणे इ० वरचें ). कलियुगांतीं कोरडीं । चहूं युगांचीं सालें सांडी । - ज्ञा १५ . १२९ . २ कोकंबीचें टरफल ; आमसूल . ३ भात जमीन नांगरल्यानंतर तींतील ढेकळें फोडून जमीन साफ करण्याकरितां जमीनीवर फिरवावयाचा लांकडी जाड ओंडा , गुठें . [ सं . छाल ; दे . प्रा . सालण ] ०आयंदा पु. ( कागदोपत्रीं ) आगामी वर्ष . आवंदाचें साल . ०पाठीचें चट्टा लागणें ; नुकसान येणें . जाणें चट्टा लागणें ; नुकसान येणें . ०उधारी स्त्री. वर्षमुदतीची उधारी . - गांगा १४३ . ०ट वि. १ थोडेंबहुत साल ज्याच्या अंगीं आहे असा ( डाळ , कणीक , तांदूळ , लांकूड इ० पदार्थ ). २ आंब्याचा एक प्रकार . - न . १ फोल ; टरफल ( धान्य , बी इ० चें ). २ पोकळ शेंग ( आंत दाणा नसलेली ). सालटें असा अनेकवचनी प्रयोग बहुधां येतो . ०करी पु. १ जोसपण , कुळकरण इ० वृत्तींचे अनेक जे भागीदार त्यांतून विशिष्ट सालची वहिवाट करण्याचा ज्याला अधिकार आहे तो ; विशिष्ट सालचा वृत्तिभोगी . २ एक सालाकरितां नेमलेला माणूस . ०गिरा गिरी गिरे - पुस्त्री . १ वाढदिवस ; वर्षगांठ . महाराजांच्या सालगिर्याचे दिवशीं ग्वाल्हेरमध्यें मोठा जलसा होता - एशिआ ३५३ . नबाबाची सालगिरे - रा ५ . २७ . २ वाढदिवसाचा समारंभ . - रा ७ . ८२ . सालगिरीच्या समारंभांतही बहुत आरास करावी . - ऐस्फुले ३४ . [ फा . साल्गिरिह् ] ०टी डी - स्त्री . १ सबंध कातडें ( मनुष्य , जनावर याचें ); शरीरावरण . २ खरचटून , घासून निघालेलें कातडें . ३ ( तुच्छतार्थी ) एखाद्या माणसाचें कातडें . ४ ( सामा . ) साल ; त्वचा ; पातळ कवच . आकाशाची सालडी । काढुनि घेइजे आंतुली गोडी । - सिसं ४ . १९६ ; - विउ ४ . ६२ . ०गुदस्त न. गेलें वर्ष ; मागील साल . - दिमरा १ . १८८ . ०टें डें - न . सालटी - डी ( १ - २ ) पहा . ०दाटा वि. जाड सालाचा ( आंबा , केळें , इ० ). सालदाटी केळ नांवाची एक केळयाची जात आहे . [ साल + दाटणें ] ०गुदस्त गुदस्तां - क्रिवि . गतवर्षी ; गुदस्तां . ०दोडा पु. १ जाड साल असणारा एक जातीचा आंबा . २ अतिशय जाड साल असणारें शेंदाडाचें फळ . ०झाडा पु. साल अखेर हिशोब ; वर्षाचा हिशेब . सावधान तुका निर्भर मानसीं । सालझाडयापाशीं गुंफो नेणें । - तुगा १८९४ . ०पट न. १ साल ( वृक्ष , मनुष्य , धान्य , फळ इ० ची ) २ घांसून , खरचटून निघालेला कातडयाचा तुकडा . साल पहा . ३ कोंडा ; तूस ; फोल . ०दरसाल क्रिवि . प्रतिवर्षी . ०दार ( खा . ) सालाच्या बोलीनें नेमलेला नोकर ; शेत्या ; सालकरी . ०पा पु. ढलप्यांची रास . ०मोटा मोठा - वि . जाड सालीचा ( वृक्ष , फळ , वनस्पति इ० ). ०पाडो पु. ( गो . ) वर्षाअखेर झाडांवरचीं सर्व फळें काढणें ; वार्षिक तोड . [ साल + पाड ] ०बंदी स्त्री. १ ( जमाबंदी संज्ञा ) कौल , खत इ० संबंधीं लागोपाठ वर्षांसाठीं ठराव , योजना ; हप्ते अनेक द्यावे , घ्यावे इ० ठरावांचा त्या कागदांवर वर्षक्रम . २ ( राजा . ) वृत्त्यादिकांच्या वहिवाटीविषयीं अमुकांनीं अमुकसालीं वहिवाट करावी असा सालकर्यांमध्यें झालेला ठराव ; सालउत्पन्नाचा करार . ०वणी न. अमसूलाचें सार ; सोलवणी . ०सूल नस्त्री . ( व्यापक ) साल , इ० . ०बल साल - क्रिवि . प्रतिवर्षी ; दरसाल ; वर्षानुवर्ष . मौजे मजकूरची जमाबंदी साल - ब - साल तनख्याप्रमाणें करून । - वाडबाबा १ . २०६ . ०बेगमी बेजमी - स्त्री . वर्षभर पुरेल इतका सांठा करणें ; सालाची बेगमी . ( धान्य , लोणचीं , पापड इ० ची ). ०बोली स्त्री. एका वर्षापुरती केलेली बोली , करार . ०भाडया पु. साल अखेरचा हिशेब घेणारा अंमलदार . - तुगा . ०मजकूर न. चालू साल ; वर्तमान वर्ष . ०वारी स्त्री. वर्षांत घडलेल्या गोष्टींची नोंद , टांचण . - वि . सालवार ; सालाप्रमाणें लावलेली . ०संबंधीं वि. सालीना ; सालचें ( उत्पन्न , वेतन , मिळकत , इ० ). ०हाल न. चालू साल . सालहाल व गुदस्तची खंडणीची बेबाकी करून देणें . - दिमरा १ . १८८ . - क्रिवि . चालू सालीं . हालसाल पहा . सालाना , सालिना , सालीना - क्रिवि . वर्षाकांठीं - वर्षाला . सर्व साल मिळून येई , अशा प्रकारानें . आम्हांस सालीना एक हजार रुपये वेतन मिळतें . [ फा . सालियाना ] सालाबाद - वि . वार्षिक ; दरसालचा ( खर्च , पैका , पट्टी ). - क्रिवि . दरवर्षी सालबादप्रमाणें . [ फा . साल् - बअद् ] सालाबादी - वि . दरसाल होणारा , चालणारा ( देणें , घेणें इ० व्यवहार ). - स्त्री . दरसाल घडत असतो तो विशिष्ट व्यवहार , खर्च इ० . श्रीची सालाबादी ३०० रु . आहे . साली - वि . वार्षिक ; सालाची . सालोसाल - क्रिवि . १ प्रतिवर्षी ; दरसाल . २ वर्षानुवर्ष .
|