|
पंच अंगें (अभ्यासाचीं) १ अभ्यास, २ लेखन, ३ निरीक्षण, ४ चर्चा व ५ विद्धानाची उपासना ([सु.]) पंच अंगें (अनुमानाची) १ प्रतिज्ञा, २ हेतु ३ द्दष्टान्त, ४ उपनय व ५ निगमन. पंच अंगें (अभिनयाचीं) १ डोळे, २ भिंवया, ३ हात, ४ पाय आणि मन (सर्वांग). या अवयवांनीं भावदर्शन करणें. चित्ताक्षिभरूहस्तपादैरंगश्चेष्टादिसाम्यतः। पात्राद्यवस्थाकरणं पञ्चाङ्गोऽभिनयो मतः ॥ ([सु.]) पंच अंगें (उपासानेचीं) १ गीता (त्या त्या देवता विषयक), २ सहस्त्रनाम, ३ स्तवराज, ४ कवच व ५ ह्रदय. "हृदयं चेति पञ्चैते पञ्चांगं प्रोच्यते बुधैः। ([योगशास्त्र]) पंच अंगें औषधीचीं (वैद्यकांत) १ साल, २ पान, ३ फूल, ४ मूळ आणि ५ फळ. एकाच झाडाचें ! हीं पांच अंगें. यास वृक्षपंचांग म्हणतात. त्वक्पत्रं कुसुमं मूलं फलमेकस्य शाखिनः। एकत्र मिलितं चैतत् पञ्चाङ्गमिति संज्ञितम् ([सु.]) पंच अंगें (कालाचीं) १ तिथि, २ वार, नक्षत्र, ४ योग आणि ५ करण हीं पांच अंगें ज्यांत मुख्यत्वें सांगितलेलीं असतात त्यास पंचांग म्हणतात. ' तिथिर्वारश्च नक्षत्रं योगः करणमेव च। तत्पञ्चाङ्गमिति प्रोक्तम् ॥ ' ([सु.]) पंच अंगें (पुरश्चरणाचीं) १ जप, २ होम, ३ तर्पण, ४ मार्जन, आणि ब्राह्मणभोजन. पंचांगोऽयं महायागः पुरश्चरणसंज्ञकः (विष्वक्सेन मंत्रशास्त्र) पंच अंगें (मीमांसा पद्धतीचीं) १ विषय, २ संशय, ३ पूर्वपक्ष, ४ उत्तरपक्ष आणि ५ सिद्धान्त. पंच अंगें (यज्ञाचीं) (अ) १ देवता, २ हविर्द्रव्य, ३ मंत्र, ४ ऋत्विज व ५ दक्षिणा ; (आ) १ शास्त्रोक्त विधि, २ अन्नसंतर्पण, ३ वेदमंत्र, ४ दक्षिणा व ५ श्रद्धा हीं पांच अंगें मानतात. देवानां द्र्व्यह विषामृक्सामयजुषां तथा। ऋत्विजां दक्षिणानां च संयोगो यज्ञ उच्यते ॥ ([वा. पु.]) पंच अग्नि (तेज तत्त्व) १ जठराग्नि, २ कामाग्नि, ३ मंदाग्नि, ४ प्रकाशाग्नि, (वडवाग्नि) आणि ५ ब्रह्माग्नि (तत्त्व - निज - विवेक) पंच अवस्था १ जागृति, २ स्वप्न, ३ सुषुप्ति, ४ तुर्या आणि ५ उन्मनी. ([क. गी. २-७]) पंच अवस्था उन्नतीच्या (साक्षात्कार भार्गांतल्या) १ अज्ञाना - वस्था, २ भोगावस्था, ३ त्यागावस्था ४ भक्तावस्था व ५ स्वरूपावस्था ([अथर्व - अनु - भाग १ ला]) पंच अवस्था (प्राणिमात्रांच्या) १ जन्म, २ बालपण, ३ तारुण्य, ४ वार्धक्य व ५ मृत्यु. पंच अणुव्रतें (जैनांचीं) १ अहिंसा अणुव्रत, २ सत्य, ३ अचौर्य, ४ स्वस्त्रीसंतोष व ५ परिग्रह प्रमाण अणुव्रत. (जैनधर्मा तत्त्वार्थ सूत्र) पंच अहंकार १ देहाहंकार, २ प्रज्ञाहंकार, ३ जीवाहंकार, ४ आत्माहंकार आणि ५ शिवाहंकार (साधन - संहिता) पंचांगुलें १ अंगुष्ठ, २ तर्जनी, ३ मध्यमा, ४ अनामिका आणि ५ कनिष्ठिका. पंच आनंद १ विषयानंद, २ योगानंद, ३ अद्वैतानंद, ४ विदेहानंद आणि ५ ब्रह्मानंद, विषययोगानंदौ द्वावद्वैतानंद एव च। विदेहानन्दो विख्यातो ब्रह्मानन्दश्च पञ्चमः ॥ ([क. गी. २-३४]) पंच आशास्थानें (मानवाचीं) १ जीवित, २ कांता, ३ अपत्य, ४ मान आणि ५ धन. हीं पांच आशास्थानें होत. पंचाचार्य (वीरशैव संप्रदाय) १ रेवणाराध्य - रंभापूरी - बाळी - हळ्ळी, २ मरुळाराध्य - उज्जयिनी, ३ एकोरामाराध्य - हिमवत्केदार, ४ पंडिताराध्य - श्रीशैल आणि ५ विश्वाराध्य - कोलिपाकी - कशी (बी. प्र.) पंच 'उ' कार १ उद्योग, २ उत्साह, ३ उत्तेजन, ४ उपकारबुद्धि आणि ५ उदारत्व. हे पंच 'उ' कार उच्च प्रतीचे सदगुण होत. पंच उपप्राण १ नाग - ढेकर येणारा, २ कूर्म - निमिषोन्मेष करणारा, ३ कृकल - शिंक येणारा, ४ देवदत्त - जांभई येणारा व ५ धनंजय - मरणानंतर किंचित्काल ब्रह्मरंध्रांत राहणारा. असे पंच वायु. ([रा. गी. ४-३७]) पंच उपविषें (अ) १ रुईचा चीक, २ त्रिधारी निवडुंगाचा चीक, ३ कळलावी, ४ धोत्रा आणि ५ कण्हेर. (आ) १ शेर, २ रुई, ३ कण्हेर, ४ लागंली (नारळ) व ५ विषमुष्टिका (काजरा) ([म. वा. को.]) अर्कक्षीरं स्नुहीक्षीरं तथैव कलिहारिका। धत्तूरः करवीरश्च पंच चोपविषाः स्मृताः ॥ ([सु.]) पंच उपविध्नें योगाभ्यासाच्या आड येणारीं १ दुःख, २ दौर्मनस्य (नम क्षुब्ध होणें), ३ अंगमेजयत्व (कंप सुटणें), ४ श्वास आणि ५ प्रश्चास (शरिरांतीत वायु बाहेर सोडणें) यो. सू १-३ १). पंच 'क' कार (लक्षणात्मक) १ कच्छ (आखूड विजार)- विनयदर्शक, २ कडें - सद्धर्माची आठवण, ३ कृपाण - शक्ति व स्वाभिमान, ४ कंगा - स्वच्छता व ५ केश - परमेश्वरप्राप्ति समर्पण. ईश्वरानें ज्या स्थितींत निर्माण केलें तींत समाधान मानावयाचे (शिखांचा इतिहास) हे पंच 'क' कार गुरु गोविंदसिंगानें सुरू केले व ते प्रत्येकाजवळ असले पाहिजेत असा शीखपंथांत निर्बंध आहे. पंचक (प्रातःस्मरणीय) (अ) १ अहल्या, २ द्रौपदी, ३ सीता, ४ तारा आणि ५ मंदोदरी. अहल्या द्रौपदी सीता तारा मंदोदरी तथा। पञ्चकं ना स्मरेन्नित्यं महापातकनाशनम् ॥ (आ) १ सावित्री, ([आधुनिक]) २ भगिनी निवेदिता, ३ मीरा, (राजस्थान), ४ राणी लक्ष्मी झांशी व ५ अहिल्याबाई होळकर. यमजेत्रीच सावित्री भगिनी च निवेदिता। मीरा लक्ष्मीरहल्या च पंचैता पुण्यजीवनाः ॥ (भगिनी निवेदिता चरित्र) पंच कर्में शरीरशुद्ध्यर्थ १ वमन, २ विरेचन, ३ बस्ति, ४ तैलबस्ति व ५ नस्य. या पांच उपचारपद्धति आयुर्वेदांत सांगितल्या आहेत. ([आयुर्वेद.]) पंचकर्में (संध्यासमयीं वर्ज्य) १ आहार (भोजन), २ मैथुन, ३ झोप, ४ अध्ययन व ५ मार्गक्रमण, (भा. प्र. पूर्वखंड). पंचकर्मेंद्रियें १ हात, २ पाय, ३ वाणी, ४ शिश्न व ५ गुद. पंच कर्मेंद्रियें व त्यांच्या अधिष्ठात्री देवता १ वाचा - अग्नि, २ हात - इंद्र, ३ पाय - विष्णु, ४ गुद - सूर्य (मित्र) व ५ शिश्न - प्रजापति, पंचकर्मेंद्रियें व पंच ज्ञानेंद्रियें यांखेरीज मन हें अकारावें इंद्रिय असून त्याची अधिष्ठात्री देवता इंद्र आहे ([सिद्धांतशिरोमणि]) पंचकर्म चिकित्सा १ वमन, २ विरेचन, ३ अनुवासन (स्नेह - बस्ति) ४ निरुह (बस्ति क्काथ) व ५ नस्य अशा पांच प्रकारच्या चिकित्सेला म्हणतात ([आयुर्वेद]) पंचकल्याणी (घोडा) गुडघ्यापर्यंत चारी पाय पांढरे व तोंडावर पांढरा पट्टा असतो असा घोडा. हा शुभलक्षणी मानतात. (अश्वपरीक्षा). पंचकल्याणिक (जिनधर्म) १ गर्मकल्याणिक, २ जन्मकल्याणिक, ३ तपकल्याणिक, ४ केवलकल्याणिक आणि ५ मोक्षकल्याणिक. असे तीर्थंकर भगवानाच्या १ गर्म, २ जन्म, ३ तप, ४ केवळ आणि ५ मोक्ष अशा पांच प्रसंगाच्या उत्सवप्रकारस पंच महाकल्याणिक म्हणतात. पंचकलि (कलह - वास्तव्यस्थानें) १ मिथ्या भाषण, २ उन्माद, ३ काम, ज४ हिंसादि दोष व ५ वैर. परीक्षितानें कलीला प्रयम चार स्थानें नेमून दिलीं (चारचे अंकांत पाहा). त्यानंतर कलीनें पुनः प्रार्थंना केल्यावरून परीक्षितानें आणखी पांच स्थानें कलील दिलीं. ([भा. ग. १. १७. ३९]) पंचकषाय (अ) १ हिरडा, २ आमलक, ३ मंजिष्ट, ४ लोध्रव ५ टेंभुरणी ; (आ) शमी, २ उंवर, ३ अश्चत्थ, ४ वड आणि ५ पळस. शम्युदुम्बरमश्चत्थं न्यग्रोधं च पलाशकम् । यज्ञं यज्ञे विमन्त्रेण दद्यात्पञ्चकषायिकम् । ([भ. पु. १३५-३०]) (इ) १ जांभुळ, २ सांवरी, ३ चिकणा, ४ बकुल आणि ५ बोर. हे पंचकषाय देवीला प्रिया आहेत. जंबूशात्मलिबांटयालं बकुलं बदरं तथा। कषाया पञ्च विज्ञेया देव्याः प्रीतिकराः शुभाः ॥ (दुर्गोत्सवपद्धति) पंच काशी १ वाराणशी, २ गुप्तकाशी, ३ उत्तरकाशी, ४ दक्षिणकाशी (तेन्काशी) व ५ शिवकाशी. पंचकुळी १ भोसले, २ गुजर, ३ शिर्के, ४ मोहिते व ५ महाडीक. हीं महाराष्ट्रांतील पांच प्रसिद्ध क्षत्रिय कुलें. पंचकेणें १ मिरीं, २ मोहरी, ३ जिरें, ४ हिंग आणि ५ धोंडफूल. याअ मसल्याच्या पांच जिनसांना म्हणतात. पंच केदार १ बदरीकेदार, २ मध्यमहेश्वर, ३ तुंगनाथ, ४ रुद्रनाथ व ५ गोपेश्वर. पंच क्लेश १ अविद्या, २ अस्मिता (आहेपणा, मीपणाची गांठ), ३ राग, ४ द्वेष आणि ५ अभिमान. या पांचांपासून उद्भवणार्या स्थूल वृत्ति, यांस क्लेसादिपंचक म्हणतात. ([पातंजलयोग साधनपाद ३]) पंच कोश (आत्म्याचे) १ जडशरीर, २ चैतन्य, ३ मन - बुद्धि, ४ अतिमानस (सूक्ष्मज्ञान) आणि ५ आनंद. (विज्ञानघन आणि आंनदघन) (महायोगी अरविंद) पंच कोश (योगशास्त्र) १ अन्नमय. २ प्राणमय, ३ मनोमय, ४ विज्ञानमय आणि ५ आनंदमय. असे पंचकोश म्हणजे जीवात्म्याची पांच आवरणें. पंचकृष्ण (महानुभाव संप्रदाय) (अ)१ श्रीकृष्ण, २ दत्तात्रय, ३ चांगदेव राऊळ, ४ गुंडम राऊळ आणि ५ श्रीचक्रधर. (आ) १ हंस, २ दत्त, ३ कृष्ण, ४ प्रशांत व ५ चक्रधर. ([म. ज्ञा. को]) पंचाकाश (अ) १ आकाश, २ महाकाश, ३ पराकाश, ४ तत्त्वाकाश आणि ५ सूर्याकाश ([कल्याण योगांक ६२]); (आ) १ घटाकाश, २ मठाकाश, ३ महदाकाश, ४ चिदाकाश आणि ५ निराकाश. ([क. गी. २-२४]) पंचीकरण १ पृथ्वी, २ आप, ३ तेज, ४ वायु आणि ५ आकाश. या पंचमहाभूतांपैकीं प्रत्येकाचा कमी जास्त भाग घेऊन त्या सर्वाच्या मिश्रणानें तयार होणार पदार्थ. याला पंचीकरण अथवा पांच तत्त्वांचें विवरण म्हणतात. ([गी. र. १८१]) पंचखंडें १ आशिया, २ युरोप, ३ अमेरिका, ४ आफ्रिका आणि ५ आस्ट्रेलेशिया असे या पृथ्वीचे पांच मोठे भूभाग. पंचखाद्यें अथवा पंचमेवा (अ) १ खारीक, २ खोबरें, ३ खसखस, ४ वेदाणा व ५ खडीसाखर ; (आ) १ खारीक, २ खोबरें, ३ डाळें, ४ लाह्या व ५ पोहे. पंचख्याति १ असत् ख्याति - शून्यवाद, २ आत्मख्याति - क्षणिक विज्ञानवाद, ३ अन्यथाख्याति - नैयातिक, ४ अख्याति - सांख्य व प्रभाकरमत, आणि ५ अनिर्वचनीय ख्याति - अद्वैत वेदान्त. या पांच ख्याति म्हणजे पदार्थांची प्रतीति. अनिर्वचनीय जे ख्याति। तो वादू निश्चिती मी उद्धवा ॥ ([ए. भा. १६-२०६]). पंच 'ग' कार (गवयाचे) (अ) १ गत, २ गर्व, ३ गांजा, ४ गीता आणि ५ गंगास्नान, हे पंच 'ग' कार वैदिक धर्माचे पंचप्रान होत. गायत्री गोविन्द गौ गीता गङ्गास्नान। इन पाँचोंकी कृपासे शीघ्र मिले भगवान ॥ ([तत्त्वचिं. भाग २]) पंच 'ग' कार दुर्लभ १ गोमती नदी, २ गोमयस्नान, ३ गोदान, ४ गोपीचंदन आणि ५ गोपीनाथदर्शन. पंच गोदानें १ पापधेनु, २ उत्क्रांतिधेनु, ३ वैतरणीधेनु, ४ ऋण धेनु आणि ५ कामधेनु ([म. वा. कोश]) पंचगंगा (अ) १ नंदिनी, २ नलिनी, ३ सीता, ४ मालती आणि ५ विष्णुपदा (ज्वालामुखी पर्वतांत). (गदाधर भाष्य). (आ) १ किरणा, २ धूतपापा, ३ सरस्वती, ४ गंगा व ५ यमुना. (इ) १ शिवा, २ भद्रा, ३ भोगावती, ४ कुंभी आणि ५ सरस्वती ([करवीर महात्म्य]) गोमती गोमयस्नानं गोदानं गोपिचंदनम् । दर्शनं गोपिनाथस्य गकाराः पंच दुर्लभाः ॥ ([स्कंद. नागरखंड.]) पंच गंध (अ) १ कस्तुरी, २ चंदन, ३ कापूर, ४ अगरू आणि ५ मलयागरुचंदन. हीं पांच प्रसिद्ध सुगंधी द्र्व्यें. हीं सर्व कार्यांत शुभदायक होत. कस्तुरीचंदनं चंद्रमगरु द्वितीयं तथा। पचगंधसमाख्यातं सर्वकायेंषु शोभनम् ॥ ([पद्म. पाटाळखंड]). (आ) १ कापूर, २ कंकोळ, ३ लवंग. ४ जायफळ आणि ५ सुपारी. ([दु. श. को.]) पंचगव्य १ गोमूत्र, २ गोमय, ३ दूध, ४ दहीं व ५ तूप. हे पांचहि गाईपासून मिळणारे पदार्थ, सर्व पवित्र, धार्मिक कार्यांत शुद्धिकार्याकडे यांचा उपयोग करतात. गोमूत्रं गोमयं क्षीरं दधिसर्पिस्तथैव च। गवां पञ्च पवित्राणि पुनन्ति सकलं जगत् ॥ ([स्कंद. रेवाखंड]) पंचगीता १ भगवद्नीता, २ गणेशगीता, ३ भगवतीगीता, ४ सूर्यगीता आणि ५ शिवगीता पंचगौड १ सारस्वत, २ कान्यकुव्ज, ३ गौड, ४ उत्कल आणि ५ मैथिल. या पांच उत्तर भारतांतील ब्राह्मणांस पंचगौड म्हणतात. 'गौडाः पञ्चेति विख्याता विंध्ययोस्तरबासिनः।' ([वाराह पुराण]) पंचग्रंथ १ संहिता, २ ब्राह्मन, ३ आरण्यक, ४ पद आणि ५ क्रम. पंच ग्रंथी १ पंचकोश, २ समष्टिसार, ३ मानुष विचार, ४ गुरुबोध आणि ५ सत्यशब्द टकसार या पांच कबीरपंथी ग्रंथास पंचग्रंथी म्हणतात. पंच"च"कार १ चहा, २ चिवडा, ३ चिरूट, ४ चंची आणि ५ चलच्चित्रपट या पंच 'च' कारांनीं समाजपुरुषाला ग्रासलें आहे. पंच 'ज' कार (दुर्लभ) १ जननी, २ जन्मभूमि, ३ जाह्लवी, ४ जनार्दन आणि ५ जनक, जननी जन्मभूमिश्च जाह्लवी च जनार्दनः। जनकः पञ्चमश्चैव जकाराः पञ्च दुर्लभाः ॥ ([सु.]) पंच 'ज' कार तृप्ति न पावणारे १ जांवई, २ जठर, ३ जाया, ४ जातवेद आणि ५ जलाशय. जामाता जठरं जाया जातवेदा जलाशयः। पूरिता नैव पूर्यन्ते जकाराः पञ्च दुर्भराः ॥ ([सु.]) पंचजन (वेदकालीन) (अ) १ पुरु, २ अनु, ३ द्रहयु, ४ यदु व ५ तुर्वश. या पांच जमातींना ऋग्वेदकालीं पंचजन म्हणत ; (आ) १ ब्राह्मण, २ क्षत्रिय, ३ वैश्य, ४ शूद्र व ५ निषाद, (इ) १ गंधर्व, २ पितर, ३ वेद, ४ असुर आणि ५ राक्षस. पंचजल (आपतत्त्व) १ कामजल, २ चंचलजल, ३ आवरणजल, ४ जानीवजल आणि ५ विज्ञानजल. (तत्व - निज - बोध) पंचाम्ल (अ) १ अम्लवेतस, २ आमसोल, ३ महाळुंग, ४ डाळिंब व ५ ईडनिंवु, (आ) १ आमसोल, २ डाळिंब, ३ बोर, ४ वेतस आणि ५ चिंच. (इ) १ बोर, २ डाळिंब, ३ अमसोल किंवा चिंच, ४ चुका व ५ चणकाम्ल - हरभर्याची आंब. कोल - दाडिम - वृक्षाम्ल - चुक्रिका - शुक्तिकारसम् । पंचाम्लकं समुद्दिष्टं तच्चोक्त चाम्लपंचकम् ॥ (रसरत्नसमुच्चय १०-८४) पंचोदन अज (जीवात्मा) १ शब्द, २ स्पर्श, ३ रूप, ४ रस आणि ५ गंध हे पांच विषय यांची पांच भोजने म्हणजे उपभोगाचे विषय होत. विषयरूप पांच प्रकारचे अन्न खातो म्हणून त्यास पंचौदन अज अथवा पंचभोजनी असें म्हटलें आहे. ([अथर्व - अनु - मराठी भाग ३ रा]) पंचोपचार (पूजेचे) (अ) १ ध्यान, २ आवाहन, ३ भक्त्यायुक्त निवेदन, ४ नीराजन व ५ प्रणाम. (आ) १ गंध २ पुष्प ३ धूप, ४ दीप आणि ५ नैवेद्य. ([आन्हिक सूत्रावलि]) पंचतरणी (पंच तरंगिणी) १ विमल, २ कमल, ३ चक्रसुता (चाका नदी), ४ वितस्ता व ५ वैतरणी या पांच नद्यांचे प्रवाह एकत्र येतात असें ठिकाण अमारनाथचे वाटेवर आहे. या पांच धारा म्हणजेच सिंधूचा उगम म्हनतात. पंच तन्मात्रा १ शब्द, २ स्पर्श, २ स्पर्श, ३ रस, ४ रूप आणि ५ गंध. या पंचतन्मात्रा - पंचमहाभूतांचीं मूलतत्त्वें. प्रकृति पुरुष महत्त्वत्व। पंच तन्मात्रा सूक्ष्मस्वभाव ॥ ([ए. भा. १९-१६८]) पंच ताल १ डोली ताल, २ सप्तरुद्रताल, ३ वासुकीताल, ४ लोकताल व ५ सतोपंथ ताल. हीं हिमालयांतील तीर्थें होत. पंच तिक्त १ निम्ब, २ गुळवेल, ३ अडुळसा, ४ परवर (कड् पडवळ) व ५ भटकटया (रिंगणा). या पांच कडू वनस्पतींस म्हणतात. पंचतीर्थें (अ) १ गंगाद्वार, २ कुशावर्त, ३ बिल्वक, ४ नीलपर्वत आणि ५ कनख. हीं पांच तीर्थें हरिद्वार येथें व त्र्यंबकेश्वरास गोदावरीचे परिसरांत आहेत ; (आ) १ वह्लितीर्थ, २ प्रल्हादकुंड, ३ नारदकुंड, ४ कूर्मधारा व ५ लक्ष्मीधारा. बदरीनाथ येथें, पंचत्वचा १ वड, २ पिंपळ, ३ पिंपरी, ४ जांभूळ आणि ५ आंबा. यांच्या सालीं. (धर्मशास्त्र) पंचतंत्र विष्णुशर्मा नामक ब्राह्मणानें रचिलेला प्राचीन संस्कृत ग्रंथ, यांत पांच कथानकें आहेत. या ग्रंथाचे द्वारें पं. विष्णुशर्म्यानें मूर्ख राजपुत्रांस चतुर केलें. पंच देवपादप पादप म्हणजे झाड. झाडें पायांनीं (मुळांनीं) पाणी शोषितात म्हणून पादप. १ मंदार, २ पारिजातक, ३ संतान, ४ हरिचंदन व ५ कल्पवृक्ष, गे पांच स्वर्गलोकींचे प्रमुख वृक्ष, ([अमर]) पंच देवता (नित्य उपासनेच्या) १ सूर्य, २ देवी, ३ विष्णु, ४ गणेश आणि ५ शिव. आदित्यं अंबिकां विष्णुं गणनाथं महेश्वरम् गृहस्थः पूजयेत्पंच भुक्तिमुक्त्यर्थसिद्धये ॥ ([सु.]) पंचदीर्घ १ बाहु, २ नाक, ३ डोळे, ४ छाती आणि ५ पोट. हे पांची अवयव लांब असलेल्यास म्हणतात. सामुद्रिकांत शुभलक्षण मानतात. ([म. वा. को.]) पंच देवी १ दुर्गा, २ पार्वती, ३ सावित्री, ४ सरस्वती व ५ राधिका. पंच देह १ स्थूलदेह, २ सूक्ष्मदेह, ३ कारणदेह, ४ महाकारणदेह आणि ५ कैवल्य - ज्ञानदेह, ([क. गी. २-८]) पंच दुःखें १ गर्मदुःख., २ जन्मदुःख, ४ व्याधिदुःख ५ मृत्युदुःअख. (श्वेता - १-५) पंच द्राविड १ तेळंग, २ द्राविड, ३ महाराष्ट्रीय, ४ कर्नाटकी व ५ गुर्जर. या पांच दक्षिण भारतांतील ब्राह्मणांस पंचद्राविड म्हणतात. द्वाविडाः पंचविख्याता विंध्यदक्षिणवासिनः ॥ ([वाराह पुराण]) पंच द्राविड भाषा १ तामिळ, २ तेलगु, ३ मल्याळम् ४ कन्नड आणि ५ तुळु. पंच दुर्ग १ जलदुर्ग, २ पर्वतदुर्ग, ३ वृक्षदुर्ग, ४ ईरिणदुर्ग, (जेथें कोणत्याहि प्रकारची शेती होत नाहीं असा प्रदेश) व ५ धन्वदुर्ग (वालुकामय प्रदेश), अशीं पांच संरक्षण - साधनें प्राचीन कालीं होतीं. पंच दोष १ काम, २ क्रोध, ३ भय, ४ निद्रा आणि ५ श्वास. हे पांच दोष जेवढे म्हणून देहधारी प्राणी आहेत त्यांच्या ठिकाणीं असतात. ([म. भा. शांति]) पंच धातु १ सोनें, २ रुपें, ३ लोखंड, ४ तांवें आणि ५ जस्त. या पंचधातु. पंचधातूंच्या मिश्रणानें तयार होणारी वस्तु टिकाऊ असते. पंच धान्यें १ गहूं, २ जव, ३ तांदूळ, ४ तीळ व ५ मूग. हवन करण्यास उक्त अशीं पांच धान्यें. पंच धारा (जलप्रपात) १ कूर्मधारा, २ प्रल्हाद धारा, ३ इंद्रधारा, ४ वसुधारा आणि ५ भृगधारा, यांतच कोणीकोणी उर्वशी (उर्वशीचे जन्मस्थान) धारेचा समावेश करतात. उंच उंच पर्वतावरून पडणारे हे पांच जलप्रपात वद्रीनाथाचे परिसरांत आहेत. पंचनाथ १ उत्तर - श्रीवदरीनाथ, २ दक्षिण - श्रींरगनाथ (श्रींरगम्), ३ पूर्व - जगन्नाथ, ४ पश्चिम - श्रीद्वारकानाथ व ५ मध्य - श्रीगोवर्धननाथ (नाथद्वारा - राजस्थान). पंचमी तिथी वैदिक धर्मोत पंचमी तिथीस विशेष महत्त्व आहे. अनेक सण व पर्वें या तिथीस आढळतात. आषाढ शु. ५ स वीज पंचमी म्हणतात. निदान वीज जरी चमकली तर पावसाळा चांगला जाईल, अशी समजूत आहे, श्रावण शु, ५ - नागपंचमी ; भाद्रपद शु. ५ - ऋषिपंचमी ; आश्चिन शु. ५ - ललितापंचमी ; कार्तिक शु. ५ - लाभपंचमी ; माघ शु. ५ - वसंत पंचमी ; फात्गुन व. ५ रंगपंचमी. इ. पंचाग्नि (अ) १ वडवाग्नि, २ मंदाग्नि, ३ जठराग्नि, ४ शोकाग्नि आणि ५ कामाग्नि. ([क. गी. २-३३]); (आ) १ दक्षिणाग्नि, २ गार्हपत्य, ३ आहवनीय, ४ सभ्य व ५ आवसथ्य. हे पांच श्रौताग्नि, होत ; (इ) १ स्वर्ग, २ मेघ, ३ पृथ्वी, ४ पुरुष आणि ५ स्त्री. या पांच अग्निद्वारां मानवाचा पुनर्जन्म होतो. ([छां. अ. ५]) पंचाग्नि विद्या १ द्युलोक, २ पर्जन्य, ३ पृथिवी, ४ पुरुष व ५ स्त्री. यांचे ठिकाणीम अग्नीची द्दष्टि ठेवून उपासना - चिंतन करणें ही पंचाग्नि - विद्या होय. ([ब्रह्मसूत्र शां. भा. अ ३]) पंचाग्निसाधन चारी दिशांना चार अग्निकुंडें प्रज्वलित करून ठेवा - वयाचीं व सूर्याकडे टक लावून तपश्चर्या करावयाची. याला पंचाग्निसाधन म्हणतात. हा विधि ग्रीष्मऋतूंत भरउन्हांत करावयाचा असतो. अशा प्रकारची तपस्या प्राचीन कालीं करीत असत. पंचनद १ वितस्ता, २ इरावती (असिकी), ३ चंद्रभागा (परुष्णी), ४ शतद्रु (सतलज) व ५ विपाशा. हीं वेदकालीन नांवें. या पांच नद्या असलेला (पंजाब) प्रदेश. विवस्तेरावती चंद्रभागा मध्ये सरिद्वारा। शतद्रुश्च विपाशा च तेन पंचनदः स्मृतः ॥ ([वि. पु. तळटीप]) आधुनिक नांवें - १ झेलम, २ चिनाव, ३ रावी, ४ सतलज व ५ बियास. पंच नमस्कार १ अर्हतांना नमस्कार, २ सिद्धांना नमस्कार, ३ आचार्यांना नमस्कर, ४ उपाध्यायांना नमस्कार आणि ५ सर्व संतांना नमस्कार. हे पंच नमस्कार, सर्व पापांचा नाश करणारे व मंगलामध्यें मंगल असे जैन धर्मांत मानले आहेत. पंचपदी देवापुढें नित्य पांच अभंग व पांच पदें म्हणण्याची जी प्रथा तीस पंचपदी म्हणतात. पंच पर्वत १ वैदार, २ वराह, ३ वृषम, ४ ऋषिगिरि व ५ चैत्यक. मगधांत जरासंधाचे राजधानीं गिरिव्रजाचे परिसरांत असलेल्या पर्वतांस म्हणतात. ([मुक्तेश्वर सभा. ६-८८]) पंचोन्मत्त १ बलोन्मत्त, २ मदोन्मत्त, ३ राजोन्मत्त, ४ विजयोन्मत्त आणि ५ महामत्त. असा रावणाचा भाऊ कुंभकर्ण पंचोन्मत्त होता. मदोन्मत्त बलोन्मत्त। राज्योन्मत्त गर्वोन्मत्त। विजयोन्मत्त महामत्त। पंचोन्मत्त कुंभकर्ण ॥ ([भा. रा. यु. २७-५५]) पंच पतिव्रता १ सती, २ पार्वती, ३ अरूंधती, ४ अनसूया आणि ५ शांडिली. पंचपक्वान्ने (अ)१ लाडू, २ पुरणपोळी, ३ साखरभात, ४ बासुंदी व ५ श्रीखंडपुरी. हीं पांच उंची पक्कान्नें. हीं सर्व भोजनाच्या वेळीं एकत्र वाढणें. ही ऐश्वर्याची परमावधि समजली गेली आहे. (आ) १ वीवर, २ लाडू, ३ खाजी, ४ जिलेबी आणि ५ गुळोरी. ([क. क.]) पंच पुरुषार्थ १ धर्म, २ अर्थ, ३ काम, ४ मोक्ष व ५ पराभक्ति. जैसा ज्यासी भावार्थ। तैसा पुरवी मनोरथ। पढिये पंच पुरुषार्थ। तो हरि नांदत वैकृंठीं ॥ ([ए. भा. २४-२७०]) पंच पंच उषःकाल सूयोंदयापूर्वी पांच घटिकांचा काळ. पांच घटिका मिळून दोन तास होतात. हा समय नित्य उठून कार्यप्रवृत्त होण्याला फार प्रशस्त व शुभ मानला आहे. पंच पल्लव (अ) १ वड, २ पिंपळ, ३ पायरी, ४ जांभूळ व ५ आंबा ([ब्राह्मांड पुराण]); (आ) १ आंबा, २ उंचर, ३ जांभूळ, ४ रुई व ५ पिंपळ ; (इ) आंबा, २ जांभूळ, ३ कवठ, ४ महाळुंग आणि ५ वेल. (शब्दरत्न प्रकाश) पंच पर्वकाळ (अ) १ व्यतिपात, २ वैधुति, ३ संक्रांत, ४ पौर्णिमा व ५ अमावास्या. (आ) १ चतुर्दशी, २ अष्टमी, ३ अमावास्या, ४ पौर्णिमा व ५ रविसंक्रांति, हे पर्वकाल होत. पंचपर्वा विद्या १ वैराग्य, २ विचार, ३ योग, ४ तप व ५ ईशभक्ति, अशी पांच पर्वांनीं युक्त अशी विद्या आहे. ही साध्य झाली म्हणजे जीव मुक्तावस्थेस जातो असें वल्लभ संप्रदायांत मानलें आहे. पंच परमेष्ठी (जैनधर्म) १ अर्हतपरमेष्ठी, २ सिद्धपरमेष्ठी, ३ आचार्य, ४ उपाध्याय आणि ५ साधुपरमेष्ठी. ([रत्नाकरंडक श्रावकाचार]) पंच परिवर्तनें (जैनधर्म) १ द्रव्यपरिवर्तन, २ क्षेत्रपरिवर्तन, ३ कालपरिवर्तन, ४ भावपरिवर्तन आणि ५ भवपरिवर्तन. पंच पुष्प १ चंपक, २ आम्र, ३ शमी, ४ कमल आणि ५ कण्हेर. हीं देवतांना प्रिय आहेत. पंच प्रमाणें १ शब्दप्रमाण, २ अर्थापत्ति प्रमाण, ३ अनुमान प्रमाण, ४ उपमान प्रमाण आणि ५ प्रत्यक्ष प्रमाण. पंच प्रलया (अ) १ नित्यप्रलय, २ मरणप्रलय, ३ दैनंदिनप्रलय. ४ ब्रह्मप्रलय व ५ आत्यंतिक प्रलय. ([भा. रा. किष्किंधा १२-२४]) (आ) निद्र - प्रलय, २ प्राण - प्रलय, ३ भूत - प्रलय, ४ ब्रह्म - प्रलय व ५ विवेक - प्रलय (ह्रत्पद्म.) पंच प्रयाग (अ) १ विष्णुप्रयाग - लेटी व अलकनंदा संगम, २ कर्णप्रयाग - पिंडार व अलकनंदा, ३ रुद्रप्रयाग - मंदाकिनी व अलकनंदा, ४ देवप्रयाग - भागीरथी व अलकनंदा व ५ भूतप्रयाग - यमुना व गंगासंगम. अलाहाबादेस जो त्रिवेणी संगम आहे हा भूतप्रयागव बाकीचे चार हिमालयांत बदरीनारायणाचे वाटेवर आहेत. दूरमार्ग पंचप्रयाग। वेदप्रयाग। शिवप्रयाग। कर्णप्रयाग ब्रह्मप्रयाग। अतिगुप्तप्रयाग पांचवा. ([भा. रा. बाल. ७-२३]) पंच प्रवृत्ति जीवनाला आधारमूत १ जिजीविषा - जगण्याची इच्छा, २ विजिगिषा - जिंकत राहाण्याची ३ रिंरसा - सुखाचा शोध घेण्याची, ४ जिज्ञासा - जाणण्याची व ५ मुमुक्ष - मुक्त होण्याची इच्छा. (माऊली जानेवारी १९६३) पंच पांडव १ धर्म, २ भीम, ३ अर्जुन, ४ नकुल, आणि ५ सहदेव. पंच प्राण १ प्राण - अन्नप्राशन, २ अपान - गुदस्थानीं मलमूत्र धारण करणार, ३ व्यान - पाचन, ४ उदान - ऊर्वगमन करणारा व ५ समान - डोळे मिटणें व उघडणें. हे पंचप्राण शरिरांतील पांच प्राणवायु होत. त्यांची स्थानें अनुक्रमें १ नाक, २ गुद, ३ सर्व शरीर, ४ कंठस्थान व ५ नाभिस्थान हीं होत. पंचप्राण (नाटयाचे) १ संघर्ष, २ संवाद, ३ प्रसंग, ४ समस्था आणि ५ स्वभाव लेखन (केसरी) ८-१०-१९५४. पंच प्राण (लौकिकांत) १ बायको, २ तिची बहीण, ३ सासू, ४ सासरा व ५ मेहूणा. हे कलिनिर्मित पंचप्राण होत. गृहिणी भगिनी तस्याः श्वशुरौ श्याल इत्यपि। प्राणिनां कलिना सृष्टाः पंचप्राणा इमे परे ॥ ([रामदास मासिक आषाढ १८७४]) पंचप्रान (भारतीय संस्कृतीचे) १ वेद, २ उपनिषदें, ३ श्रीभद्भग - वद्गीता, ४ रामायण व ५ महाभारत (पुरुषार्थ) पंच प्राण वाङवयाचे १ प्रयत्न, २ प्रचीति, ३ प्रक्षोभ, ४ प्रसाद व ५ प्रतिभा (महाराष्ट्र. ध. प्रणेते) पंचप्राण संस्कृतीचे १ विचार (तर्क), २ भावना आणि कल्पना, ३ कला, ४ नीति आणि ५ धर्म (साहित्याचा संसार) पंच प्रेषित १ झरतुष्ट्र, २ महावीर, ३ बुद्ध, ४ खरीस्त व ५ महंमद. 'पंचैते प्रेषिताः तेषां चिन्तनं हितकारकम्' (श्रीयुत जून १९६३) पंच प्रासाद मध्यभागीं गर्भागाराव एक मुख्य कळस व चार बाजूंस चार लहान कळस अशा प्रकारच्या शिल्परचनेस पंच प्रासाद म्हणतात. पंच बला १ बला, २ नागबला, ३ महाबला, ४ अतिबला व ५ राजबला. बला म्हणजे आकस्मिक संकट, अथवा पीडा. ([दु श. को.]) पंच बलें (अ) १ बाहुबल, २ अमात्यबल (सल्लागार - सामान्य लोकांचे बाबतींत), ३ धनबल, ४ कुलबल व ५ बुद्धिबल. हीं पांच प्रकारचीं बलें होत ; (आ) १ इंद्रियबल, २ मनोबल, ३ बुद्धिबल, ४ नैतिक बल आणि ५ शरीरबल. (इ) १ श्रद्धा, २ उत्साह, ३ समाधि, ४ स्मृतिव ५ प्रज्ञा (अभिधम्म) पंच बदरी १ विशाल बदरी (बदरीनाथ), २ योगबदरी (पंडुकेसर), ३ भविष्यबदरी (तपोवन - जोशी मठापासून ८ मैल), ४ वृद्धबदरी (अत्रिमठ) व ५ ध्यानबदरी (सीलांग). हीं पांची स्थानें स्थानें बदरीनाथाचे परिसरांत आहेत. पंच बाजारपेठा भक्तीच्या (महाराष्ट्र) १ श्रीक्षेत्र पंढरी, २ आळंदी, ३ देहू, ४ सज्जनगड आणि ५ पैठण, (माऊली मासिक) पंचबाण - पंचशर (अ) १ अरविंद (लालकमल), २ अशोक, ३ आम्रमंजिरी, ४ जाईचें फूल किंवा मोगरा व ५ नीलकमल. हे पंचबाण म्हणजे मदनाचीं आयुधें होत. मदनाला पंचबाण अथवा पंचशर म्हणतात. याच्या धनुष्याचे बाण म्हणजे पांच फुलें असें मानलें आहे. (आ) (गुणवाचक) १ उन्माद आणणारा, २ तापन - तप्त करणारा, ३ शोषण -- कृश करणार, ३ स्तंभ्भन - क्रियाहीन व ५ संमोहन - मोह पाडणारा. अरविदमशोकं च चुतं च नवमल्लिका। नीलोत्पलं च पञ्चैते पंचबाणस्य सायकाः ॥ ([सु.]) "संमोहनं च कामस्य पंचबाणाः प्रकीर्तिताः ॥ ([सु.]) पंच बिल्व १ तुलसी, २ बिल्व, ३ निर्गुडी, ४ लिंबू व ५ आवळी. तुलसी बल्वं निर्गुडी जंबीरामलकं तथा। पंचबिल्वसमाख्यातं एकबिल्वं शिवार्पणम् ॥ (चंडिकोपास्ति दीपिका। पंचब्रह्म सनातन १ तारक, २ दंडक, ३ कुंडल, ४ अर्धचंद्रक आणि ५ बिंदुसंकाश असें सनातन पंच ब्रह्म आहे. ([क. गी. २-१]) पंचात्मक ब्रह्म १ ॐ, २ गणपती, ३ मन, ४ परब्रह्म व ५ आत्मा. ॐ हाच पंचविध किंबा यासच पंचात्मक ब्रह्म म्हणतात. (ध्यान योग रहस्य) पंच प्रवाह भारतीय संस्कृतीचे १ यज्ञ, २ योग, ३ ज्ञान, ४ भक्ति आणि ५ कर्म. ([ज्ञानेश्व्री प्रवेशिका प्रस्तावना]) पंचभयें १ ईश्वरभय, २ धर्मभय, ३ समाजभय, ४ शासनभय व ५ शरीरभय. हीं पांच भयें मानवाला दुराचरणापासून परावृत्त करणारीं. (तुलसीदल) पंच भक्तिमती १ अनसूया, २ शबरी, ३ गोपीजन, ४ विदुर - पत्नी व ५ राणी मीरा. या पांच प्रसिद्ध भक्तिमती होत. पंचभद्र (अ) १ गुळवेल, २ पित्तपापडा, ३ वाळा. ४ काडे चिराईत व ५ सुंठ. या पांच वनस्पतींस आर्यवैद्यकांत पंचभद्र म्हणतात. (आ) १ सर्व शरीर पिवळें असून पाय आणि तोंड मात्र श्वेतवर्ण असणारा घोडा. किंवा १ कंठ, २ पाठ, ३ मुख, ४ कटि व ५ पार्श्वभाग या पांच ठिकाणीं भोवरें असलेल्या घोडयास म्हणतात. हा शुभ लक्षणी मानतात. ([म. वा. को.]) पंचभ्रम १ भेदभ्रद, २ कर्तूत्वभ्रम, ३ संगभ्रम, ४ विकारभ्रम आणि ५ सत्याभास. (मो. प्र.) पंचभाव (अ) १ शांत, २ दास्य, ३ सख्य, ४ वात्सल्य आणि ५ मधुर. या पंचभावास आध्यात्मिक जगतांत पंचभाव म्हणतात. (आ) १ सृष्टि, २ स्थिति, ३ प्रलय, ४ तिरोभाव व ५ अनुग्रह (संस्कृतीचीं प्रतीकें.) पंच भावना (अ) १ आदर, २ भीति, ३ आश्चर्य, ४ आनंदा व ५ प्रेम (आ) १ भय, २ विरोध, ३ आप्तपणा, ४ स्नेह व ५ भक्ति. या पांच उत्कट भावनांपैकीं परमेश्वरासंबंधानें राज वेनाची एकहि भावन नव्हती, अशी भागवतांत कथा आहे. ([भाग ७-१-३७]) पंचभिक्षु १ कौडिण्य, २ वप्र, ३ भद्र्यु, ४ महानाम व ५ अश्वजित् . हें गौतमबुद्धानें प्रथत उपदेशिलेले पांच भिक्षु होत. पंच भिक्षुव्रतें १ चोरी न करणें, २ ब्रह्मचर्य, ३ त्याग, ४ लोभाचा अभाव व ५ अहिंसा. अस्तेयं ब्रह्मचर्यं च त्यागो लोभस्तथैव च। व्रतानि पञ्च मिक्षूणामहिंसा परमाणि वै ॥ ([मार्कण्डेय पु.]) पंचभू - संस्कार १ परिसमूहन - पाणी शिंपडणें, २ उपलेपन - गोमयानें सारवणें, ३ उल्लेखन - देवता नामांचा रेखानें उल्लेख करणें, ४ मृद्उद्धरणमाती उकरून काढणें आणि ५ अभ्युक्षण - प्रोक्षण करणें, होमहवन प्रसंगीं अग्नि प्रतिष्टापना करण्यापूर्वी अशा पांच प्रकारांनीं भृ - शुद्धि करावयाची असते. (गृह्मसूत्रें) पंच भेद (संन्याअ दीक्षेचे) १ आश्रच, २ तीर्थ, ३ सरस्वती, ४ भारती व ५ परमहंस. असे पांच प्रकार. पंचभृंग १ देवदालीं (देवडंगरी), २ शमी, ३ भृंग (भांग), ४ निर्गुंडी आणि ५ तामलक. ([म. वा. को.]) पंच 'म' कार १ मद्य, २ मांस, ३ मत्स्य, ४ मुद्रा आणि ५ मैथुन. या पांच वस्तूंचें सेवन हा शाक्तपंथांतील वाममागींयांत आचारधर्म समजला जातो. मकारपञ्चकं देवि। देवानामपि दुर्लभम् ॥ (गुप्तसाधनतंत्र) पंच महाकव्यें (संस्कृत) १ रघुवंश, २ कुमारसंभव, ३ किराता - र्जुनीय, ४ शिशुपालवध व ५ नैषधचरित. पंच महाग्रह १ मंगळ, २ बुध, ३ गुरु, ४ शुक्र आणि ५ शनि. पंच मानव (पांच प्रकारचे लोक) १ विद्वान, २ शूरवीर, ३ व्यापारी, ४ कारगीर व ५ वन्यजन. ([अथर्व - अनु - मराठी]) पंच महातत्त्वांचीं देवस्थानें १ पृथ्वी - कांचीवरम्, २ आपजंबुकेश्वरम्, ३ तेज - अरुणाचलम्, ४ वायु - कालहस्ति व ५ आकाश - चिदंबरम् . हीं पांचीं देवस्थानें दक्षिण भारतांत मद्रास राज्यांत आहेत. पंच महातत्त्वांचीं पांच विषय १ पृथ्वी - गंध, २ आप - रस, ३ तेज - रूप, ४ वायु - स्पर्श आणि ५ आकाश - शब्द, (तत्त्व - निजबोध - विवेक) पंच महातत्त्वांचीं दहा इंद्रियें १ पृथ्वी - नाक व गुद, २ जल - जीभ व लिंग, ३ तेज - नेत्र व पाय, ४ वायु - त्वचा व हात आणि ५ आकाश - कान व मुख. (तत्त्व - निजबोध - विवेक) पंच महादीक्षा १ स्पर्श - दीक्षा, २ द्दष्ट - दीक्षा, ३ ध्यान - दीक्षा, ४ शब्द (मंत्र)- दीक्षा आणि ५ संकल्प - दीक्षा. (माऊली विशेषांक) पंच महापातकें (अ) १ ब्रह्महत्त्या, २ भरूणहत्त्या, ३ बालहत्या, ४ गोहत्त्य आणि ५ स्त्रीलत्त्या ; (आ) १ ब्रह्महत्त्या, २ सुरापान, ३ चोरी, ४ गुरुदारागमन आणि ५ अशांशीं संसर्ग ठेवणें. हीं पंचमहापातकें व हीं ज्यांचेकडून घडतात ते पंचमहापातकी होत. ([स्कंदकुमा. ३६-२]) पंच महाभूतें १ पृथ्वी, २ आप, ३ तेज, ४ बायु आणि ५ आकाश, हीं पंच महाभूतें परमात्म्यानें विश्वोत्पत्तीकरितां निर्माण केलीं. ([क. गी. २-१३]) यांना भूतपंचक म्हणतात. पंचमहाभूतांचे स्वभाव, धर्म, गुण, आकार आणि रंग १ पृथ्वी - कठोरता - गंध - भ्रमण - स्थूल - पीत २ आप - शीतलत्व - रस - अधोगमन क्रिया - स्थूल - श्वेत. ३ तेज - उष्ण अथवा प्रकाश - रूप - ऊर्ध्वगमन क्रिया - स्थूल - लाल - सूक्ष्माकार. ४ वायु - कोमलत्व - स्पर्श अथवा शब्द - तिर्यग्गमन क्रिया - सूक्ष्माकार - हिरवा. ५ आकाश - शून्यधर्म - निर्गुण - अक्रिय - गोलाकार - रंगरहित. ([पंचग्रंथी]) पंच महाभूतांचीं पांच प्रतीकें १ पृथ्वी - आयत, २ आप - वर्तुळ, ३ तेज - त्रिकोन, ४ वायु - चंद्रकोर व ५ आकाश - ज्योत. (केसरी २१ ऑगस्ट १९६०) पंच मात्रा १ अकार, २ उकार, ३ मकार, ४ इकार आणि ५ बिंदु, या पंच मात्रा होत. पंच महायज्ञ (अ) १ ब्रह्मयज्ञ - अध्यापन, २ पितृयज्ञ - तर्पण, ३ देवयज्ञ - वैश्वदेव होम, ४ भूतयज्ञ - बलिहरण व ५ मनुष्ययज्ञ - अतिथि - सक्तार. अध्यापनं ब्रह्मयज्ञः पितृयज्ञश्च तर्पणम् । होमो दैवो बलिर्भूंतो नृयज्ञोऽतिथिपूजनम् ॥ ([मनु.]) (आ) १ मातृपितृभक्ति, २ पातिव्रत्य, ३ समता, ४ मित्रांचा द्वेष न करणें व ५ विष्णुभक्ति. पित्रोरर्चाऽथ पत्युश्च साम्यं सर्वजनेषु च। मित्राद्रोहो विष्णुभक्तिरेते पञ्चमहामखाः ॥ ([पद्म. सृष्टि, ७-१३]) पंच महाविषें १ सोमल, २ हरताळ, ३ मनशीळ. ४ वत्सनाभ आणि ५ सर्प विष. (शा. नि.) पंच महाव्रतें (जैनधर्म) (अ) १ अहिंसा, २ असत्य त्याग, ३ अस्तेय ४ ब्रह्मचर्य व ५ अपरिग्रह. अशीं पांच व्रतें पाळण्याची भिक्षु - मिक्षुणींस शपथ घ्यावी लगते ; (आ) १ सत्य, २ अस्तेय, ३ अहिंसा, ४ ब्रह्मचर्य व ५ शास्त्र आज्ञापलन. हीं सर्वसामान्य पंचमहाव्रतें. पंच महाव्याधि १ मूळव्याध, २ यक्ष्मा (क्षय), ३ कोड, ४ प्रमेह आणि ५ उन्माद. पंच महाभूतांचीं पंचवीस तत्त्वें (१) पृथ्वी - १ अस्थि, २ मांस, ३ नाडी, ४ त्वचा व ५ रोम ; (२) अपा - १ शुक्त (वीर्य), २ शोणित (रक्त), ३ लाळ, ४ मूत्र व ५ स्वेद ; (३) तेज - १ क्षुधा, २ तुषा, ३ आलस्य, ४ निद्रा व ५ कांति ; (४) वायु - १ चलन, २ वलन, ३ पलायन, ४ प्रसरण व ५ आकुंचन ; (५) आकाश - १ काम, २ क्रोध, ३ शोक, ४ मोह व भय. (विचारचंद्रोदय दर्शन) पंच महाशब्द (अ) १ झांज, २ नगारा, ३ कर्णा, ४ चौघडा व ५ पिपाणी ; (आ) १ शिंग, २ ताशा, ३ नगारा, ४ शंख व ५ जय - घंटा, हीं पांच मोठया आवाजाचीं वाद्यें होत व तीं प्राचीन काळीं राजाची स्वारी निघाली असतां वाजवीत असत. तो एक प्रकारचा मान (विरुद) समजला जात असे. पंच महासरोवरें १ बिंदु सरोवर - सिद्धपूर - मातृगया, २ नारायण सरोवर - कच्छप्रांत, ३ मानस सरोव - हिमालयांत, ४ पुष्कर - अजमीरजवळ व ५ पंपा सरोबर - होसपेठजवळ. पंच महासागर १ उत्तर महासागर, २ दक्षिण महासागर, ३ हिंदी महासागर, ४ पॅसिफिक (प्रशांत) महासागर आणि ५ अटलांटिक महासागर, हे पृथ्वीवरील पंच महासागर होत. यांत प्रशांत महासागर अधिक खोल व मोठा आहे. पंच माता १ राजपत्नी, २ गुरुपत्नी, ३ मित्रपत्नी अथवा भ्रातृपत्नी, ४ पत्नीमाता (सासू) आणि ५ आपली माता. या पांच माता - मातेसमान होत. ([वृ. चा. ४-२०]) पंच प्यारे शिखांचे दहवे गुरु. गुरु गोविंदसिंग यांनीं खालसा पंथ स्थापन केला. त्यांनीं ज्या पहिल्या पांच जणांना पंथाची दीक्षा दिली त्यांस पंचप्यारे म्हणतात. तेः - १ दयाराम, २ धरमचंद, ३ मुखनचंद, ४ साहेबचंद व ५ हिंमतराय. (शिखांचा इतिहास) पंचमुखें (शिवदेवतेचीं) १ सद्योजात, २ वामदेव, ३ अघोर, ४ तत्पुरुष आणि ५ ईशान. अशीं शिवाचीं पांच मुखें व स्वरूपें होत. (पाशुपततंत्र) यांनाच पंचब्रह्में असेंहि म्हणतात त्यांपासून अनुक्रमें १ रेणुकाचार्य, २ दारुक (मरुल), ३ घंटाकर्ण (एकोराम, ४ धेनुकर्ण (पंडिताराध्य) व ५ विश्वकर्ण (विश्वाराध्य) असे पंचाचार्य अवतरले. (सुप्रवोधागम) पंच मुद्रा (अ) (जप विधि) १ कमल, २ कलश, ३ धेनु, ४ ज्ञान आणि ५ अंजलि. अशा पांच प्रकारच्या मुद्रा करून जप करावा असें सांगितलें आहे. कमलं कलाशं धेनुं ज्ञानमञ्जलिमेव च। पञ्चमुद्राः प्रदशीं श्रीसूक्तं च जपेद्बुधः ॥ (श्रीसूक्त फलश्रुति) (आ) (मुद्रा धारण) १ चक्र, २ शंख, ३ गदा, ४ पद्म आणि ५ नारायण. अशा पांच मुद्रा मध्वसंप्रदायी शरीरावर धारण करतात. (इ) (दीक्षाविधि) १ भिक्षापात्र, २ दंडकाष्ठ, ३ भगवी कंथा, ४ कमंडलु व ५ विभूति, या पांच वस्तु वीरशैव संप्रदायांत दीक्षाविधीस लागतात. त्यांसहि पंचमुद्रा म्हणतात. (ई) ([योगशास्त्र]) १ चाचरि, २ भूचरी, ३ अगोचरी, ४ खेचरि आणि ५ अलक्ष्य. ([क. क. स्तबक ८]) पंच मूल (अ) १ शालपणीं, २ पृष्टिपणीं, ३ रिंगणी, ४ डोरली व ५ गोखरूं (लधुपंचमूल), (आ) १ वेल, २ ऐरण, ३ टेंटू, ४ पाडळ व ५ शिसव, ([बृहत्पंचमूल]), (इ) १ शतावरी, २ विदारिकंद, ३ जीवंती, ४ पाषाणी व ५ जीवक, (ई) १ गंधाणागवत, २ हला, ३ अश्वदंष्ट्रा, ४ शिरीष व ५ कासमिंदा (तृणपंचमूल). (उ) १ शर, १ इक्षु, ३ दर्म, ४ कसई व ५ साळी भात (तृणपंचमूल). (ऊ) १ जीवक, २ ऋषभक, ३ मेद, ४ महामेद व ५ जीवन्ती. (ए) १ पुनर्नवा, २ बला, ३ एरंड, ४ रान उडीद व ५ रानमूग, (ऐ) १ गोखरूं, २ लहान बोरी, ३ इंद्रवारुणी, ४ कासविंदा व ५ शिरस. (ओ) १ गुळवेल, २ मेडशिंगी, ३ उपलसरी, ४ विदारिका व ५ निशा (वल्लीपंचमूल) ([म. वा. को.]) पंच मुळें १ डाय (दाय), २ डोला, ३ रिंगणी, ४ रानबांगीं आणि ५ गोक्षुर यांस आर्यवैद्यकांत पंचमुळें म्हणतात. पंच मूर्खलक्षणें १ गर्विष्ठ, २ दुरुत्तरें करणें, ३ हट्टी, ४ अप्रिय भाषण करणें व ५ दुसर्याचें भलेंबुरें न जाणणें. मूर्खस्य पंचचिह्लानि गर्वी दुर्वाचनी तथा। हठी चाप्रियवादी च परोक्तं नैव मन्यते ॥ ([सु.]) पंचमूत्रें १ गाय, २ शेळीं, ३ म्हैस, ४ मेंढी व ५ गाढव या पांच प्राण्यांचीं मूत्रें चेतनावर्धक औषधी आहेत. गोजनिका महिषीणां नूत्रं गर्दभकस्य च। पंचमूत्रं कटूष्णस्य शोधनं वृष्यमीरितम् (शा. नि.) पंच मोक्षासनें १ पर्यंक, २ अर्धपर्यंक, ३ वज्र, ४ वीर आणि ५ सुखासन - पद्मासन पूर्वक - कायोत्सर्ग, ([संस्कृतिकोश]) पंचमृत्तिका १ विटकर, २ गेरू, ३ क्षार मृत्तिका, ४ भस्म आणि ५ वारुळाची माती. या पांचांना पंच मृत्तिका म्हणतात. व त्या पवित्र मानतात. इष्टिका गैरुका लोणं भस्मवलंइकमृत्तिका। रसप्रयोगकुशलैः कीर्तिताः पंचमृत्तिकः ॥ (र. र. समुच्चय १०. ८३) पंच मोक्षसाधनें १ मुद्राधारण, २ त्रिपुंड्र, ३ विष्णुनामें ठेवणें, ४ विष्णुप्रिय माला धारण करणें व ५ 'ॐ नमो नारायणाय' हा मंत्रोपदेश. हीं पांच मोक्षसाधनें रामानुज संप्रदायांत मानलीं आहेत. पंच यज्ञ १ स्नान, २ दान ३ तप, ४ होम व ५ पितृयज्ञ (तर्पण). हे पांच यज्ञ नित्याचे होत. पंच योग (अ) १ क्रियायोग, २ मंत्रयोग, ३ ह्ठयोग, ४ नादयोग, आणि ५ राजयोग ; (आ) १ मंत्रयोग ; २ स्पर्शयोग, ३ भावयोग, ४ अभावयोग आणि ५ महायोग, ([लिंग. अ. ५५]) पंच रत्न १ रामलला नहच्छू, २ पार्वती मंगल, ३ जानकी मंगल ४ वैराग्य सांदीपनी आणि ५ बरवैरामायण. या श्री संत तुलसीदासांच्या ग्रंथास म्हणतात. पंच रत्नें (अ) १ माणिक, २ नील, ३ पाच, ४ पुष्कराज व ५ हिरा ; (आ) १ सोनें, २ रुपें, ३ मोतीं, ४ माणिक आणि ५ पोवळें. हीं सर्व देवांना प्रिय अशीं पांच रत्नें ([विष्णुधमोंत्तर]); (इ) १ इंद्रनीलमणी, २ हिरा, ३ माणिक, ४ मोतीं व ५ प्रवाळ. नीलकं वज्रंक चेति पद्मरागश्च मौक्तिकम् । प्रवालं चेति विज्ञेयं पंचरत्नं मनीषिभिः ॥ ([सु.]) पंच रत्नें (सौराष्टाची) १ नदी, २ नारी, ३ घोडे, ४ श्री. सोमनाथ आणि ५ द्वारका. (हरिदर्शन). सौराष्ट्रे पंचरत्नानि नदीनारीतुरंगमाः। चतुर्थं सोमनाथं च पञ्चमं हरिदर्शनम् ॥ (केसरी ११-६-१९५१) पंचरत्न गीता १ श्रीभगवद्नीता, २ विष्णुसहस्त्रनाम, ३ भीष्मस्तवराज, ४ अनुस्मृति व ५ गजेंद्रमोक्ष या पांच अध्यात्म ग्रंथांस समुच्चयानें. पंचरसा आवळ्याला संस्कृतमध्यें पंचरस हें नांव आहे. हें अत्यंत आरोग्यदायक असून यांत पंचरसांचें मिश्रण असतें. यापासून आयुर्वेदांतील दीर्घायुदायक च्यवनप्राशा हें औषध तयार करतात. पंचरसी १ सुवर्ण, २ रुपें, ३ लोह, ४ तांबें व ५ जस्त. या पांच धातूंच्या मिश्रणानें बनविलेली वस्तु, पंच राजचिह्रें १ छत्र, २ चामर, ३ सिंहासन, ४ मुकुट आणि ५ राजदंड. पंच लवणें १ सामुद्र, २ सैंधव, ३ संचळ, ४ बिडलोण आणि ५ बांगड्खार. पंच लक्षणें (अनन्य भजनाचीं) १ निरपेक्षता, २ ईशचिंतन, ३ शांति, ४ समदर्शन व ५ निर्वैर.([ए. भा. १४-१६२ ते १८५]) पंच लक्षणें (धश्चोटाचीं) १ सामान्य मनुष्याच्या दुपटीनें आहार, २ वेळीं अवेळीं झोपणें. ३ अति विषयलंपट, ४ मान आणि ५ अपमान. या दोहोंबद्दल सारखाच बेफिकीर. आहारं द्विगुणं प्रोक्तं शय्या च कुचचर्दनम् । नास्ति मानापमानं च धश्चोंट पंचलक्षणम् ॥ ([सु.]) पंच लक्षणें (पुराणांचीं) १ सर्ग - उत्पत्ति, २ प्रतिसर्ग - संहार, ३ पुनरुत्पत्ति, ४ मन्वन्तर (वेगवेगळ्या मनूच्या कालांतील कथा) आणि ५ वंशानुचरित. (सूर्यचंद्रवंशीय राजांच्या कथा.) सर्गश्च प्रतिसर्गश्च वंशो मन्वत्नराणि च। वंशानुचरितं चैव पुराणं पंचलक्षणम् ॥ ([सु.]) पंच लक्षणें (पुरुषाचीं) १ सत्पात्रीं त्याग, २ गुणाचा प्रेमी, ३ बंधुवर्गास समान भाग देणारा, ४ शात्र जाणणारा आणि ५ पराक्रमी. पात्रे त्यागी गुणे रागी संविभागी च बंधुषु। शास्त्रे बोद्धा रणे योद्धा पुरुषः पंचलक्षणः ॥ ([सु.]) पंच लक्षणें व्याख्यानाचीं १ पदांचा च्छेद करणें, २ अर्थ सांगणें, ३ समासांचा विग्रह करणें, ४ वाक्यांची अन्वयद्वारा योजना करणें आणि ४ आक्षेपांचे समाधान. "आक्षेपस्य समाधानं व्याख्यानं पंचलक्षणम् ।"(पंचदशी) पंच लक्षणें (श्रेष्ठत्वाचीं १ निष्काम, २ मननशील, ३ शमदमसंपन्न ४ अद्वेष्टा व ५ समद्दष्टि. निरपेक्षं मुनिं शान्तं विवैंरं समदर्शिनम् । ([भाग. ११-१४-१६]) पंच लहरी १ गंगालहरी, २ पीयूषलहरी, ३ सुधालहरी, ४ अमृतलहरी व ५ करुणालहरी. या जगन्नाथपंडितकृत पंचकाव्यांना म्हणतात. ([आपटे कोश]) पंच 'ल' कार संपन्न स्त्री भाग्यानेंच मिळतें १ अनुकूल, २ निर्मल. ३ कुलीन, ४ कुशल आणि ५ सुशील. अनुकूलां विमलागीं कुलजां कुशलां सुशीलसंपन्नां। पंच 'ल' कारां भार्यां पुरुषः पुण्योदयाल्लभते ॥ ([सु.]) पंच लावण्यें स्त्रीजीवनांतील १ निद्रासौंदर्य, २ स्ननसौंदर्य, ३ मानसौंदर्य, ४ रागसौंदर्य आणि ५ अनुरागसौंदर्य. हीं स्त्रीजीवनांतील पांच प्रकारचीं लावण्यें होत. पंच लोह १ कांसें, २ पितळ, ३ तांबें, ४ शिसें व ५ कथील. हे पांच धातु एकत्र केल्यानें तयार होणारा धातु. ([आयुर्वेद]) पंच 'व' कार १ विद्या, २ वपु, ३ वाचा, ४ वस्त्र आणि ५ विभव. हे पांच 'व' कार मनुष्याला वैभव प्राप्त करून देणारे आहेत. "वका रेः पञ्चमिहींनो नरो नाप्नोति गौरवम् ॥ ([सु.]) पंच वह्लि १ प्रलयानल, २ विद्युदानल, ३ वडवानल, ४ शिवनेत्रानल व ५ द्वादशादित्यरूपानल. असे पांच अग्नि. ([हंस कोश]) पंच वक्त्र - वदन शिवाचीं पांच मुखें १ सद्योजात, २ तत्पुरुष, ३ अघोर, ४ वामदेव व ५ ईशान. पंच वल्कलें (अ) १ अश्वत्थ, २ अंजीर (न्यग्रोध), ३ उंबर, ४ पिंपरी आणि ५ वेतस यांच्या साली. यांना पंच वल्कलें म्हणतात ; (आ) १ वड, २ उबंर, ३ पिंपळ. ४ पासेरस आणि ५ नांदुखीं किंवा वेतस. पंच वर्ज्य नामें १ आत्मनाम, २ गुरुनाम, ३ कृपणनाम, ४ ज्येष्ठापत्यनाम व ५ पत्नीनाम. ज्याला पुष्कळ जगण्याची इच्छा असेल त्यानें या पांचांस नांवानें संबोधूं नये. सौमाग्यवतीनें पतीचें नांव घेऊं नये हें अनुमेय समजावें. पंच वज्रनिवारक १ सुमन्तु, २ वैशंपायन, ३ पुलस्त्य, ४ पुलह आणि ५ जैमिनी. ([प्रा. च. को.]) पंचवर्ण १ तांबडा वर्ण - रेडइंडियन्स, २ पांढरा - युरोपियन, ३ काळा - शिद्दी, ४ पिवळा - चिनी - जपानी व ५ सांवळा - भारतीय अशी पांच वर्णोंची प्रजा जगांत आहे. (महाराष्ट्रांत विनोबा. भाग २ रा) पंच वाचा १ वैखरी, २ मध्यमा, ३ पश्यन्ती, ४ परा आणि ५ अनिर्वाचा. ([सि. वो. ३४-३७]) पंच वार्तिक महानुभवावी व्याकरण गुंथ. यांत - १ सूत्रलक्षन, २ सूत्रप्रकृतिलक्षण, ३ सूत्रकारकलक्षण, ४ सूत्रव्याख्यानलक्षण व ५ सूत्रस्वरूपलक्षण. अशीं पांच प्रकरणें असल्यामुळें म्हणतात. ([म. शब्दकोश]) पंच वाद्यें १ तंतिवीणा, २ वितंत, ३ मृदंग, ४ घनकांस्य व ५ अनाहत वेणुनाद. अशीं पांच वाद्यें आणि त्यांचे नाद आहेत. पंच वानरशार्दूल १ ऋषभ, २ शरम, ३ नीळ. ४ गवाक्ष व ५ गवय. हे पांच रामरावणयुद्धांतील प्रमुख वानरवीर. पांचही वीर संग्रामशीळ। ऋषभ शरम आणि नीळ। गवाक्ष गवय अतिप्रवळ। वीरशार्दूल संग्रामीं ॥ ([भा. रा. युद्ध २६-३१]) पंचवायु १ श्वासवायु, २ गुल्फवायु, ३ स्थिरवायु, ४ चिन्मयवायु व ५ निवांतवायु. (तत्त्व - निज - विवेक) पंचविनायक १ मोद, २ प्रमोद, ३ दुर्मुख, ४ सुमुख आणि ५ गणनायक. पूजा करा भावेंसी। मोदारि पंचविनायका ॥ ([गुरु. च. ४१-१८४]) पंचविषय १ रूप, २ रस, ३ गंध, ४ स्पर्श आणि ५ शब्द. हे पंच ज्ञानेंद्रियानें जाणले जणारे पांच विषय होत. पंच विषय गीताशास्त्राचे (अ) १ ज्ञान, २ कर्म, ३ भक्ति, ४ योग आणि ५ संन्यास. (आ) १ ईश्वर, २ जीव, ३ जगत्, ४ धर्म आणि ५ तत्त्व. "ईशो जीवो अगत् धर्मस्तत्त्वमिति पंचविषया यत्र निर्णीयते तच्छास्त्रम् " पंचविनय १ दर्शनविनय, २ ज्ञानविनय, ३ चारित्रविनय, ४ तपोविनय व ५ उपचारविनय ([रत्नकरंडक श्रावकाचार]) पंचवीर १ त्यागवीर, २ दयावीर, ३ विद्यावीर, ४ पराक्रमवीर व ५ धर्मवीर अशी पांचहि प्रकारची वीरतासंपन्न, वेदमर्यादापालन संरक्षण करणारे म्हणून मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामचंद्र होते. संत तुळसीदासांनी"रामचरित मानसांत"आणखी एक सहावा प्रकार 'ऋजुतावीर' म्हणून वर्णिला आहे. पञ्चवीराः समाख्याता राम एव तु पञ्चधा। रघुवीर इति ख्यातः सर्ववीरोपलक्षणः ॥ ([सु,]) पंच वीरांगना १ कैकेयी, २ संयोगिता. ३ दुर्गावती, ४ कर्मदेवी आणि ५ झांशीची राणी लक्ष्मीबाई. ([कल्याण नारी अंक]) पंचवृत्ति (भूमिका) १ क्षिप्त, २ मूढ, ३ विक्षिप्त, ४ एकाग्र आणि ५ निरुद्ध. (मानसशास्त्र) पंच वृष्णीवीर १ श्रीकृष्ण, २ संकर्षण, ३ प्रद्युम्न, ४ अनिरुद्ध आणि ५ सांब (अशोक ते कालिदास) पंचव्रीहि १ तीळ, २ उडीद, ३ मूग, ४ सांवे व ५ साळी. हीं पांच व्रीहि (धान्यें) होत. हा सर्व अरिष्टांचा नाश करणारा धान्यगण म्हणून सांगितला आहे. तिलाश्च माषामुद्नाश्च श्यामकः शालयः स्मृताः। पञ्च धान्यगणः प्रोक्तः सर्वारिष्टनिषूदनः ॥ (भ. म. ६-२८) पंच व्यास १ बृहद्वयास, २ देवव्यास, ३ मानवव्यास ४ द्वैपायनव्यास आणि ५ वेदव्यास. पंचविध चित्तवृत्ति १ प्रमाण, २ विकल्प, ३ विपर्यय, ४ निद्रा व ५ स्मृति ([योगशास्त्र]) पंचविध दानें १ धर्ममूलक - निर्मत्सर बुद्धीनें देणें, २ अर्थमूलक - याचकाच्या तोंडूउन धन्योद्नार, ३ भयमूलक - पीडा देईल म्हणून, ४ काममूलक - परस्पर प्रेम जाणून, ५ करुणामूलक - दया म्हणून. पंचविध द्दष्टान्त १ शुक्तिरजत न्याय - शिंपीच्या ठिकाणीं रुप्याचा आभास, २ रज्जुसर्प न्याय - रज्जूवर सर्पाचा आभास, ३ स्थाणुचोर न्यायस्थाणु (खोड) त्याचे ठिकाणीं चोराचा भास, ४ ख - पुष्प न्याय - आकाशामध्यें पुष्पाचा किंवा नीलतेचा भास आणि ५ मृगजल न्याय - मध्याह्ल समयीं मरुभूमीवर प्रतिबिंबित होणारा पाण्याचा आमास. असे जगन्मिथ्यात्वाविषयीं पंचविध द्दष्टान्त आहेत. पंचविध प्रकार पारमार्थिक अनुभूतीचे १ श्रवण, २ स्पर्श, ३ दर्शन, ४ आस्वाद आणि ५ गंध (रानडे चरित्र व तत्त्वज्ञान) पंचविध पांडित्य १ वक्तृत्व, २ कवित्व, ३ वादित्व, ४ आगभिकत्व व ५ सारस्वतप्रमाण ([वस्तुरत्नकोश]) पंचविध (प्रभुत्व) १ कुलप्रभुत्व, २ ज्ञानप्रभुत्व, ३ दानप्रभुत्व, ४ स्थानप्रभुत्व आणि ५ अभयप्रभुत्व असे मोठेपणाचे पांच प्रकार. ([वस्तुरत्नकोश]) पंचविध लक्षणें (समर्थ सांप्रदायाचीं) १ शुद्ध उपासना, २ विमलज्ञान, ३ बीतराग, ४ ब्राह्मण्यरक्षण व ५ गुरुपरंपरा (समर्थबाङ्मय) पंचविधलक्षणें साक्षात्कारी पुरुषांचीं १ मौन, २ नम्रता, ३ समता, ४ प्रपत्ति (पूर्ण शरणागति) व ५ परोपकार (हिंदी संत परमार्थमार्ग) पंचविध सृष्टिविकास १ जडजीवन, २ वनस्पतिजीवन ३ प्राणिजीवन ४ मानवजीवन आणि ५ परमात्मजीवन (अरविंददोहन धार २ री) पंचशिला १ नारद शिला, २ नृसिंह शिला, ३ वराह शिला, गरुड शिला आणि ५ मार्केडेय शिला. हीं पांच तीर्थें. त्या तीर्थांच्या ठिकाणीं अति अजस्त्र शिला बद्रीनाथास अलकनंदेच्या प्रवाहांत आहेत. त्या ठिकाणीं ज्यांनीं तपश्चर्या केली त्यांचीं नांवें दिलीं आहेत. पंच शिल्पकार १ सुतार, २ कोष्टी, ३ न्हावी, ४ धीबी व ५ चांभार. तक्षश्च तंत्रवायश्च नापितो रजकस्तथा। पंचमश्चर्मकारश्च कारवः शिल्पिनो मताःअ ॥ ([सु]) पंचशील (भगवन बुद्धाचे) १ स्वतः हिंस करूं नये व दुसर्याला अनुमति देऊं नये, २ स्वतः चोरी करूं नये व दुसर्याकडून तो घडूं देऊं नये, ३ ?? ४ खोटें कधीं बोलूं नये व खोटयाला संमति देऊं नये व ५ स्वतः मद्यपान करूं नये व दुसर्याकडून घंडू देऊं नये. पंचशील (आंतरधार्मिक) १ सर्व धर्मासंबंधीं समान आदर, २ ज्ञानानें धर्मपरिवर्तन मान्य, पण छलबलानें निषिद्ध, ३ पूजास्थानाविषयीं समान आदर, ४ गतकालीन समाजानें केलेल्या पूजास्थानाच्या विध्वंसनासंबंधीं आजच्या समाजाला उत्तरदायी धरूं नये. तसेंच तशा विध्वंसनाचें समर्थनहि करूं नये आणि ५ धार्मिक संघर्षप्रसंगीं परस्पर सहिष्णुतेच्या तत्वावर एकत्र विचारानें मार्ग काढणें. (केसरी १२।१०।१९५४) पंचशील (आंतरराष्ट्रीय) १ परस्परांच्या प्रादेशिक अभंगत्वाबद्दल व सार्वमौत्वाबद्दल आदर, २ अनाक्रमण, ३ एकमेकांच्या अंतर्गत कारभारांत हस्तक्षेप न करणें, ४ परस्पर समानता व ५ शांततापूर्ण सहजीवन, हे आतरराष्ट्रीय पंचशील होत. (केसरी जून १९५५) पंच शुन्यें (शून्य प्रकार) अधःशून्य - अकार, २ मध्यशुन्युउकार, ३ ऊर्ध्वशून्य - मकार, ४ चतुर्थशून्य - ॐ व ५ शुद्धचैतन्य - निःशुन्य. "शुद्ध तें पांचवें शून्य। तें निःशून्य बोलिजे"([दर्शनप्रकाश]) पंचशौच १ मनःशौच. ([वृद्ध गौतमस्मृति]) पंच 'स' कार (अ) १ सहिष्णुता, २ सेवा, ३ सन्मानदान, ४ स्वार्थत्याग व ५ समता ; (आ) १ सत्संग, २ सदाचार, ३ संतोष, ४ सरलता व ५ सत्य. पंच सरस्वती सरस्वती नदी पांच ठिकाणीं असून प्रवाह गुप्त आहे असें म्हणतात - १ रुद्रावर्त - हिमालयांत, २ कुरुक्षेत्र, ३ श्रीस्थल - सिद्धपूर, ४ पुष्कर व ५ प्रयाग. रुद्रावर्ते कुरुक्षेत्रे श्रीस्थले पुष्करेऽपि वा। प्रभासे पंचमे तीर्थे पंच प्राची सरस्वती ॥ प्रभासाजवळ प्राचीन सरस्वती आहे. ([ऐति. गोष्टी भाग ३ रा.]) पंच सरोवरें (पवित्र तीर्थें) १ नारायण सरोवर - कच्छ प्रांतीं, २ पुष्कर - अजमीर जवळ, ३ बिंदु सरोवर - सिद्धपूर, ४ पंपा सरोवर - किष्किंधे जवळ आणि ५ मानस सरोवर - हिमालयांत. ([ऐति. गोष्टी भाग ३ रा]) पंचसार १ तूप, २ मध, ३ तापविलेलें दूध, ४ पिंपळी व ५ खडीसाखर. हे पांच पदार्थ एकत्र घुसळून तयार केलेलें सार. हें ह्रद्रोग. श्वास व कास यांचा नाश करितें. पंचसम्राट् १ यौवनाश्व (मांधाता) अजिंक्य - लोकांना जिंकल्यामुळें, २ भगीरथ - प्रजापालनामुळें, ३ कार्तवीर्य - तपःप्रभावानें, ४ भरत - सामर्थ्यसंपन्न्तेमुळें आणि ५ मरुत् - प्रजेची भरभराट करून, या पांचांनीं सम्राट् ही पदवी मिळविली. ([म. भा. अ सभा. १५-१६]) पंच सिद्धऔषधी १ बचनाग, २ पांढरा भुइकोहळा, ३ क्रोडकन्द, ४ रुद्रवंती (रानहरभ्रे) आणि ५ सर्पाक्षी (थोर मुंगुसवेल). तैलकन्दः सुधाकन्दः क्रोडकन्दोरुदंतिका। सर्पनेत्रयुताः पञ्च सिद्धौषधिकसंज्ञकाः ॥ (रा. नि.) पंचसिद्धि १ जन्मसिद्धि, २ औषधिसिद्धि, ३ मंत्रसिद्धि, ४ तपसिद्धि आणि ५ समाधिसिद्धि. ([पातंजल योगसूत्रें]) पंचसिद्धान्तिका वराहमिहिरकृत एक ज्योतिषग्रंथ. यांत १ रोमक सिद्धान्त, २ पैतामह, ३ वासिष्ठ, ४ पौलिश आणि ५ सौर सिद्धान्त, अशा ज्योतिषांतील पांच पुरातन ज्योतिष सिद्धान्तांचें विवरण असल्यामुळें त्यास पंचसिद्धान्तिका म्हणतात. पंच सुगंध १ कापूर, २ कंकोळ, ३ लवंग ४ सुपारी व ५ जायफळ. हे पांच पदार्थ समभाग विडयांत घातले असतां उत्तम सुगंध तयार होतो. त्यास पंच सुगंध म्हणतात. पंच सूक्तें १ पुरुषसूक्त, २ देवीसूक्त, ३ सूर्यसूक्त, ४ पर्जन्यसूक्त व ५ श्रीसूक्त, पंचसूत्री (संसारोपयोगी) १ विचार करून बाजारासाठी बाहेर पडा, २ भेटीस गेल्यावेळीं दोन शब्द कमी बोला, ३ सौंदर्य मावळत जातें पण गुणविकास होतो, ४ डोळे उघडे ठेवा, कानाचा नीट उपयोग करा, जीभ जपून वापरा व ५ आधीं गरजा व मग सोई आणि नंतर चैनी. (कण आणि क्षण) पंचसूत्री (स्वास्थ्यसंरक्षणाची) १ आहार, व्यायाम व मैथुन नियमित, २ निर्व्यसनता, ३ नित्य सुखानें ७-८ तास झोंप, ४ मच्छरदाणी वापरणें व ५ सुशील सुग्रण व हंसतमुख पत्नी असणें, (ज. नानासाहेब शिंदे) पंच सूत्रें (ग्रंथालय शास्त्र) १ ग्रंथ अध्ययनाकरितां आहेत. २ ते सर्वांकरितां आहेत, ३ प्रत्येक ग्रंथाला वाचका असतोच, ४ अभ्यासकांचा वेळ वांचवा आणि ५ ग्रंथालय सारखें वाढतें असावें. (ग्रंथालय शास्त्राचीं पंचसूत्रें) पंच सूत्रें (वेदविहित) शाश्वत सुख प्राप्त करून देणारीं १ यज्ञ, २ दान, ३ तप, ४ कर्म आणि ५ स्वाध्याय. (In Search of Happiness) पंच सूत्रें व त्यांचे कर्ते १ ब्रह्मसूत्रें - वेदव्यास, २ कर्मसूत्रें - जैमिनि, ३ भक्तिसूत्रें - नारद, ४ योगसूत्रें - पतंजलि व ५ तंत्रसूत्रें - परशुराम. (नाम चिंतामणि) पंचसूना दोष १ झाडसारवण, २ कांडणें, ३ चूल पेटविणें, ४ दळणें, वाटणें व ५ पाणी भरणें, एतन्मूलक ह्त्त्या - सूक्ष्म जीवांची हिंसा मनुष्याच्या हातून नकळत नित्य घडत असते. ([मनु ३-६८]) पंच संस्कार (मुस्लिमांचे) १ जातकर्म, २ सुंता, ३ बिस्मिल्ला (श्रीगणेशा), ४ विवाह आणि ५ अंत्यसंस्कार (मु. सण आणि संस्कार) पंच संस्कार (वैष्णवांचे) १ तप्तमुद्रा, २ ऊर्ध्वपुंड्र, ३ नाम, ४ मंत्र व ५ याग. तापः पुण्ड्रं तथा नाम मन्त्रो यागश्व पञ्चमः। अमीःपंच च संस्काराः पारमैकान्तहेतवः ॥ ([भारद्वाज संहिता]) पंच स्नान १ पाण्यांत दोन बोटें भिजवून मस्तकावर शिंपडणें, २-३ दोन्ही डोळ्यांना स्पर्श, ४-५ त्याच थेंबांचा दोन्ही कर्णमूळांना स्पर्श. हें पंचस्नान. (हिमप्रदेशांतील एकस्त्रान प्रकार - जीवनलीला) पंच स्नानें १ आग्नेय, २ वारुण, ३ ब्राह्म, ४ वायव्य आणि ५ दिव्य - (पराशर स्मृति १२-९) पंच स्कंध (भाग) मनुष्य शरीराचे १ जडत्व, २ संज्ञा, ३ वेदना, ४ संस्कार व ५ विज्ञान. मनुष्य प्राण्याचे ठायीं। पंच स्कंद असती पाही। ज्यावांचून अस्तित्व नाहीं। मनुष्य देहाकारणें ॥ शंकराचार्य चरितामृत २-१२६ पंच हत्त्या १ भरूणहत्त्या, २ वीरहत्त्या, ३ स्त्रीहत्त्या, ४ बालहत्त्या व ५ आत्महत्त्या - या पांचहि हत्त्या म्हणजे महान् पापें होत. पंच क्षीरवत १ वड (न्यग्रोध), २ औदुंबर, ३ अश्वत्थ, ४ पारस - पिंपळ व ५ पिंपरी (प्लक्ष). हे पांच चीक असलेले वृक्ष होत. ([नूतनामृत सागर]) पंच क्षुद्रसिद्धि १ त्रिकांड ज्ञान, २ शीतोष्णादि द्वंद्वावर सत्ता, ३ दुसर्याचें मन जाणणें, ४ अग्नि - सूर्य - उष्ण - जल - विष इत्यादींचे स्तंभन (परिणाम थांबविणें) आणि ५ अजिंक्यता. ([भाग. स्कंध ११ अ १५]) पंचज्ञानी १ श्रीकृष्ण, २ शुकाचार्य, ३ जनक, ४ श्रीरामचंद्र आणि ५ वसिष्ठ. कृष्णो योगी शुकस्त्यागी राजानौ जनकराघवौ। वसिष्ठः कर्मकर्ता च पञ्चैते ज्ञानिनः स्मृताः ॥ (जीवनन्मुक्तिविवेक) पंच ज्ञानें (जैनधर्म) १ मतिज्ञान, २ श्रुतिज्ञान, ३ अबाधिज्ञान, ४ मनःपर्यय ज्ञान, व ५ केवळज्ञान. पंचज्ञानेंद्रियें व त्यांच्या अधिष्टात्री देवता १ श्रोत्र (कान)- दिशा, २ त्वचा (कातडी)- वायु, ३ डोळे - सूर्य, ४ जिव्हा - वरुन आणि ५ नासिक (नाक)- अश्चिनीदेव (भास्कराचार्य) "श्रोत्रं चक्षुःस्पर्शनं च रसनं घ्राणमेवच"([भ. गी. १५-९]) पंचम स्वर १ नाभि, २ छाती, ३ ह्रदय, ४ कंठ व ५ मूर्धा. या शरिराच्या पांच स्थानांच्या वायूपासून निघालेला स्वर पंचामरा १ दूर्वा, २ भांग, ३ वेल, ४ निर्गुडी व ५ तुळस. ह्या पांच पवित्र वनस्पति. (वज्रकोश) पंचामृत (अ) १ गाईचें दूध, २ दहीं, ३ तूप, ४ मध व ५ साखर. या पांच अमृततुल्य पदार्थांना पंचामृत म्हणतात, यानें देवमूर्तीला अभिषेक करतात ; (आ) १ सुंठ, २ मुसळी, ३ गुळवेल, ४ शतावरी आणि ५ गोंखरू, हें औषधी पंचामृत अथवा वनस्पति पंचामृत (शा. नि); (इ) १ चिंच, २ गूळ, ३ मीठ, ४ मिरची व ५ तीळ. या पांच पदार्थांच्या भिश्रणानें केलेला पदार्थ (भोजनांतील); (ई) १ नारळ, २ आंबा, ३ फणस व ४ केळीं या चारीपैकीं कोणतींहि तीन व ४ साखर व ५ मध. या पांचांचें एक पंचामृत प्राचीनकालीं करीत असत. नालिकेराप्रपनसकदालीनां फलत्रयम् । शर्करा मधुसंयुक्तं पञ्चामृतमितीरितम् ॥ ([बौ. गृह्मसूत्र]) पंचामृतयूष १ कुळीथ, २ मूग, ३ तूर, ४ उडीद आणि ५ राजशिंबी या पांच धान्यांचें कढण. पंचायतीचे पांच गुण पांच सदस्य असलेल्या समितीस पंचायत म्हणतात. या सदस्यांचे अंगीं १ प्रेम, २ निर्मयता. ३ ज्ञान, ४ उद्योग व ५ स्वच्छता. हे पांचगुण अभिप्रेत आहेत किंवा असावेत असें मानलें आहे. (आ. मंदिर ऑगस्ट १९६२) पंचायतन १ शिव, २ विष्णु, ३ सूर्य, ४ गणपति व ५ देवी. या पांच देवतांचा समुदाय. या पांचांपैकीं प्रत्येक देवतेस प्राधान्य देऊन शिव, विष्णु इ. चीं पांच पंचायतनें मानण्याची प्रथा आहे. आदित्यं गणनाथं च देवीं रुद्रं च केशवम् । पंचदैवतमित्युक्तं सर्वकार्येषु पूजयेत् ॥ ([सु.]) या पंचायतनकल्पनेचा उगम श्रीशंकराचार्यांच्या कालापासून झाला व ती त्यांस पृथ्वी, आप, तेज, वायु व आकाश या सृष्टींतल्या पंचतत्त्वांवरून सुचली म्हणतात. पंचारति १ दीप. २ कमल. ३ वस्त्र, ४ आम्रफल व ५ सुपारी. हीं एकत्रपणें ओवाळणें. पंचावयव १ प्रतिज्ञार्या पर्वतावर अग्नि आहे, २ हेतु - कारण तेथें धूर आहे, ३ उदाहरण - धॄर असतो तेथें अग्नि असतो. जसें स्वयंपाक घर, ४ उपनयर्या पर्वतावर अग्नीस कधींहि सोडून न राहणारा धूरा आहे आणि ५ निगमन - म्हणून या पर्वतावर अग्नि आहे. हे वाक्याचे पांच अवयव अथवा सिद्धान्ताचे भाग न्यायशास्त्रांत सांगितले आहेत. पंचाक्षरी मंत्र (अ) 'नमः शिवाय'. १ नकार - पृथ्वीतत्त्व, २ मकार - उदकतत्त्व, ३ शिकार - अग्नितत्त्व, ४ वकार - वायुतत्त्व आणि ५ यकार - आकाशतत्त्व, हीं पांच बीजाक्षरें पांच तत्त्वें आहेत. (वी. प्र. अ. ८); (आ) 'ॐ नमः सिद्धं' हा वावप्रचार जैन मताचा आहे, याचा अर्थ सिद्धांस नमस्कार. याचेंच मराठी अपभ्रष्ट रूप म्हणजे ओ - ना - मा - सी - धं असें आहे. पंचाक्षरी यमक आर्येच्या प्रत्येक चरणांत पांच अक्षरांचे यमक (समान अक्षरांची पुनरावृत्ति) साधलें आहे. असें. उदा० - गांधारि म्हणे तज्जय कां ? त्या आहेत काय बा ? सिंगें ? कीतिंवर म्हणुनि विधिनें बांधियली त्यांसि काय बासिंगें ? ॥ (मो. आ. उद्योग ५-५०) पंचोपचार (अ) १ गंध, २ पुष्प, ३ धूप ४ दीप, ४ नैवेद्य हे पंचोपचार होत. या पंचोपचारांनीं केलेल्या देवपूजेस पंचोपचार पूजा म्हणतात ; (आ) १ घ्यान, २ आवाहन, ४ नैवेद्य, ४ नीरांजन व ५ नमस्कार. ([जाबालि]) पांच अंगें (आन्तरपूजनाचीं) १ जप, २ होम, ३ तर्पण, ४ मार्जन आणि ६ अन्नसंतर्पण. पांच अंगें (बाह्य पूजनाचीं) १ पटल, २ पद्धति, ३ वर्म, ४ स्तोत्र आणि ५ नमस्कार. ([कल्याण शाक्ति अंक]) पांच अंगें (राजनीनीचीं) १ कार्यारंभ, २ माणसे आणि द्र्व्य यांचा पुरवठा, ३ देशकालाची अनुकूलता, ४ संकटांचा प्रतिकार व ५ कार्यसिद्धि. (स. को.) पांच अंगें (विवाहाचीं) १ वाग्दान, २ प्रदान - वधूला वस्त्रालंकार देणें, ३ वरण - लग्नास सर्वांनीं संमति देणें, ४ पाणिपीडन - वरानें बधूचें पाणिग्रहण करणें आणि ५ सप्तपदी. (जैनधर्म) पांच अंगें (वेदाचीं) १ विधि, २ अर्थवाद, ३ मंत्र, ४ स्मृति व ५ नामधेय. अशीं पांच अंगें. पांच अवयव (शास्त्राचे) १ विषय, २ संदेह, ३ संगति, ४ पूर्व पक्ष आणि ५ सिद्धांत. पांच अवस्था (चित्ताच्या) १ क्षिप्त, २ मूढ, ३ विक्षिप्त, ४ एकाग्र व ५ निरुद्ध. ([योगशास्त्र]) पांच अवस्था (जीवाच्या) १ जाग्रत, २ स्वप्र, ३ सुषुप्ति ४ मूर्च्छा व ५ मरण ([भारतीय दर्शन संग्रह]) पांच अवस्था परमात्म्याचा साक्षात्कार होण्याच्या १ अज्ञानावस्था, २ भोगावस्था, ३ त्यागावस्था, ४ भक्तावस्था व ५ स्वरूपावस्था. ([अथर्व - अनु. मराठी]) पंच अवस्था (मनुष्यजीवनाच्या) (अ) १ कौमार, २ पौगंड, ३ कैशोर, ४ यौवन आणि ५ वार्धक्य. (आ) १ पुत्र, २ बंधु. ३ पति, ४ पिता आणि ५ पितामह. पांच अवस्था (स्त्रीजीवनाच्या) १ कन्या, २ भगिनी, ३ पत्नी, ४ माता आणि ५ ५ पितामही. पांच आचार्य (वैदिक धर्माचे) १ श्रीशंकराचार्य, २ श्रीरामानुजाचार्य, ३ श्रीनिंबार्क, ४ श्रीमध्वाचार्य व ५ श्रीवव्ल्लभाचार्य. जगद्गुरुनीं अध्यात्म कथिलें। यांनी उपासनेला जीवविलें। एवंच पांचानींही केलें। वैदिक धर्माचें संरक्षण ॥ (शंकराचार्य च. ३७-२०००) पांच आशास्थानें मानवाचीं १ जीवित, २ कांता, ३ अपल्य, ४ मानसन्मान आणि ५ संपत्ति. पांच आध्यात्मिक भावना १ आश्चर्य, २ ओजस्, ३ आनंद, ४ भीति आणि ५ आदर. ([भ. गी. सा. दर्शन]) पांच आयुष्यवर्धनास उपाय १ भूमीवर शय्या, २ दोन वेळां जेवण, ३ सहा वेळां लघुशंका, ४ तीन वेळां शौचास जाणें आणि ५ स्त्रीसंग अल्प प्रमाणांत. पांच आज्ञा (श्रीकृष्णाच्या) १ उद्धरेदात्मनात्मानम् - आपण होऊन आपला उद्धार करावा. २. आत्मैव ह्यात्मनो बंधुः - आपणच आपला बंहु किंवा आपणच आपला शुत्र ; ३. कर्मण्येवाधिकारस्ते - कर्म करण्य़ापुरताच तुझा अधिकार आहे ; ४. स्वधर्मे निधनं श्रेयः स्वधर्माप्रमाणें मरण आलें तरी त्यांत कल्यान आहे ; ५. श्रद्धामयोऽयं पुरुषः - मनुष्य हा श्रद्धामय आहे. ([भ. गी.]) पांच आज्ञा (बुद्धाच्या) १ अहिंसा, २ सत्य, ३ अस्तेय, ४ अव्यभिचार आणि ५ अपेयपान न करणें. पांच आज्ञा (वैदिक धर्माच्या) १ यज्ञ, २ दान, ३ तप, ४ कर्म आणि ५ स्वाध्याय. पांच आज्ञा (महंमदाच्या) १ शुचित्व, २ निराहार, ३ दान, ४ उपासना व ५ तीर्थयात्रा. पांच कन्नड महाकवि १ पंपा, २ रन्न, ३ पोन्न, ४ नागवर्म आणि ५ चामुंडराय, पांच कन्नड महाकाव्यें १ पंपभारत, २ आदि पुराण, ३ शांति पुराण, ४ गदायुद्ध आणि ५ कर्नाटक कादंबरी. पांच कर्तव्यें राजांची (राजशासकांचीं) १ दुष्टांना दंड, २ सज्जनांचा परामर्श, ३ न्यायानें कोश समृद्धि, ४ धनिकांविषयीं निःपक्षपात आणि ५ राष्ट्राचें संरक्षण, दुष्टस्य दंडः सुजनस्य पूजा। न्यायेन कोशस्य च संप्रवृद्धिः। अपक्षपातोऽर्थिषु राष्ट्र्रक्षा। पञ्चैव यज्ञाः कथिता नृपाणाम् ॥ ([अत्रिसंहिता]) पांच कल्प (भाग) अथर्ववेदाचे १ नक्षत्र कल्य, २ वेदकल्प, ३ संहिता कल्प, ४ आंगिरस कल्प व ५ शांति कल्प. ([विष्णु - अंशा ३-१४]) पांच कार्यें ईशसत्तेचीं (जगतूसंबंधीं) १ सृष्टि - पृथ्वीतत्त्व, २ स्थिति अथवा पालन - जलतत्त्व, ३ संहार - अग्नितत्त्व, ४ तिरोभाव - वायुतत्त्व आणि ५ अनुग्रह - आकाशतत्त्व. ([शिव. पु. विद्येश्वर सं. अ. १०]) पांच कार्यक्षेत्रें (जीवात्म्याचीं) १ कर्मेंद्रियें, २ ज्ञानेंद्रियें, ३ मन, ४ चित्त आणि ५ बुद्धि ([अथर्व - अनु मराठी]) पांच कारणें (स्वकर्मांच्या सिद्धिस आवश्यक) १ अधिष्ठान (क्षेत्र), २ कर्ता, ३ साधन, ४ प्रयत्न आणि ५ दैव. ([भ. गी. १८. १४]) पांच कायिक दोषा १ एखाद्याला पीडा - मारपीट करणें, २ व्यभिचार, ३ एखाद्याची वस्तु चोरून घेणें, ४ उगीच ताठयानें चालणें आणि अपवित्र राहणें, व ५ व्यर्थ कुचेष्टा करणें. पांच कृत्यें परमेश्वरी सत्तेचीं १ सृष्टि, २ स्थिति, ३ संहार, ४ अनुग्रह आणि ५ विलय. (श्रीशैवागम आणि ज्ञानेश्वर) पांच गीतेचे प्रधान भाष्यकार १ श्रीशंकराचार्य, २ श्रीरामा - नुजाचार्य, ३ श्रीमध्वाचार्य, ४ श्रीवल्लभाचार्य आणि ५ श्रीज्ञानेश्वरमहाराज. सहावे लो. टिळक होत. पांच गुजराती संत कवि (अ) १ नरसीमेहता, २ मीराबाई, ३ प्रेमानंद, ४ अखोमगत व ५ दयाराम. (गुजरात) (आ) १ मीराबाई, २ नरसी मेहता, ३ भालन, ४ भीम व ५ पद्मनाभ. ([म. ज्ञा. को. वि. १२]) पांच गुण कवीच्या अंगीं असावेत १ क्रांतदशीं, २ मनीषी - मन आधीन अललेला, ३ परिभूःसर्वांना व्यापून असणारा, ४ स्वयंभूःस्वतंत्रवृत्ति व ५ शाश्वतकाल पुरेल इतकी सामग्री यथायोग्यपणें मिळविलेला असा. कविर्मनीषी परिभूः स्वयम्भूर्याथातथ्यतः। अर्थान् व्यदधाच्छाश्वतीभ्यः समाभ्यः ॥ ([ईशावास्योपनिषद्]) पांच गुण चित्राचे १ रेखामाधुर्य, २ प्रमाण, ३ साद्दश्य, ४ पार्श्चभूमीची सजावट व ५ सजीवपणा. (कला - कलातंत्र आस्वाद.) पांच गुण दानासंबंधीं १ सहानुभूति उत्पन्न होणें, २ सद्नदित होणें ३ आदर, ४ प्रिय भाषण व ५ दिल्यानंतर समाधान वाटणें. आनंदाश्रूणि रोमाणि बहुमानं प्रियं वचः। किञ्चानुमोदनं दानं दानभूषणपंचकम् ॥ (दानशासनम्) पांच गुण नाटकाचे १ कथानक - देशकालानुरूप, २ संबिधानक - मजेदार, ३ पात्रानुरूप भाषा, ४ अतिर्हस्व वा अतिदीर्घ असूं नये आणि ५ नानारसात्मक असून बोधप्रद. (रंगभूमि) पांच गुण बुद्धीचे १ निद्रावृत्ति, २ सुनिश्चितता, ३ चित्तनिरोधाचे सामर्थ्य, ४ संशय़ आणि ५ निश्चित स्वरूपाचें ज्ञान. ([म. भा. शांति अ २५५]) पांच गुण कावळ्य़ापासून शिकावेत १ गुप्त रीतीनें संभोग, २ धैर्य, ३ समयाच्या ठायीं संग्रह करणें, ४ साबधानपणा व ५ कोणाचाहि विश्वास न धरणें, ([वृ. चा. ६-१९]) पांच गुण (ब्राह्मण्याचे) १ सत्य, २ दया, ३ इंद्रियदमन, ४ परोपकार व ५ तपाचरण. पांच गुण लिपीस आवश्यक १ निश्चिति (उच्चारासंबंधीं), २ उपयोगिता, ३ सरलता, ४ सौंदर्य व ५ लेखनसुलभता. पांच गुरु (अभ्युदयेच्छू पुरुषाचे १ पिता, २ माता, ३ अग्नि ४ आत्मा आणि ५ गुरु. ([म. भा. वन. २१४. २८]) पांच गुरु (स्त्रियांचे) १ माता, २ पिता, ३ सासू, ४ सासरा व ५ पति. पांच गोष्टी अकीर्तिकर १ परान्न, २ दुसर्याचें वस्त्र, ३ परशय्या, परस्त्री आणि ५ परगृहवास. परान्नं परवस्त्रं च परशय्या परस्त्रियः। परवेश्मनि वासश्च शक्रस्यापि श्रियं हरेत् ॥ ([सु.]) पांच गोष्टी अग्निविना जाळणार्या १ भार्यावियोग, २ स्वजनापवाद, ३ ऋणशेष, ४ कृपणाची सेवा व ५ दारिद्य आल्यावेळीं स्वकीयांचें दर्शन. पांच गोष्टी अक्षय्यनिधीच होत १ शील, २ शौर्य, ३ आळसराहित्य, ४ विद्धत्ता व ५ मित्रसंग्रह. यांना चोरीचें भय नाहीं. शीलं शौर्यमनालस्यं पांडित्यं मित्रसंग्रहम् । अचोरहरणीयानि पञ्चैतान्यक्षयो निधिः ॥ ([सु.]) पांच गोष्टी आयुष्यनाशक १ सायंकाळचें उन्ह, २ प्रेताचा धूर, ३ वृद्धा स्त्रीसंग, ४ सांचलेलें पाणी व ५ नित्य रात्रीं दहीं खाणें. वृद्धार्कः प्रेतधूमश्च वृद्धा स्त्री थिल्लरोदकम् । आयुष्यनाशकं नित्यं रात्रौ दध्यन्नभोजनम् ॥ ([सु.]) पांच गोष्टी आयुष्यवर्धक १ प्रातःकालचें उन्ह, २ यज्ञधूम, ३ तरूण स्त्री, ४ झर्याचें पाणी व ५ रात्रौ दूध पिणें. बालार्को यज्ञधूमश्च बाला स्त्री निर्झरोदकम् । आयुष्यवर्धकं नित्यं रात्रौ क्षीरान्नभोजनम् ॥ ([सु.]) पांच गोष्टी आदर्श समाजास आवश्यक १ स्वच्छता, २ टाप - टीप, ३ व्यवस्था, ४ दक्षता आणि ५ सौंदर्यद्दष्टि. पांच गोष्टी कर्मानें घडतात १ उत्पत्ति, २ नाश, ३ प्राप्ति, ४ विकार आणि ५ संस्कार, पांच गोष्टी ग्रंथनिर्मितीस आवश्यक १ अवकोकन, २ मनन, ३ अभ्यास, ४ ऊर्मि, आणि ५ अलिप्तता (संयम). पांच गोष्टी चतुरस्त्रतेस आवश्यक १ देशाटन, २ गुणीविद्व - त्यमागम, ३ वारांग्ना - कलावंताचा सहवास, ४ समेंत मान मिळवणें व तो टिकविणें आणि ५ शास्त्ररहस्य जाणणें. "अनेकशास्त्रार्थविलोकनं च चातुर्यमूलानि पंच"([सु]) पांच गोष्टी जाणल्याविना मंत्राची सफलता नाहीं १ ब्राह्मण, २ विनियोग, ३ छंद, ४ ऋषि व ५ देवता. ब्राह्मणं विनियोगं च छंदं आर्षं च दैवतम् । अज्ञात्वा पंच योग मन्त्रे न स तत्फलमश्रुते ॥ (व्यास) पांच जीवनमूल्यें १ युक्ति, २ बुद्धि, ३ भावना, ४ शांति व ५ आत्मसुख. व्यक्तीच्या वा समाजाच्या जीवनांतील पांच सर्वोत्तम मृल्यें. (गीताई चिंतनिका) पांच गोष्टी नसतील तेथें वसति करूं नये (अ) उपजीविकेचें साधन २ अभय, ३ लजा, ४ दाक्षिण्य आणि ५ दानशीलता. लोकयात्रा भयं लजा दाक्षिण्यं दानशीलता। पञ्च यत्र न विद्यन्ते न तत्र दिवसं वसेत् ॥ गरुड ११०-२७) (आ) १ धनिक, २ श्रोत्रिय ब्राह्मण, ३ शासनाधिकारी, ४ नदी व ५ वैद्य. धनिकः श्रोत्रियो राजा नदी वैद्यस्तु पंचमः। पंच यत्र न विद्यन्ते न तत्र दिवसं वसेत् ॥ ([वृ. चा]) पांच गोष्टी न्यायाधीशास आवश्यक १ प्रामाणिकपणा २ उद्यम - प्रियता, ३ धैर्य, ४ सभ्यता व ५ कायद्याचें ज्ञान (न्यायाधीशाचें अंतरंग) पांच गोष्टी भाषणांत समाविष्ट असाव्यात १ सौक्ष्म्य - अनेकार्थ संभव, २ सांख्य - गुणदोषरिगणन, ३ क्रम - अनुक्रम, ४ निर्णय - सिद्धांताचा - पुनरुच्चार व ५ प्रयोजन. ([म. भा. शांति अ ३२०]) पांच गोष्टी शोभून दिसतात १ सशक्तांची क्रीडा, २ प्रियेचा रुसवा, ३ सम्रर्थांची क्षमा, ४ जाणत्याचें बोलणें व ५ अजाणत्याचें मौन. (सार्थ गाथासप्तशती) पांच गोष्टी श्रवणास आवश्यक १ आस्था, २ शरीरस्वास्थ्य, ३ प्रज्ञा, ४ गुरूपदिष्ट प्रकाश व ५ अंतर्निष्ठ धारणा. ([हरिवरदा १-७४.]) पांच गाष्टी परमेश्वरी सत्तेच्या १ (खियामत दिन) शेवटचा न्यायाचा दिवस, २ परमेश्वरच पाऊस पाडतो, ३ गर्भाशयांत काय असतें हें परमेश्वरालाच माहीत असतें, ४ उद्यांची प्राति किती हेम परमेश्वरालाच माहीत असतें आणि ५ कोणाचा अंत कोठें होणार हें त्यालाच माहीत असतें. ([कुराण २१-३२]) पांच गोष्टी पूर्वपुण्याईनें प्राप्त होणार्या १ यश, २ पुण्य, ३ कलत्र, ४ पुत्र आणि ५ धन. पांच गोष्टी प्रकट करूं नयेत १ संपत्तिनाश, २ मनस्ताप, ३ गृहछिद्रें, ४ स्वतःची फसगत आणि ५ अपमान. या पांच गोष्टींची वाच्यता करूं नये. अर्थनाशं मनस्तापं गृहे दुश्ररितानि च। वञ्चनं चापमानं च मतिमान् न प्रकाशयेत् ॥ ([कौटिल्य]) पांच गोष्टी प्राणी गर्भांत असतांनाच ठरलेल्या असतात १ आयुष्य, २ कर्म, ३ धन, ४ विद्या आणि ५ मरण. ([वृ. चा. १३-४]) पांच गोष्टीमुळें राष्ट्राची अभिवृद्धि होते १ न्यायालय, २ संग्राम, ३ धर्मसंरक्षण, ४ योग्य वेळीं योग्य़ विचार करणें आणि ५ सुखी जीवन. रक्षाधिकरणं युद्धं तथा धर्मानुशासनम् । मंत्रचिन्ता सुखं काले पंचभिर्वर्धते मही ॥ ([म. भा. शांति ९३-२६]) पांच गोष्टी विद्याप्राप्तीस बाधक १ अभिमान, २ क्रोध, ३ प्रमाद, ४ रोग आणि ५ आळस ([उत्तराध्ययन सूत्र अ. ११]) पांच गोष्टी संध्याकाळीं निषिद्ध १ भोजन, २ मैथुन, ३ निद्रा, ४ वेदपठण आणि ५ मार्गक्रमण (प्रवास). एतानि पञ्च कर्माणि सन्ध्यायां बर्जयेद्बुधः। आहारं मैथुनं निद्रा संपाठं गतिमध्वनि ॥ (नि. र.) पांच गोष्टी सार्वजनिक उययोगाच्या १ विहीर, २ तळें, ३ सरोवर, ४ देवालय आणि ५ झाड. वापीकूपतडागानां देवालयकुजन्मनाम् । उत्सर्गात्परतः स्वाम्य मपि कर्तुं न शक्यते ॥ (ग. प. १०९-४६) पांच घटक (राष्ट्राचे) १ देश, २ वेष, ३ धर्म, ४ संस्कृति आणि ५ भाषा. पांच तत्त्वें आयुर्वेद चिकित्त्सेचीं १ गुण, २ रस, ३ वीर्य, ४ विपाक व ५ प्रभाव. ही औषधामधलीं पांच तत्त्वें आयुर्वेद मानतो. पांच तत्त्वें (औषधींच्या परीक्षेचीं) १ गुण, २ रस, ३ वीर्य, ४ विपाक व ५ प्रभाव. पांच तत्त्वज्ञानें (भारतकालीन) १ सांख्य, २ योग, ३ पाशुपत, ४ वेदान्त आणि ५ पांचरात्र, हीं भिन्नभिन्न पांच तत्त्वज्ञानें भारतकालीं प्रचलित होतीं. ([म. भा. शान्ति, अ. ३८९]) पांच तामिळ महाकाव्यें १ जीवन चिंतामणि (तिरुतक्कदेवर), २ सिलप्पदिकारम्, ३ मणिमेखले, ४ बलयाएदि आणि ५ कुंडलकेसी. पांच तामिळ लघुकाव्यें १ यशोधरकाव्य - २ चूडामणि, ३ उदयनकथै, ४ नागकुमारकाव्य आणि ५ नीलकेशी. पांच देवतरु (वृक्ष) १ मंदार, २ पारिजातक, ३ संतान, ४ कल्पवृक्ष आणि ५ हरिचंदन, पंचतै देवतरवो मंदाराः पारिजातकः। संतानः कल्पवृक्षश्च पुंसि वा हरिचंदनम् ॥ ([अमर]) पांच देवलोकींच्या गायी १ नंदा, २ भद्रा, ३ सुरभि, ४ सुशीला आणि ५ सुमना. नन्दा भद्रा च सुरभिस्सुशीला सुमनस्तथा। पञ्चगावो विभोर्जाता सद्योजातादि वक्त्रतः ॥ (सि. शि.) पांच दोष चित्राचे १ बोजडरेखा, २ प्रमानमंग, ३ अयोग्य वर्ण - संस्कार, ४ भावनाशून्यत्व व ५ अवयबांचे चुकीचे आलेखन, (कला - कलातंत्र आस्वाद) पांच दांभिक लक्षणें १ लंगोटी घालणें, २ भस्मलेपन, ३ दर्भासन, ४ रुद्राक्षमाला धारण करणें आणि ५ मौन. हीं बाह्म चिन्हें (त्याप्रमाणें आचरण नसेल तर) म्हणजे दांभिक लक्षणें होत. पांच देहांतर्गत दोष १ काम, ५ क्रोध, ३ भय ४ निद्रा आणि ५ श्वास. हे पांच दोष शरिरांत स्वभावसिद्धि असतात. कामक्रोधौ भयं निद्रा पञ्चमः श्वास उच्यते। एते दोषाः शरीरेशु द्दश्यन्ते सर्वदेहिनाम् ॥ ([म. भा. शांति २९०-५४]) पांचदेव प्राणिमात्राला आरोग्य देणारे १ पर्जन्य २ (प्राण) वायु, ३ जलदेव - वरुण, ४ चंद्र व ५ सूर्य. ([अथर्ववेद]) पांच दैवी प्रकोप १ आग लागणें, २ अतिवृष्टि, ३ रोगराई, ४ दुष्काळ व ५ पटकीचा उपद्रव. पांच दोष घरा (निवासस्थान) बाबत वर्ज्य १ पदाघात - एका खोलींत चालणार्या माणसाचा आवाज दुसर्या खोलींत ऐकू येणें, २ पराघात - आपल्या घराच्या चांदईत दुसर्याचा संबंध ३ पथाघात - घरांतून दुसर्याचा वापर असणें, ४ जलदोष - आसपास पाणी सांचून होणारा त्रास. आणि ५ वृक्षदोष - जवळच्या झाडांपासून कृमी कीटकांचा वगैरे त्रास. असे पांच - दोष टाळावेत. पदाघातः पराधातः पथाघातस्तथैव च। जलदोषो वृक्षदोषो गृहदोषाः प्रकीर्तिताः ॥ (युक्तिकल्पतरु) पांच दोष दानासंबंधीं १ अनादर, २ विलंव, ३ तोंड चुकविणें, ४ अप्रिय भाषण व ५ दिल्यानंतर पश्चात्ताप होणें. अनादरो विलंबश्च वैमुख्यं चाप्रियं वचः। पश्चाद् भवति संतापो दानदूषणपंचकम् ॥ (दानशासनम्) पांच द्रविड देशीय पवित्र नद्या १ ताम्रपर्णी, २ कृतमाला, ३ पयस्विनी, ४ कावेरी व ५ प्रतीची. ताम्रपर्णी नदी यत्र कृतमाला पयस्विनी। कावेरी च महापुण्या प्रतीची च महानदी ॥ ([भाग, स्कंद ११]) पांच नरकाचीं द्वारें १ जीवहिंसा, २ सुरापान, ३ अगग्यागमन, ४ चोरी व ५ विश्वासघात. जीवहिंसा सुरापानमगम्यागमनं तथा। चौर्यं विश्वासघातं च पञ्चैतानि मुनीश्वराः ॥ (लक्ष्मीपूजनमंत्र) पांच नांवें (श्रीगीतेचीं) १ श्रीमद्भगवद्नीता, २ उपनिषद, ३ ब्रह्मविद्या, ४ योगशास्त्र आणि ५ श्रीकृष्णार्जुनसंवाद. पांच नियम (आत्मसंयमनासाठीं करावयाचीं कृत्यें १ शौच, २ संतोष, ३ तप, ४ स्वाध्याय आणि ५ ईश्वरप्रणिधान, ([योगसूत्रें २ ' ३२]) पांच नियम (भिक्षूचे) १ अक्रोध, २ गुरुशुश्रूषा, ३ शौच, ४ मिताहार आणि ५ नित्यस्वाध्याय. अक्रोधो गुरुशुश्रूषा शौचमाहारलाघवम् । नित्यस्वाध्याय इत्येते नियमाः पञ्च कीर्तिताः ॥ ([सु]) पांच परमेश्वरी कृत्यें १ सृष्टि, २ पालन, ३ संहार, ४ अनुग्रह आणि ५ निग्रह. पांच पवित्र नद्या १ किरणा, २ धूतपापा, ३ सरस्वती, ४ गंगा व ५ यमुना. किरणा धूतपापा च पुण्यतोया सरस्वती। गंगा च यमुना चैव पञ्च नद्यः प्रकीर्तिताः ॥ ([बृहन्नारदीय उत्तर खंड ५१. १५]) पांच पवित्र पर्वत जैन धर्मीयांचे १ शत्रुंजय, (सिद्धाचल), २ अर्बुदाचल (आबु), ३ गिरनार, ४ कैलास व ५ सम्मेतशिखर (पारसनाथ) पांच परिघ रावणाच्या होमस्थानाभोंवतीचे १ आनंदाचा, २ महामोहाचा, ३ संकल्पाचा, ४ वादळी वार्याचा आणि ५ क्षुधेचा, असे पांच परिघ रक्षनासाठीं होते अशी कथा आहे. सर्वांबाहेर राक्षसांचा (परिघी) घेरा होता. ([एकनाथ वाङ्मय आणि कार्य]) पांच पंचकें ज्योतिषांत १ राजपंचक, २ अग्निपंचक, ३ रोगपंचक, ४ चोरपंचक आणि ५ मृत्युपंचक. पांच पुराणकालीन मणि १ कौस्तुभ मणि, २ स्यमंतक मणि, ३ चिंतामणि मणि, ४ चूडा मणि ([वा. रा. सर्व. ६५-२३]) आणि ५ संजीवक मणि ([म. भा. आश्चमेधिक अ ८०]) खेरीज अभीवर्त नामक मणि असल्याचा उल्लेख अथर्ववेदांत आहे. ([अथर्व - अनु - मराठी भाग ३ रा]) पांच पुराण प्रसिद्ध स्वयंवरें १ सावित्री, २ दमयन्ती, ३ रुक्मिणि, ४ सीता व ५ द्रौपदी. पैकीं शेवटचीं दोन"स्वयंवरें"नसून समाह्लय होत. औपचारिकपणें स्वयंवर म्हटलें गेलें आहे. कारण या विवाहाचे बाबतींत त्या त्या कन्यांच्या वडिलांनीं पण लावले होते. स्वतः मुलींनीं नव्हे ([वा. रा. निरीक्षण.]) पांच पुरुषार्थ १ धर्म, २ अर्थ, ३ काम, ४ मोक्ष आणि ५ भक्ति. पांच पुरुषार्थांत भक्ति हा पांचवा श्रेष्ठ. "चहूं पुरुषार्थांशिरीं भक्ति ॥"([ज्ञा. १८. ८६७]) पांच पंचायतनें १ विष्णुपंचायतन, २ शिवपंचायतन, ३ सूर्य - पचायतन, ४ देवीपंचायतन आणि ५ गणेशपंचायतन. ज्या देवतेची उपासना करावयाची ती मध्यभागीं स्थापून इतर चार देवता चार बाजूंस स्थापावयाच्या. ([धर्मासिंधु]) पांच प्रकारचे अग्नि १ मंदाग्नि, २ तीक्षणाग्नि, ३ विषमाग्नि, ४ समाग्निव ५ मस्माग्नि. (वैद्यक) पांच प्रकारचे आनंद १ आत्मानंद, २ ब्रह्मानंद, ३ सुरतानंद, ४ विद्यानंद आणि ५ शौचानंद, पांच प्रकारच्या अभिज्ञा १ निरिंद्रय श्रवण, २ अलौकिक प्रत्यक्ष, ३ पूर्वजन्माचें ज्ञान, ४ दुसर्याच्या चित्ताचें ज्ञान आणि ५ जादूविद्येसारखे प्रयोग करण्याची शक्ति, अशा पांच प्रकारच्या अभिज्ञा बौद्धांनीं मानिल्या आहेत. (गुरुदत्त योग) पांच प्रकारचें कर्म १ कायिक, २ वाचिक, ३ मानसिक, ४ कृत व ५ अकृत. (वेदांत विचार दर्शन) पांच प्रकार (अनुभवांचे) १ पाहणें, २ वास घेणें, ३ रस चाखणें, ४ स्पर्शणें व ५ ऐकणें. ([अनुभवामृत - साररहस्य]) पांच प्रकारचीं कर्में १ नित्य, २ नैमित्तिक, ३ काम्य, ४ प्रायश्चित्त व ५ निषिद्ध. (विचारचंद्रोदय दर्शन) पांच प्रकार कल्पांचे (शास्त्रांचे) १ नक्षत्रकल्प, २ वितानकल्प, ३ संहिताकल्प, ४ अङ्रिगरसकल्प व ५ शांतिकल्प. नक्षत्रकल्पो वैतानस्तृतीयो संहिताविधिः। चतुर्थोऽङिगरसः कल्पः शान्तिकल्पश्च पञ्चमः ॥ History of Dharmashastra VOL V. Part. II पांच प्रकार गद्य काव्याचे १ आख्यायिका, २ कथा, ३ खण्डकथा, ४ परिकथा व ५ कथानिका. ([अग्निपुराण]) पांच प्रकारचे गुप्तहेर १ कापटिक - कपटी शिष्य अथवा विद्यार्थी, २ उदास्थित - भ्रष्ट संन्यासी, ३ गृहपतिक - कफल्लक शेतकरी, ४ वैदेहिक - व्यापारांत दिवाळें निघालेला आणि ५ तापस - व्यवसाय करूं इच्छिणारा जटाधारी. ([कौटिल्य १. १]) पांच प्रकार हेराचे १ स्थानिक, २ अंतर्गत, ३ परिवर्तित, ४ शासनक्षम व ५ उर्वरित. या पांचहि प्रकारच्या हेरांचा राष्ट्रबळकटीस उपयोग असतो. (युद्धकला) पांच प्रकारें द्रव्याचा विनियोग करावा १ धर्म, २ यश, ३ अर्थ, ४ काम आणि ५ स्वजन, या पांच गोष्टींप्रीत्यर्थ द्रव्याचा विनियोग करणार्या पुरुषास इहपर आनंद मिळतो. ([भागवत. ८-१९-३७]) पांच प्रकार धनुर्वेदाचे १ वसिष्ठ धनुर्वेद, २ भरद्वाज धनुर्वेद, ३ विश्वामित्र धनुर्वेद, ४ उशनस धनुर्वेद आणि ५ जमदग्नि धनुर्वेद. पांच धार्मिक कृत्यें इस्लामचीं १ कलमा -'ला इलाह मंत्राचे' पठण, २ नमाज - द्विवसांतून पांच वेळां प्रार्थना, ३ रोजा - रमजान महिन्यांत सूर्यास्तानंतर एकदा भोजन करणें, (या महिन्यांत कुराण पृथ्वीवर अवतीर्ण झालें.) ४ जकात - वार्षिक उत्पन्नाचा चाळीसावा हिस्सा दानधर्मांत व्यय आणि ५ हज अर्थात् मक्केची यात्र. ([संस्कृतिकोश]) पांच धर्माधिकारी मुसलमान समाजाचे व त्यांचीं कार्यें १ काझी - विवाह नोंदणी वगैरे, २ मुल्ला - मशीदीची व्यवस्था और्ध्वदेहिक वगैरे, ३ मौलवी - कायदा जाणणारा व उपदेशक, ४ खतीब - शुक्रवारीं व ईददिवशीं मशिदींत उपासना करणारा व ५ मुजावर - कनिष्ठ दर्जाचा अधिकारी मशिदीची व्यवस्था वगैरे ([म. ज्ञा. को. वि. १८]) पांच प्रकारचे पेशीजाल (Tissues) - १ उपलेपक, २ मज्जा, ३ स्नायु, ४ संयोगी व ५ अस्थि, अशा पांच प्रकारच्या पेशीजालांनीं मानवशरीर बनलेलें असतें. (शारीरिक शिक्षण) पंच प्रकार परमात्मशक्तीचे १ चित्, २ आनंद, ३ इच्छा, ४ ज्ञान आणि ५ क्रिया. (शैवागम) पांच प्रकार पूजेचे १ अभिगमन (सफाई निर्माल्यविसर्जन वगैरे) २ उपादान (पूजासामग्री - संग्रह), ३ योग (इष्ट देवतेचेंध्यान), ४ स्वाध्याय आणि ५ प्रत्यक्ष पूजा. ([कल्याण साधनांक]) पांच प्रकारचें भस्म १ विभूति, २ भसित, ३ भस्म, ४ क्षार व ५ रक्षा. पांच प्रकार भाजीपाल्याचे १ पालेभाजी - चुका, चाकवत इ., २ फळभाजी - भेंडी, गवार इ., ३ मूळभाजी - मुळा, गाजर इ., ४ खोड भाज्या - बटाटे, सुरण इ. आणि ५ फूल भाजी - केळफूल, कोबी ह्रदगा इत्यादि. पांच प्रकार मनाचे १ नास्तिक, २ रोगी - पापी, ३ अचेत - पोटभरू, ४ उलटें मन - व्याजावर निर्वाह करणारांचें आणि ५ शुद्ध मन - साधुसंतांचें. पांच प्रकारचीं माणस १ दगड - बेदर्दी, २ झाड - कुटुंबप्रिय, ३ पशुजतिप्रिय, ४ मनुष्य - देशप्रिय, व ५ संत - विश्वकल्याण. अशीं पांच प्रकारचीं माणसें जगांत असतात. (गुरुदेव मासिक) पांच प्रकारचीं मात्रा वृत्तें १ आर्या, २ गीति, ३ उपगीति, ४ उद्नीती आणि ५ आर्यागीती. (छंदःशास्त्र) पांच प्रकार मंत्रांचे १ त्वरित फलदायी, २ बीजमंत्र, ३ गुरूपदिष्ट मंत्र ४ सिद्धमंत्र व ५ आसूरीमंत्र (जारण मंत्र). ([याज्ञवल्क्य - मासिक]) पांच प्रकारचे यज्ञ (अ) १ द्रव्ययज्ञ, २ तपोयज्ञ, ३ योगयज्ञ, ४ वाग्यज्ञ आणि ५ ज्ञानयज्ञ. ([भ. गी. ४-२८]); (आ) १ अग्निहोत्र, ३ दर्शपूर्णमास. ३ चातुर्मास्य, ४ पशुयाग, व ५ सोमयाग. पांच प्रकारचीं युद्धें १ तंत्रयुद्ध, २ दंडयुद्ध, ३ पाषाणयुद्ध, ४ पाशयुद्ध आणि ५ क्षेपण युद्ध (फेकून मारण्याचें). (वसिष्ठ धनुर्वेद) पांच प्रकारचे योग (अ) १ मंत्रयोग, २ स्पर्शयोग, ३ भावयोग, ४ अभावयोग व ५ महायोग. ([लिंग. अ. ५५]); (आ) १ क्रियायोग, २ भक्तियोग, ३ हठयोग, ४ ज्ञानयोग व ५ राजयोग. पंच प्रकारचें रासनृत्य १ महारास, २ वसंतरास, ३ कुंजरास ४ उत्कलरास व ५ राखालरास. पंच प्रकारांनीं रोगनिदान होतें १ निदान, २ पूर्वरूप, ३ रूप, ४ उपशय आणि ५ संप्राप्ति. ([माधवनिदान १-४]) पंच प्रकार (ललित - लेखनाचे) १ काव्य, २ नाटय, ३ कांदवरी. ४ लघुकथा व ५ लघुनिबंध. (साहित्याचा संसार) पांच प्रकार लोकर्गातांचे १ ओव्या, २ गवळन, ३ भारूड, ४ लळित व ५ गोंधळ. (महाराष्ट्र्राज्य परिचय) पांच प्रकारचे वर्ष १ चांद्र, २ सौर, ३ सायन, ४ नाक्षत्र व ५ बार्हस्पत्य. असें पांच प्रकारचें वर्ष कालगणनेंत मानलें आहे. ([धर्मसिंधु]) पांच प्रकार वेदांचे १ विधि, २ मंत्र, ३ नामधेय, ४ निषेध आणि ५ अर्थवाद. ([म. ज्ञा. को. वि. ५]) पांच प्रकार वेश्येचे १ गणिका - गुणलुब्ध पण एकनिष्ठ, २ कंचनी - धन घेऊन देह अर्पण करणारी, ३ रामजेणी - ईश्वरभजनी. तिची धर्मप्रवृत्ति पाहून विषयीजन तिला फसतात, ४ वेश्या - केवळ विषयाधीन व ५ कुलटा - अत्यंत अधम. (चंद्रकांत भाग २ रा) पांच प्रकारचें वैर १ सापत्नभाव, २ घर वगैरेंच्या योगें, ३ स्त्रीयोगें, ४ शिवीगाळ व ५ अपराध केल्यानें. असें पांच प्रकारचें वैर उत्पन्न होतें. तें इष्ट मार्गानें शमवावें. सापत्न्यं वास्तुजं स्त्रीजं वाग्जातमपराधजम् । वैरं पञ्चबिधं प्रोक्तं साधनैःप्रशमं नयेत ॥ ([अग्नि. २४०. १९]) पांच प्रचारचें वैराग्य १ त्रासवैराग्य, २ स्मशानवैराग्य, ३ प्रसूति - वैराग्य, ४ मैथुनवैराग्य आणि ५ शुद्धवैराग्य ([सि. बो. ४०]) पांच प्रकारचे वैद्य अपूज्य १ निंद्य वस्त्र अंगावर घेणारा, २ कठोर, ३ स्तब्ध असणारा, ४ गांवकामगार आणि ५ रोग्याकडे आपण होऊनच आलेला. अशा पांच वैद्यांकडून ते धन्वंतरीसारखे असले तरी औषध घेऊं नये. कुचैलः कर्कशः स्तब्धो ग्रामणी स्वयमागतः। पञ्च वैद्या न पूज्यन्ते धन्वंतरिसमा अपि (रा. नि.) पांच प्रकारच्या वृत्ति १ यथार्थज्ञान, २ विपरीतज्ञान, ३ शब्द - भ्रम, ४ निद्रा व ५ स्मृति - आठवण. "प्रमाण - विपर्यय - विकल्प - निद्रा - स्मृतयः"([पा. यो. १-६]) पांच प्रकार शास्त्रीय ग्रंथांचे (संस्कृत वाङमय) १ सूत्र. २ वृत्ति, ३ भाष्य, ४ वार्तिक व ५ टीका. ([व्याकरण महाभाष्य - प्रस्तावना खंड.]) पांच प्रकारची शुद्धि १ सत्य, २ मनःशौच, ३ इंदियनिग्रह, ४ सर्वभूतदया आणि ५ पाण्यानें शुद्धि. सत्यशौचं मनःशौचं शौचमिंद्रियनिग्रहः। सर्वभूते दयाशौचं जलशौचं च पंचमम ॥ ([ग. पु.]) पांच प्रकार शैव - धर्माचे १ तप, २ कर्म, ३ जप, ४ ध्यान व ५ ज्ञान. ([शिव. पु. वा. संहिता अ ७]) पांच प्रकारच्या सख्या १ सखी, २ नित्यसखी, ३ प्राणसखी, ४ प्रियसखी आणि ५ परमेष्ठ सखी. ([कल्याण नारी अंक]) पांच प्रकारचे साक्षीदार १ लेख, २ प्रत्यक्ष पाहिलेलें आठवणीनें सांगणारा, ३ सहजगत्या येऊन सांगणारा, ४ गुप्तपणें सांगणारा व ५ उलट बाजूचा पण अनुकूल सांगणारा. लिखितः स्मारितश्चेव यद्दच्छाभिज्ञ एव च। गूढश्रोत्तरसाक्षी च साक्षी पंचविधः स्मृतः ॥ (ना. स्मृ.) पांच प्रकारचे सगुण ध्याग १ श्रीविष्णुध्यान, २ अग्निध्यान, ३ सूर्यध्यान, ४ भूध्यान व ५ पुरुषध्यान. ([श्रीगुरुदत्तयोग]) पांच प्रकार संतांचे १ भोगी, २ योगी, ३ रोगी, ४ रागी, व ५ त्यागी. (परमार्थपर व्याख्यानें) पांच प्रकारची सृष्टि १ खनिजसृष्टि, २ वनस्पतिसृष्टि, ३ प्राणिसृष्टि, ४ मनुष्यसृष्टि व ५ देवसृष्टि. अशी क्रमानें सृष्टीची उत्पत्ति झाली. पांच प्रकारच्या सिद्धि १ जन्म, २ औषधी, ३ मंत्र, ४ तप व ५ समाधि. (पां. योग.) पांच प्रकार स्वप्रांचे १ यथातथ्य, २ प्रतान (विस्तार), ३ चिंतास्वप्र, ४ विपरीत व ५ अव्यक्त (स्वप्राची अंधुक स्मृति). पांच प्रमुख गाथा झरतुष्ट्र धर्माच्या १ अहुनवद, २ उस्तवड, ३ स्पेनतोमर्द, ४ वोहुक्षत्र व ५ वहिशटोइस्ट (झेंदावस्ता) पांच प्रमुख प्रकार प्राणायामाचे १ सूर्यभेदन, २ उज्जयी, ३ सीत्कारी, ४ शीतली व ५ भस्त्रिका. ([योगशास्त्र]) पांच प्रकारचें बल १ आत्मबल, २ तपोबल, ३ बाहुबल, ४ धनबल व ५ ईशबल. पांच प्रमुख शिष्य व्यासांचे १ सुमंतु, २ वैशंपायन, ३ जैमिनि, ४ पैल व ५ शुकाचार्य (पुत्र व शिष्य). या पांच जणांना व्यासांनीं वेदविद्या पढविली. ([म. भा. शांति. अ. ३२०]) पांच प्रकार सत्तेचे १ धर्मसत्ता, २ जातिसत्ता, ३ राजसत्ता, ४ अर्थसत्ता आणि ५ लोकसत्ता. (भारतीय लोकसत्ता) पांच प्रकार संन्यासदीक्षेचे १ आश्रम, २ तीर्थ, ३ सरस्वती, ४ भारती व ५ परमहंस. (ह्रत्पद्मा) पांच प्रकार साक्षात्कारी पुरुषांचे १ रुपदशीं, २ तेजोदर्शी, ३ वर्णदर्शी, ४ नादश्रवा व ५ अमृतास्वादी. (संत - स्वरूप साक्षात्कार मार्ग) पांच प्रभास क्षेत्रें १ आद्यप्रभास, २ वृद्धप्रभास, ३ जलप्रभास, ४ कृतस्मरप्रभास व ५ महाप्रभास. अशीं पांच प्रभासक्षेत्रें प्रभास खंडांत आहेत. (श्रीयुत - दिवाळी अंक) पांच प्रकारचें ज्ञान १ मतिज्ञान, २ श्रुतज्ञान, ३ अवधिज्ञान, ४ मनःपर्याय व ५ केवलज्ञान. ([तत्त्वार्थ सूत्र अ १]) पांच प्रमुख आसनें (योगाचीं) १ पद्मासन, २ स्वस्तिकासन, ३ भद्रासन, ४ वज्रासन आणि ५ वीरासन. योगशास्त्रांतील चौंर्यायशी आसनांतील हीं पांच आसनें मुख्य आहेत. ([कल्याण योगांक]) पांच प्रमुख तत्त्वें (बौद्ध धर्माचीं) १ प्रज्ञा, २ शील, ३ दया, ४ करुणा आणि ५ मैत्री. पांच प्रमुख तत्त्वें (समर्थसंप्रदायाचीं १ शुद्ध उपासना, २ विमलज्ञान, ३ वीतराग (वैंराग्य), ४ ब्राह्मण्यरक्षण आणि ५ शुद्ध कर्माचरण. पांच प्रसंगीं खोटें बोलणें पाप नाहीं १ थट्टेंत, २ पत्नीजवळ, ३ विवाहकालीं, ४ प्राणसंकटाचे वेळीं आणि ५ सर्वस्व लुबाडलें जात असतांना. (वसिष्ठस्मृति अ. १६) ([म. भा. आदि. ८२-१६]) पांच प्रपंचांतील प्रमुख सुखें १ निरोगी काया, २ द्रव्याची अनुकूलता, ३ पतिव्रता व मधुरभाषिणी स्त्री, ४ आज्ञांकित पुत्र व ५ धन देणारी विद्या. पांच प्रतीकें (भारतीय संस्कृतीचीं) १ दीप - ज्ञानाचें प्रतीक, २ कमळ - जन्मस्थान नव्हे पण कर्तृत्वाचें प्रतीक, ३ वटवृक्ष - औंदार्याचें प्रतीक, ४ स्वस्तिक - कल्याण व ५ ॐ ध्वनीचें उगमस्थान. हीं भारतीय संस्कृतीचीं पांच मुख्य प्रतीकें होत. पांच फारशी महाकवि १ खुस्त्रौ, २ फैजी, ३ सैनिक, २ धर्मगुरु, ३ वैद्य अथवा डॉक्टर, ४ विधिज्ञ आणि ५ व्यापारी, (Unto this Last) पांच भक्तिमार्गांतले कांटे १ जाति, २ विद्या, ३ मह्त्त्व, ४ रूप व ५ यौवन, जातिर्विद्या महत्त्वं च रूपं यौवनमेव च। यत्नेन परिहर्तव्याः पंचैते भक्तिकंटकाः ॥ ([सु]) पांच भक्तीचीम लक्षणें १ निरपेक्षता, २ मनन, ३ शांति, ४ समता व ५ नर्वैरता. निरपेक्षता आणि माझें मनन। शांति आणि समदर्शन ॥ पांचवें तें निर्वैर जाण। पांच लक्षणें हें मुख्यत्वें ॥ ([ए. भा. अ. १४]) पांच भाग (वेदांचे) १ मंत्रसंहिता, २ ब्राह्मण, ३ आरण्यक, ४ सूत्र व ५ अनुक्रमणि. या पांच भागांना मिळून श्रुति अशी संत्रा आहे. ([कल्याण - बालकांक]) पांच मराठेशाहींतील प्रसिद्ध शाहीर १ परशराम, २ होनाजी बाळा, ३ अनंत फंदी, ४ रामजोशी व ५ प्रभाकर. पांच मराठी संतकवि व त्यांचे प्रासादिक ग्रंथ २ श्रीज्ञानेश्वर - ज्ञानश्वरी २ नामदेव - अभंग गाथा, ३ एकनाथ - एकनाथी भागवत. ४ तुकाराम - अभंग गाथा, आणि ५ रामदास - दासबोध. पांच मराठी संत कवयित्री १ महदंबा किंवा महदाईसा, २ मुक्ताबाई, ३ जनाबाई, ४ बहिणाबाई, आणि ५ वेणाबाई. पांच महान तत्त्वें (इस्लाम धर्माचीं) १ कलमा (धर्मश्रद्ध), २ नमाज (प्रार्थना), ३ उपवास, ४ दानधर्म व ५ मक्केची यात्रा. (इस्लाम आणि संस्कृति) पांच मान प्राप्त होण्याचीं कारणें १ धन, २ बंधुवर्ग, ३ वय, ४ कर्म आणि ५ विद्या, ([मनु २-१३६]) पांच मानव जातीचे शत्रु १ दारिद्र्य, २ अस्वच्छता, ३ रोगराई, ४ अज्ञान आणि ५ आळस. पांच मानसिक तपे १ मनाची प्रसन्नता, २ सौम्यता, ३ ईश्वराचें ध्यान, ४ मनोनिग्रह व ५ अन्तःकरणाची शुद्धि. मनःप्रसादःसौम्यत्वं मौनमात्मविनिग्रहः। भावसंशुद्धिरित्येतत्तपो मानसमुच्यते ॥ ([कल्याण नारी अंक]) पांच मानसिक दोष १ विषाद मानणें, २ निर्दय विचार करणें, ३ व्यर्थ चिंता करणें, ४ मन स्वाधीन न ठेवतां भटकूं देणें, व ५ अपवित्र विचार बाळगणें. ([कल्याण साधनांक]) पांच मार्गांनीम सिद्धी प्रकट होतात १ विशिष्ट जन्म, २ दिव्य औषधी, ३ भिन्न देवतांचे मन्त्र, ४ तपःसामर्थ्य व ५ समाधि ([पा. योग ३-१]) पांच मूर्खलक्षणें १ रस्त्यानें खात जाणें. २ हंसत हंसत बोलणें, ३ गेल्या गोष्टीचा शोक करणें, ४ आत्मप्रशंसा करणें व ५ दोघे बोलत असतील तेथें जाणें. पांच यम (संयमन करावयाच्या गोष्टी) १ अहिंसा, २ सत्य, ३ अस्तेय, ४ ब्रह्मचर्य आणि ५ अपरिग्रह. ([यो. सू. २-३०]) हे पांच यम सार्वभौम महाद्रत म्हणजे सर्वांना व्यापून असणारे आचरणांत आणण्याचे नियम होत. पांच यज्ञ (राजकर्तव्यें) शासनाचीं १ सज्जनांचा परामर्ष, २ दुर्जनांना शासन, ३ न्याल्य मार्गानें कोशसंवर्धन, ४ प्रजारक्षण व ५ निःपक्षपाती न्यायदान. पांच योगदोष १ काम, २ क्रोध, ३ लोभ, ४ भय आणि ५ स्वप्र ([म. भा. शांति ३-२४०]) पांच रत्नें (महाभारतान्तर्गत) १ भगवदी़ता, २ विष्णुसहस्त्रनाम, ३ भीष्मस्तवराज, ४ अनुस्मृति आणि ५ गजेंद्रमोक्ष. गीतासहस्त्रनामैव स्तवराजो ह्मनुस्मृतिः। गजेंद्रमोक्षणं चैव पंचरत्नानि भारते ॥ ([सु.]) पांच लक्षणें सदगुरूंचीं १ श्रोत्रिय (शास्त्रज्ञ), २ ब्रह्मनिष्ठ (अनुभवी), ३ शिष्यप्रवोधिनी (समर्थ), ४ कृपालुत्व आणि ५ पूर्ण शांति (पु. दी.) पांच लेखन गुण १ अर्थानुक्रम, २ वाक्यसंगति, ३ परिपूर्णता, ४ माधुर्य आणि ५ गौख आणि निःसंदेहपणा ([कौ. अधि. २ अ. १]) पांच लेखन दोष १ कलाहीनपणा, २ विरोध. ३ पुनरुक्ति, ४ चुकीचा शब्दप्रयोग आणि ५ अक्षरांचा घोटाळा ([कौ. अ. २ अ. ३१]) पांच लोक आणि त्यांच्य दिशा (अ) सत्यलोक, २ वैंकुंठलोक, ३ कैलास, ४ आश्रय आणि ५ निराश्रय. ([क. गी. २. २६]) (आ) १ इंद्रलोक - पूर्वेस, २ यमलोक - दक्षिणेस, ३ वरुणलोक - पश्चिमेस, ४ धनदलोक (कुबेर)- उत्तरेस आणि ५ ब्रह्मलोक - ऊर्ध्व दिशा ([म. भा. सभापर्व]) पांच वस्तु अति पवित्र होत १ उच्छिष्ट - वासराचें उष्टें दूध, २ शिवनिर्माल्य - शंकराच्या मस्तकापासून निघालेली गंगा, ३ वमन - मधमाश्यांपासून उत्पन्न झालेला मध, ४ शवकर्पट - प्रेतचीवर म्हणजे किडे नष्ट होऊन उत्पन्न झालेलें रेशीभ व ५ काकविष्ठेपासून झालेला पिंपळ. उच्छिष्टं शिवनिर्माल्यं वमनं शवकर्पटः। काकविष्ठासमुत्पन्नाः पञ्चैतेऽतिपवित्रकाः ॥ ([सु.]) पांच वस्तु निद्रेसप्रयीं जवळ असाव्या १ पादत्राण, २ काठी, ३ पाण्याचें तांब्याचें भांडें, ४ दिवा व ५ आगपेटी. पांच वस्तु स्वर्गांत देखील दुर्मिळ १ विद्या, २ उंच उंचा घरें, ३ केशर, ४ बर्फमय पाणी, व ५ द्राक्षें. पण या पांचहि वस्तु भूनंदनवन - काश्मीरमध्यें विपुल प्रमाणांत. विद्या वेश्मानि तुङ्गानि कुकुमं सहिमं पयः। द्राक्षेति यत्र सामान्यमस्ति त्रिदिवदुर्लभम् ॥ (राजतरंगिणी) पांच वनस्पति पापमोचक (अ) १ सोमवल्ली, २ शमी, ३ आपटा, ४ तुळस (पांढरी व काळी) आणि ५ तीळ. (आ) १ तुळस, २ शमी, ३ आपटा, ४ गोरोचन व ५ तीळ. (निघंट शिरोमणि) पांचावर शस्त्रप्रहार करूं नये १ स्त्री, २ गाय, ३ ब्राह्मण, ४ ज्याचें अन्न खावें तो व ५ ज्याचा आपण आश्रय केला आहे तो. ([म. भा. सभा. ४१-४३]) पांच वाणीचीं तपें १ उद्धेग न करणारे, २ प्रिय, ३ हितकर, ४ यथार्थ भाषण आणि ५ स्वाध्याय. पांच वाचिक दोष १ अस्त्य भाषण, २ निंदा करणें, ३ मर्मीं लागेल असें बोलणें, ४ आत्मश्लाघा व ५ परदोषकथन. पांच विद्यासंपादनाचे मार्ग १ आस्था, २ जिज्ञासा, ३ शिस्त, ४ एकाग्रता आणि ५ तज्ज्ञसहवास. पांच वैदिक संप्रदायाचे प्रमुख आचार्य १ श्रीशंकराचार्य, २ श्रीरामानुजाचार्य, ३ श्रीवल्लभाचार्य, ४ श्रीनिंबार्काचार्य व ५ श्रीमध्वाचार्य. वैदिक धर्माला आलेलें मालिन्य नाहींसें करून धर्माची घडी नीट बसवून देणारे हे प्रमुख पांच आचार्य होत. पांच वैश्याचे स्वाभाविक गुणधर्म १ श्रद्धा, २ दान, ३ विचारा - प्रमाणें आचार, ४ वेदब्राह्मणांची सेवा आणि ५ धनसंग्रहासंबंधानें असमाधान. ([भा. स्कंध ११. ३७. १८]) पांच शक्ति (शिवाच्या) १ चित्शक्ति, २ आनंदशक्ति,, ३ इच्छाशक्ति, ४ ज्ञानशक्ति, व ५ क्रियाशक्ति, या पांच मुख्य शक्ति शैव मतांत मानल्या आहेत. पांच शब्द औदार्यसूचक १ वेदघोष, २ धनुष्याचा टणत्कार (शत्रूंचा संहार), ३ खा, ४ प्या व ५ उपभोग घ्या. असे पांच औदार्य सूचक शब्द कधीं नाहीसे झाले नाहींत, अशा प्रकारचें राजा दिलीपाचें राज्य होतें अशी कथा आहे. पंचशब्दा न जीर्यन्ते खट्वांगस्य निवेशने। स्वाध्यायघोषो ज्याघोषो पिवताश्नीत खादत ॥ ([सु]) पांच शारीरिक तपें १ देव, गुरुजन आदि ज्ञानी पुरुषांचें पूजन, २ पवित्रता, ३ सरलता, ४ ब्रह्मचर्य आणि ५ अहिंसा. पांच श्रेष्ठत्वदर्शक नारायणनामें १ अग्निनारायण, २ वेदोनारायण, ३ व्यासोनारायण, ४ आपोनारायण व ५ सूर्यनारायण. ([ऐति. गोष्टी भाग. ३ रा.]) पांच साधनें आत्मज्ञानाचीं १ सद्गुरुप्राप्ति, २ सत्संग, ३ श्रवण, ४ मनन आणि ५ निदिध्यास ([दा. बो]) पांच साधनें सिद्धीचीं १ जन्म, २ औषश, ३ मंत्र, ४ तप व ५ समाधि ([योगशास्त्र]) पांच सिद्धांत विरोधाभासात्मक व त्यांचा समन्वय (गीतोक्त) १ ईश्वर सगुण कीं निर्गुण - तो गुणातीत, २ तो कर्ता कीं द्रष्टा - तो मूळप्रेरक, ३ ईश्वर अंतर्यामी कीं सर्वातीत - दोन्हीहि, ४ जगत् सत्य का असत्य - तें क्षणभंगुर आणि ५ विदेहमुक्ति कीं क्रममुक्ति - जीवन्मुक्ति. ([भ. गी. साक्षात्कारदर्शन]) पांच श्रेष्ठ वेदान्ती १ याज्ञवल्क्य, २ आरुणि, ३ शांडिल्य, ४ दध्यच आणि ५ सनत्कुमार. पांच सन्मान स्थानें १ धन, २ बंधु, ३ अवस्था, ४ कर्म व ५ विद्वत्ता. यांत उत्तरोत्तर प्रशस्त. ([कल्याण मासिक]) पांच स्कंध (भाग) ज्योतिषाचे १ सिद्धांत, २ होरा, ३ संहिता, ४ स्वर व ५ सामुद्रिक. (तत्त्व - निज - विवेक) पांच हिंदी संत कवि १ कबीर, २ जायसी, ३ सूरदास, ४ तुलसीदास व ५ मीराबाई. पांच हेतु ज्योतिर्गणिताचा विचार करतांना जाणावेत १ चक्षु, २ शास्त्र, ३ जल. ४ लिखाण व ५ प्रत्यक्ष गणित. चक्षुःशास्त्रं, जलं लेख्यं गणितं बुद्धिसत्तमाः। पञ्चेते हेतवो ज्ञेया ज्योतिर्गणितविचिन्तने ॥ ([वायु. पु.]) पांच हेतु (विवाहाचे) १ संयम, २ कुलरक्षण, ३ सुप्रजोत्पादन, ४ प्रेम आणि ऐक्य व ५ भगवद्भाव. पांच क्षुद्र सिद्धि १ त्रिकालज्ञान, २ अद्वंद्वता - शीत, उष्ण, सुखदूःख या द्वंद्वाच्या आधीन न होणें, ३ परचित्त ज्ञान, ४ भूत प्रतिकार (अग्नि, वायु, विष वगैरेंची बाधा न होणें) आणि ५ अपराजय. पांच जण आनुवंशिक वीर होत १ बलराम, २ श्रीकृष्ण, ३ ३ प्रद्युम्न, ४ सांब व ५ अनिरुद्ध, संकर्षणो वासुदेवः प्रद्युम्नः सांब एव च। अनिरुद्धश्च पञ्चैते वंशवीराः प्रकीर्तिताः ॥ ([वायु. पु.]) पांचजणांना कन्या देऊं नये १ मूढ, २ विरक्त, ३ स्वतःला फार मोठे समजणारा, ४ रोगी आणि ५ उद्धट. मूढाय च विरक्ताय आत्मसंभाविताय च। आतुराय प्रमत्ताय कन्यादांन न कारयेत् ॥ ([स्कंद, माहेश्वर खंड]) पांचजण अवश्यमेव पोष्य १ अतिथि, २ बालक, ३ पत्नी, ४ जननी आणि ५ जनक. अतिथिर्बालकः पत्नी जननी जनकस्तथा। पञ्चैते गृहिणः पोष्या इतरे च स्वशक्तितः ॥ ([सु.]) पांचजण यथानुशक्ति पोष्य १ मोठीं मुलें, २ बाप, ३ नातू, ४ भाऊ आणि ५ भाचा. बालाः पिता च दौहित्रो भ्राता च भगिनीसुतः। एतेऽवश्यं पालनीयाः प्रयत्नेन स्वशक्तितः ॥ ([सु.]) पांचजण कर्मचांडाल होत १ नास्तिक, २ पिशुन, ३ कृतघ्न, ४ दीर्घद्वेषी आणि ५ अधर्मजन्य संतति. नास्तिकः पिशुनश्चैव कृतघ्नो दीर्घदोषकः। चत्वारः कर्मचांडाला जन्मतश्चापि पंचमः ॥ (व. स्मृति) पांचजण कार्य उरकलें म्हणजे तृणवत् होतात १ उपाध्याय, २ वैद्य, ३ ऋतुकालीन स्त्री, ४ सुईण आणि ५ दूती. हे पांचजण तें तें कार्य उरकलें म्हणजे तृणवत् होतात. पांचजण गुरुसमान १ पिता, २ माता, ३ अग्नि, ४ आत्मा आणि ५ आचार्य. ([म. भा. वन. १२-२१४]) पांचजणांना तीर्थाचें फल मिळत नाहीं १ श्रद्धाहीन, २ स्वभावमच पापमय आहे असा पापात्मा, ३ नास्तिक, ४ संदेहशील व ५ हेतुवादी. अश्रद्दधानः पापात्मा नास्तिकोऽच्छिन्नसंशयः। हेतुनिष्ठश्च पञ्चैते न तीर्थफलभागिनः ॥ (कृष्णा म. अ. २९) पांचजण दुसर्याव जगतात १ वैद्य - रोग्यावर, २ दुकानदार - गिर्हाइकावर. ३ शहाणा - अजागळावर. ४ चोर - गाफिलावर आणि ५ भिक्षुक - गृहस्थावर. ([पंचतत्र]) पंचजणांना निद्रा येत नाहीं १ बलवानानें दांत धरलेला. २ दुर्बल आणि साधनहीण, ३ सर्वस्व गमावून बसलेला, ४ विषयलंपट व ५ चोर. ([म. भा. उद्योग ३३-१३]) पांचजण नित्य स्मरणीय १ जननी, २ जनक, ३ विद्यादाता, ४ राष्टृ आणि ५ धर्माचा उपदेशक. जननी जन्मदाता च सुविद्यां प्रददाति यः। राष्ट्रं धर्मोपदेष्टा च पञ्चक संततं स्मरेत् ॥ ([सु.]) पांचजण पंक्तिपावन होत १ विकलांग नसलेला, २ विनयी, ३ योगी, ४ सकलशास्त्र्ज्ञ व ५ फिरता साधु. षडङ्गी विनय़ी योगी सर्वतन्त्रस्तथैव च। यायावरश्च पञ्चैते विज्ञेयाः पंक्तिपावनाः ॥ ([वायु. पु.]) पांचजण पचनशक्ति श्रेष्ठ असलेले १ अगस्ति, २ कुंभकर्ण, ३ शनि, ४ वनवानल आणि ५ वृकोदर. अगस्तिं कुंभकर्णं च शनिं च वडवानलम् । आहारपरिपाकार्थं स्मरामि च वृकोदरम ॥ ([यो. र. भाग १]) पांचजण पित्यासमान १ जन्मदाता, २ उपनयनकर्ता, ३ विद्या देणारा, ४ अन्नदाता आणि ५ भयत्राता. जनिता चोपनीता च यस्तु विद्यां प्रयच्छति। अन्नदाता भयत्राता च पञ्चैते पितरः स्मृताः ॥ ([वृ. चा ४. ९]) पांच चणांना विद्या प्राप्त होत नाहीं १ रागीट, २ दुराग्रही, ३ आळशी, ४ रोगी आणि ५ चंचल चित्त असलेला. पञ्च विद्यां न गृह्लन्ति चंडास्तब्धा च ये नराः। अलसश्च सरोगश्च येषां च विस्मृतं मनः ॥ ([नारदीय - पूर्वखंड]) पांचजणांवर विश्वासूं नये १ जामात, २ कृष्णसर्प, ३ अग्नि, ४ दुर्जन व ५ भाचा. जामातो कृष्णसर्पश्च पावको दुर्जनस्तथा। विश्वासो नैव कर्तव्यः पञ्चमो भगिनीसुतः ॥ ([सु.]) पंचजण विद्वान असले तरी अपूज्य १ चंचल, २ कठोर, ३ दुराग्रही, ४ निंद्य वस्त्र धारण करणारा आणि ५ आगंतुक. अधीरः कर्कशः स्तब्धः कुचलः स्वयमागतः। पंच विप्रा न पूज्यन्ते बृहस्पतिसमा अपि ॥ ([गरुड. आचारकांड]) पांचजण व्याधींचा परिहार करणारे १ धन्वंतरी, २ बृकोदास, ३ काशीराज, ४ नकुल आणि ५ सह्देव, हे पांच व्याधींचा परिहार करणारे म्हणून सांगितले आहेत. (नेपाळी पंचांग) पंचजण संगतीला वर्ज्य १ गर्विष्ठ, २ मूर्ख, ३ रागीट, ४ अविचारी आणि ५ धर्माला सोडून वागणारा. पांच संस्कृत महाकवि (अ) १ कालिदास, ज २ भवभूति, ३ भारवि, ४ माघ व ५ हर्ष ; (आ) १ कालिदास, २ भवभूति, ३ दंडी, ४ वाण आणि ५ सुबंधु, पांचजण सुखानें निद्रा करणारे १ अगस्ति - अन्न चांगलें पचल्यामुळें, २ माधव - पुण्याचरणामुळें, ३ मुचकुंद - फर मेहनत झाल्यामुळें, ४ कपिल - घ्यानधारणेमुळें आणि ५ आस्तिक - दुष्टावरसुद्धां उपकार करणारा. निद्रासमयीं या पांचांचें स्मरण केल्यानें सुखानें निद्रा येते. अगस्तिर्माधवश्चैव मुचकुंदो महामुनिः। कपिलो मुनिरस्तिकः पञ्चैते सुखशायिनः ॥ (गोभिल) पांचजणांच्या स्प्ररणानें घोर संकटांचा नाश होतो १ हर, २ हरि, ३ हरिश्रंद्र, ४ हनुमान् आणि ५ हलायुध, ([माध्यं. आ. सूत्रावलि]) पांचजण जिवंत असून मृतवत् होत १ दरिद्री, २ नित्यरोगी ३ मूर्ख, ४ सदा प्रवास करणारा, ५ आजन्म नोकरीवर निर्वाह करणारा. जीवन्तोऽपि मृताः पञ्च श्रूयन्ते किल भारते। दरिद्रो व्याधितो मूर्खः प्रवासी नित्यसेवकः ॥ ([पंचतंत्र]) पांच जणांच्या स्मरणानें द्दष्टिदोष होत नाहीं १ शर्याति, २ शर्यातिकन्या - सुकन्या, ३ च्यवनमहार्षि, ४ सोम व ५ अश्चिनीकुमार. शर्यातिं च सुकन्यां च च्यवनं सोममाश्चिनौ। भोजनान्ते स्मरेन्नित्यं तस्य चक्षुर्न हींयते ॥ ([सु.]) पांचाच्या स्मरणानें वेदपठणास प्रवृत्त व्हावें १ गणेश, २ सरस्वती, ३ रवि, ४ शुक्र आणि ५ बृहस्पति. गणनाथसरस्वतीरविशुक्रबृहस्पतीन् । पंचैतानि स्मरेन्नित्यं वेदवाणीप्रवृत्तये ॥ (प्रातःस्मरण) पांच जणांच्या स्मरणानें विषबाधा होत नाहीं १ कपिला, २ कालिया, ३ अनंत, ४ वासुकि व ५ तक्षक ([माध्यं, आ. सूत्रावलि]) पांचजणांच्या प्रातः स्मरणानें सौभाग्यवर्धन होतें १ उमा, २ उषा, ३ जानकी, ४ रसा आणि ५ गंगा ([माध्यं. आ. सूत्रावलि]) पांचजणांना नांवानें संबोधूं नये १ आत्मनाम, २ गुरु, ३ अतिकृपण मनुष्य, ४ ज्येष्ठपुत्र व ५ पत्नी. कल्याणेच्छु पुरुषानें या पांचांना नांवानें संबोधूं नये. आत्मनाम गुरोर्गाम नामातिकृपणस्य च। श्रेयःकामो न गृह्लीयात् ज्येष्ठापत्यकलत्रयोः ॥ ([सु.]) पांचजणांची पांच प्रकारची आसक्ति १ हरिण - शब्द - ध्वनिलुब्ध झाल्यामुळें, २ हत्ती - स्पर्श - हत्तिणीवर आसक्त झाल्यामुळें, ३ पतंग - रूप - दिव्यावर मोहित झाल्यानें, ४ भ्रमर - रम - मधुररसावर आसक्त झाल्यामुळें आणि ५ मत्स्य - गंध - आमिषाला भूलून जाळ्यांत अडकल्यामुळें. असे हे पांच विषयांच्या आसक्तीनें नष्ट होतात. "कुरंग - पातंग - पतंग - भृंग - मीना हताः पंचभिरेव पंच ([गरुड. ६-३५]) पांच जणांडून प्रजेला भय असतें १ अधिकारी वर्ग, २ चोर, ३ शत्रु ४ शासनाचे संबंधी लोक व ५ लोभी शासन मंडळ"प्रजानां पञ्चधा भयम् "(नीतिसार) अंतःकरणपंचक १ अंतःकरण, २ मन, ३ बुद्धि, ४ चित्त, व ५ अहंकार. ([दा. बो. १७-८]) गाथापंचक १ श्रीज्ञानदेव गाथा, २ श्रीनामदेव गाथा, ३ श्रीएकनाथ गाथा, ४ श्रीतुकाराम गाथा व ५ श्रीसंत गाथा. गीतपंचक १ वेणूगीत, २ गोपीगीत, ३ युगलगीत, ४ भ्रमरगीत व व ५ महिषीगीत. या भागवतांतील भक्तिरसानें भरलेल्या पांच गीतांस गीतपंचक अशी संज्ञा आहे. दुष्टपंचक १ वाणी दुष्ट असणें, २ क्रिया क्रूर असणें, ३ स्वाभाविक दुष्टता, ४ संसर्गदुष्टता आणि ५ शिळेंपाकें. यांना दुष्टपंचक म्हणतात. हीं वर्ज्य करावींत. भावदुष्टं क्रियादुष्टं जातिदुष्टमिति त्रिधा। संसर्गं कालदुष्टं च वर्जयेत् दुष्टपंचकम् ॥ (द्वैतसिद्धान्तकेसरी) देवतापंचक १ अग्नि, २ वायु, ३ सूर्य, ४ चंद्र व ५ नक्षत्रें, ([तैत्तिरीय उपनिषद]) नारीपंचक १ गायत्री, २ भूति, ३ श्री, ४ धी आणि ५ जयन्ती. राष्ट्राराष्ट्रांतील युद्धामुळें स्त्रीपुरुषांना अपत्यांचा कंटाळा आल्यामुळें प्रजा झपाटयानें नाहींशी होत चालली. अखेर पांच स्त्रिया राहिल्या त्या. (आपटेकृत अजरामर) निदानपंचक १ निदान, २ पूर्वरूप, ३ रूप, ४ उपशय आणि ५ संप्राप्ति. या पांच प्रकारांनीं रोगाचें ज्ञान होतें. ([सार्थ माधवनिदान]) पुरुषपंचक १ गौतम, २ कौशिक, ३ अगस्ति, ४ धाता आणि ५ शुक्त. राष्ट्राराष्ट्रांतील युद्धांमुळें स्त्रीपुरुषांना अपत्यांचा कंटाळा आला. अखेर पाच पुरुष राहिले ते. (आपटेकृत अजरामर) पुष्पपंचक १ चाफा, २ आंबा, ३ शमी, ४ कमळ व ५ कण्हेर. 'चम्पकाम्रशमी पद्म करवीरं च पञ्चकम् ।' ([भविष्य मध्यम पर्व]) प्राणपंचक १ प्राण, २ अपान, ३ व्यान, ४ उदान व ५ समान. मघापंचक १ मघा, २ पूर्वा, ३ उत्तरा, ४ हस्त व ५ चित्रा. मलंपचक १ मिथ्याज्ञान, २ अधर्म, ३ आसक्ति, ४ हेतु आणि ५ च्युति. हे पांच अंतःकरणाचे मल होत. (नकुलीश पाशुपतदर्शन) मृगपंचक १ मृग, २ आर्द्रा, ३ पुनर्वसु, ४ पुष्य व ५ आश्लेषा. विषयपंचक १ शब्द, २ स्पर्श, ३ रूप, ४ रस आणि ५ गंध. प्रवाळपंचामृत १ प्रबाळ, २ मोतीं, ३ शंख, ४ कवडी व ५ मोत्यांचा शिंपला. या पांचांना मिळून प्रवाळपंचामृत असें म्हणतात. भागवत धर्माची पंचाध्यायी एकादश स्कंधाच्या पहिल्या पांच अध्यायांना म्हणतात. यांत नारदानें वसुदेव - देवकीस सर्व भागवत धर्मरहस्य सांतितलें आहे. ([भागवत ११-१ ते ५]) तो मार्ग दावावया पुरा, हांकारी स्त्री शुद्रा पंचाध्यायी ॥ ([ए. भा. अ. २]) रासपंचाध्यायी श्रीमत् भागवत दशमस्कंध अध्याय २९ ते ३३. या पांच अध्यायांत भागवतांतील सर्व भक्तिसर्वस्व व काव्यकौशल्य भरलेलें आहे. यास रासपंचाध्यायी असें म्हणतात. एकनाथंपचायतन १ एकाजनार्दन, २ रामाजनार्दन, ३ जनीजनार्दन ४ विठारेणुकानंदन आणि ५ दासोपंत. कृष्णपंचायतन १ बलराम, २ गरुड, ३ श्रीकृष्ण, ४ अर्जुन आणि ५ उद्धव. गणेशपंचायतन १ विष्णु, २ शिव, ३ गणेश, ४ सूर्य आणि ५ देवी. "मध्ये गणपतिर्विष्णुशिवसूर्थांबिका ईशानादिक्रमेण."([धर्मसिंधु]) देवतापंचायतन १ सूर्य (उग्र प्रकाश), २ चंद्र ([सौम्य प्रकाश]), ३ बायु (गति), ४ अग्नि (ताप) आणि ५ आप ([शांति]). ([अथर्ववेद]) दत्तपंचायन १ सूर्य, २ अनसूया, ३ दत्त, ४ अग्नि व ५ गणपति. असा पूजा प्रकार इंदापुरास (जि. पुणें) आहे. (स्वराज्य साप्ताहिक) देवीपंचायतन १ विष्णु, २ शिव, ३ देवी, ४ गणेश आणि ५ सूर्य. बद्रीशपंचायतन १ गणेश, २ कुबरे, ३ बद्रीनाथ, ४ लक्ष्मी व ५ नारनारायण. रामपंचायतन (अ) १ श्रीराम (जानकीसह), २ लक्ष्मण, ३ भरत, ४ शत्रुघ्र व ५ मारुती हे पांच मिळून रामपंचायतन होतें. वारकरीपंचायतन १ नामदेव, २ ज्ञानदेव, ३ तुकाराम, ४ एकनाथ व ५ निळोबा. विष्णुपंचायतन १ शिव, २ गणेश, ३ विष्णु, ४ सूर्य व ५ देवी. शिवपंचायतन १ विष्णु, २ सूर्य, ३ शिव, ४ गणेश व ५ देवी. समर्थपंचायतन १ श्रीसमर्थ, २ जयरामस्वामी वडगांवकर, ३ रंगनाथस्वामी निगडीकर, ४ केशवस्वामी भागानगरकर आणि ५ आनंदमूर्ति ब्रह्मनाळकर. सूर्यपंचायतन १ शिव, २ गणेश, ३ सूर्य, ४ विष्णु व ५ देवी. श्रीज्ञानेश्वरपंचायतन १ निवृत्ति. २ ज्ञानदेव, ३ सोपान, ४ मुक्ताबाई आणि ५ चांगदेव तथा चांगावटेश्वर. श्रीशिवपंचस्थली (शिवाजीमहाराजांची) १ जन्भभूमि - शिवनेरी, २ कार्यारंम - तोरणा, ३ बलिदान - घोडखिंड, ४ प्राणार्पण - सिंहगड आणि ५ समाधि - रायगड. श्रीसमर्थपंचस्थली १ जन्ममूमि - जांब, २ तपोभूमि - टाकळी, ३ कार्यभूमि - कृष्णातीर, ४ इष्ट देवता स्थापना स्थळ - चाफळ आणि ५ समाधि - सज्जनगड. श्रीकृष्णचरित्रांतील लीलायुगुलपंचक १ दोन पिता - वसुदेव, नंद ; २ दोन माता - देवकी, यशोदा ; ३ दोन भगिनी - सुमद्रा, द्रौपदी ; ४ दोन गुरु - श्रीदुर्वास, सांदीपनि आणि ५ दोन शिष्य - अर्जुन, उद्धव ; याखेरीज श्रीकृष्णांनीं निर्माण केलेले ग्रंथहि दोनच आहेत. गीता आणि भागवत. पंच द्दष्टांत १ शुक्तीवर रजतप्रतीति, २ दोरीवर सर्प प्रतीति, ३ स्थाणूमध्यें पुरुष प्रतीति, ४ आकाशामध्यें नीलता व ५ मरुभूमीवर जल प्रतीति (वि. चंद्रोदय दर्शन) पंच द्रष्टे १ गृत्समद, २ मेधावी, ३ कण्व, ४ वसिष्ठ व ५ भारद्वाज, या पंच द्रष्टयांनीं मंगलमूर्ति ब्रह्मणस्पति हें प्रतीक भारतीय संस्कृतीला प्रथम सादर केलें (रोहिणी सप्टेंबर १९५८) पंचा प्राण (विनोदाचे) १ शब्दा, २ कल्पना, ३ परिस्थिति, ४ प्रसंग व ५ अमय प्रभुत्व (हास्यकारण आणि मराठी सुखांतिका) पंचविध प्रभुत्व १ कुलप्रभृत्व, २ ज्ञानप्रभुत्व, ३ दानप्रभुत्व, ४ स्थान प्रभुत्व व ५ अमय प्रभुत्व ([वस्तुरत्नकोश]) पांच कारणें वा प्रयोजने कर्माच्या उत्पत्तीचीं व फलाचीं १ मन, २ वाचा, ३ देह, ४ इंद्रियें व ५ जीव, कर्माच्या उत्पत्तीचीं ही पांच कारणें होत. तींच कर्माचीं कारणें म्हणजे कर्माचीं प्रयोजनें अर्थात् फळें होत. (प्रसाद आक्टोबर १९६३) पांच गुण बुद्धीचे १ इष्टानिष्ट गोष्टींचा निर्णय करतां येणें, २ निश्वय, ३ समाधान, ४ निर्णय व ५ ज्ञान. इष्टानिष्टविपत्तिश्च व्यवसायः समाधिता। संशयः प्रतिपत्तिश्च बुद्धेः पञ्च गुणान्विदुः ॥ ([म. भा. मोक्षधर्म]) पांच गोष्टी दीर्घकाल संध्या केल्यामुळें प्राप्त होणार्या १ दीर्घायुष्य, २ प्रज्ञा, ३ यश, ४ कीर्ति व ५ ब्रह्मतेज ([मनु]) (मानवता पूर्ति साधन व संध्योपासना) पांच गोष्टी पत्रव्यवहारांत महत्वाच्या १ अचूकता, २ संपूर्ण आशय, ३ असंदिग्घता, ४ थोडक्यांत पण मुद्देसूद ५ सभ्यता. (Good Drafting) पांच गोष्टींचें प्रकटीकरण (शिवनृत्याचें) १ निर्मिति, २ स्थिति, ३ संहार, ४ तिरोधान व ५ अनुग्रह (कला आणि कलास्वाद.) पांच गोष्टी शत्रूच्या बाबतींतहि निषिद्ध १ युद्धाला उभा नसलेल्याचा बध, २ परस्त्रीवर हात टाकणें, ३ ब्रह्मवित्ताची लूट, ४ सरसाकट अपहार व ५ स्त्रियांची चोरी. अयुद्धमानस्य वधः दारामर्षः कृतघ्नता। ब्रह्मवित्तस्य चादानं निःशेषकरणं तथा ॥ स्त्रियामोषः पतिस्थानं दस्युष्वेतद्धि गर्हितम् ([म. भा. शांति, अ. १३४]) याप्रमाणें छत्रपती शिवाजी महाराजांचे आचरण व तशीच राजाज्ञा होती असा इतिहास आहे. पांच लक्षणें सभ्याचीं १ सूक्ष्मद्दष्टी असलेला. २ पक्षपातरहित, ३ विचारी, ४ वक्तृत्व असलेले व ५ न्यायी. सम्यास्तु विबुधैर्ज्ञेयय ये दिद्दक्षान्विता जनाः। मध्यस्थाः सावधानाश्च वाग्मिनो न्यायवेदिनः। (आदि भरत) पांच प्रकार ग्रह संमेलनाचे १ संमोह, २ समाज, ३ कोश, ४ सश्रिपाप व ५ समागम (वराहमिदिराचार्य - अष्टग्रहीचा आसूड) पांच प्रकार प्रस्तावनेचे १ आशीर्वादात्मक, २ अवतरणात्मक, ३ असंबद्ध. ४ अतिशयोक्त व ५ अतिविशाल. (खर्डेघाशी) पांच प्रकार सुखान्तिकेचे (Comedy)- १ कल्पनारम्य, २ स्वभाव प्रधान, ३ प्रसंगनिष्ठ, ४ प्रहसनात्मक आणि ५ सुखदुःखान्तिका अथवा मिश्र मुखान्तिका. (हास्यकारण आणि मराठी सुखान्तिका) पांच संपदा १ ज्ञाति संपदा, २ भोग संपदा, ३ आरोग्य संपदाअ ४ शील संपदा व ५ द्दष्टि संपदा. ([दीघनिकाय]) पांच सुखेच्छाकला १ नम्रता, २ प्रियवादित्व, ३ धैर्य, ४ शांति व ५ वैराग्य या पांच कला सुखाखातर आहेत. (चा. चिं.) पांच जण ब्रह्माचे भीतीनें कार्य प्रवण (वेदान्त) १ वायु, २ सूर्य, ३ अग्नि, ४ इंद्र व ५ मृत्यु हे पांचही ब्रह्माच्या भीतीनें आपापलीं कामें करतात. ([तैत्तिरीय उपनिषद् ]).
|