|
न. १ जबरदस्तीनें नेणें ; लुटणें ; अपहार . २ नाश ; घात करणें ; दूर करणें ; नाहींसे करणें ( पाप , रोग , भास इ० ). ( समासांत ) पापहरण ; दु : खहरण ; दोषहरण इ० . कुळहरर्णी पातकें। - ज्ञा १ . २२९ . ३ ( गणित ) भागाकार . [ सं .] हरणीय --- वि . लुटून नेण्यास योग्य ; हरण करण्याजोगी ( वस्तु इ० ). पु न . मृग ; एक जनावर . - स्त्री . हरणी . [ सं . हरिण ] स्त्री. सोनार , लोहार यांची ऐरण . [ हिं . अहर्न ] ०फाशांत - पडणें --- अडचणींत पडून हताश होणें . सांपडणें - पडणें --- अडचणींत पडून हताश होणें . ०फाशांत - पाडणें --- अडचणींत आणणें , टाकणें , घालणें - पाडणें --- अडचणींत आणणें , टाकणें , ०काळजी स्त्री. ( एका गोष्टीवरुन ) अतिशय काळजी ( हरवलेल्या वस्तूची , इ० ); एखाद्या गोष्टीबद्दल अतिशय चिंता ; काळजी . हरणकाळजी फारच बाई मी मला दिलासा कोणीं द्या ग। - पला ४ . २ . ०टोळ स्त्री. भयंकर विषारी , हिरव्या रंगाची , झाडावर चढणारी सापाची एक जात ; सापटोळी . - बदलापूर ३४८ . ०दोडी स्त्री. एक वनस्पति , वेल . ०मार्या शिकारीर्या --- वि . हरणाची शिकार करणारा ; पारधी . ०वीत वेण वेत --- नस्त्री . तात्काल , सुलभ प्रसुति ( मुलें होणार्या स्त्रीची ). ०वेल स्त्री फार वाढणारी , फळांतून रेशमासारखा कापूस निघणारी , पानांची भाजी होणारी एक वेल ; हरणदोडी . ०शिकार स्त्री. हरणाची पारध हरणाळें न ( चांभारी ) हरणाचें कातडें . हरणाचें काळीज न . भीति . तुम्ही एवढें मनुष्य , दुराणी तो द्दष्टीस पडेनात , रांडापोरें घोडी ओढतात , तुमच्या पोटांत हरणाचीं काळजें कशीं शिरलीं ? - भाव ९१ . हर ( रि ) णी स्त्री . १ हरणाची मादी . हरणूली स्त्री . ( चंद्रपुरी ) ( लाडक्या भाषेंत ) हरण . मी ग हरणुली होईन। वनामधिं जाइन् पळून। - मासं जुलै १९३२ .
|