|
पु.स्त्री. आपलेंच म्हणणे धरून बसणें ; हट्ट ; आग्रह ; छंद ; नाद ; दुराग्रह ( क्रि० धरणें ; घेणें ; करणें ; चालविणें ). [ हेंकार - हेंच असें करणें ] आपला हेका करणें आपलाच हट्ट चालविणें . हेकट , हेंकट , हेकड , हेंकड , हेंगटी , हेंगटी , हेकडवाईक , हेकडखोर , हेकलखोर , हेकाड , हेकेखोर , हेकेवाईक , हेकेबाज , हेकेकरी , हेंकाखोर , हेंकावाईक वि. आपल्याच हेक्यानें चालणारा ; हट्टी ; दुराग्रही ; एककल्ली ;
छांदिष्ट . इंग्रजांचे खरे दोष प्रगट केले असतां आमच्या रेवरेंड बंधूस व
इतर हेकडखोर लोकांस न आवडोत . - नि २०९ . म्ह० हेकड कुणबी सातदां राबी .
हेकरी स्त्री. हेका ; हट्ट . स्वधर्म भूमीपति हा न सोडी । तो आपली हेकरि हो न मोडी । - सारुह ८ . ३५ .
|